आशीष ठाकूर
सरलेल्या पाच महिन्यांच सिंहावलोकन करता वर्षारंभीच निफ्टी निर्देशांकांनी ५ जानेवारीला २६,३७३चा उच्चांक मारला. दरम्यानच्या काळात इराण,अमेरिका,इस्रायल युद्धाला तोंड फुटलं व निफ्टीचा नूरच पालटला निफ्टी २६,३४१ च्या उच्चांकावरून २२,१८२ अशी ४,१५९ अंशांची दाहक घसरण अवघ्या दोन महिन्यात झाली,त्या नंतर निफ्टीत २२,१८२ च्या नीचांकावरून २,४१९ अंशांची भरीव वाढ होत २१ एप्रिलला २४,६०१ चा उच्चांकही नोंदवला. हे झालं गेल्या पाच महिन्यात निफ्टी निर्देशांकाच सिंहावलोकन.
आता येणाऱ्या सहा महिन्यातील निफ्टी निर्देशांकाच भविष्यकालीन वाटचाल रेखाटताना नाण्याच्या दोन्ही बाजूचा विचार करता प्रथम सकारात्मक बाजूचा विचार करुया…
इराण,अमेरिका व इस्रायलमधील युद्धबंदीचे तिन्ही पक्षांनी काटेकोरपणे पालन करत,या तिघांमध्ये कायमस्वरूपी शांतता करार पूर्णत्वास आल्यास,तसेच येणारा पावसाळा सर्वदूर, समाधानकारक असल्यास, चलनवाढ, महागाई आटोक्यात येइल, खनिज तेल ९० डॉलर प्रतिपिंपाच्या खाली राहत ८५ ते ८० डॉलर प्रतिपिंप पर्यंत घसरला तसेच चलन विनिमय दरात रुपया सशक्त होत डॉलर-रुपया विनिमय दर प्रथम ९२ व नंतर ९० ते ८८ पर्यंत खाली आल्यास या सर्व सकारात्मक घटनांचा पडसाद, निफ्टी निर्देशांक २४,०००चा ‘महत्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखत निफ्टी निर्देशांकाच प्रथम वरच लक्ष्य २४,८०० द्वितीय लक्ष्य २५,३०० ते २५,८००असेल. वर्षाअखेर निफ्टी निर्देशांक २८ ते ३०,००० पर्यंत झेपावेल. ही नाण्याची सकारात्मक बाजू झाली.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता इराण,अमेरिका,इस्रायलमधील युद्धबंधीच वारंवार उल्लंघन होऊन युद्धज्वर कायम राहण, उकळी फुटणार खनिज तेल,चलनविनिमय दरात सशक्त डॉलर व कमकुवत रुपयांमुळे वाढणारी महागाई/चलनवाढ त्यामुळे कर्जावरील व्याजदर घटवण्याएवजी ते वाढवण्याचे सुतोवाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात झाल्यास, तसेच एप्रिल ते जून महिन्यातील तिमाहींचे, जुलैमध्ये जाहीर होणारे प्रत्यक्ष तिमाही निकाल अपेक्षाभंग करणारे आल्यास निफ्टी निर्देशांक २४,०००च्या ‘महत्वाचा केंद्रबिंदू स्तराखाली राहत,निफ्टी निर्देशांकाच प्रथम खालच लक्ष्य २३,२६२ते २३,०००. द्वितीय लक्ष्य २२,८०० ते २२,५००असेल.अशा रीतीने तेजीमंदी चक्राचा आढावा पूर्ण झाला.
बँक निफ्टी निर्देशांक:- २९ मेचा बंद भाव :- ५४,२३९.२० / महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- ५४,२००
बँक निफ्टीनी ५४,२००चा स्तर सातत्याने राखल्यास बँक निफ्टीच प्रथम वरचे लक्ष्य ५५,५०० द्वितीय लक्ष्य ५६,३००असेल. बँक निफ्टी निर्देशांकाला ५४,२००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास बँक निफ्टी निर्देशांकाच प्रथम खालचे लक्ष्य ५३,०००तर द्वितीय खालचे लक्ष्य ५१,५००असेल.
सेन्सेक्स:- २९ मेचा बंद भाव:- ७४,७७५.७४ / महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- ७४,५००
सेन्सेक्सनी ७४,५०० चा स्तर सातत्याने राखल्यास,सेन्सेक्सच प्रथम वरचे लक्ष्य ७६,००० आणि द्वितीय लक्ष्य ७८,५००असेल.सेन्सेक्सनी ७४,५००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास सेन्सेक्सच प्रथम खालचे लक्ष्य ७३,५००.द्वितीय खालचे लक्ष्य ७१,५००असेल.
सोन्याची वाटचाल(एमसीएक्स आधारित):- महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- १,५७,५००
एमसीएक्स निर्देशांकावरील सोन्याच्या किंमतीने १,५७,५००चा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,६०,००० द्वितीय वरचे लक्ष्य १,६४,००० असेल. एमसीएक्स निर्देशांकावरील सोन्याच्या किंमतीने १,५७,५०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास सोन्याच्या किंमतीचे प्रथम खालचे लक्ष्य १,५३,०००.द्वितीय खालचे लक्ष्य १,४८,८००असेल.
चांदीची वाटचाल(एमसीएक्स आधारित):-महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२,६५,०००
एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीने २,६५,०००चा स्तर सातत्याने राखल्यास,तिच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,७०,००० तर द्वितीय वरचे लक्ष्य २,८५,०००असेल.एमसीएक्स वरील चांदीच्या किंमतीने २,६५,०००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास,चांदीच्या किंमतीचे प्रथम खालचे लक्ष्य २,६०,०००द्वितीय खालचे लक्ष्य २,५६,०००असेल.
ashishthakur1966@gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’आणी इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे.गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
