कल्पेन पारेख
दहाव्या क्रमांकावर असलेल्या डीएसपी म्युच्युअल फंडाला मोठे व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. ‘मात्र आपला फंड सर्वात मोठा असावा की उत्कृष्ट असावा?’ या प्रश्नाला उत्तर देताना डीएसपी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले कल्पेन पारेख यांचे बरेच सविस्तर उत्तर आहे. ते म्हणाले की, ‘येनकेनप्रकारेण आपली मालमत्ता वाढावी अशा विचारांचे अनेक फंड घराणी आहेत. मात्र नव्या योजनेला खूप प्रचंड प्रतिसाद मिळावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. कारण या उद्योगात कॉपी करणारे खूप आहेत. एकामागोमाग एक नवनवीन योजना येऊ लागल्या आहेत. आमच्या योजनेला सुरुवातीला ५०० किंवा ६०० कोटी रुपये मिळाले तरी पुष्कळ झाले. म्युच्युअल फंड नदीच्या प्रवाहासारखा असावा उगमस्थानी नदी छोटी असते. त्याप्रमाणे योजना सुरुवातीला छोटी असावी आणि मग हळूहळू मोठी व्हावी.’ या विचारसरणीमुळे लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता सांभाळत असलेला डीएसपी म्युच्युअल फंड इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते.

या म्युच्युअल फंडाचे सर्वेसर्वा हेमेंद्र कोठारी यांच्यावर अगोदर (अर्थवृत्तान्त, १६ जानेवारी २०२३) लिहिले आहे. त्यांचे धोरण त्यांचे अधिकारी राबवतात. कल्पेन पारेख आणि हेमेंद्र कोठारी या दोघांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडाबाबत सर्व जबाबदारी हेमेंद्र कोठारी यांनी कल्पेनवर सोपवलेली आहे. फक्त म्युच्युअल फंडच नाही तर हेमेंद्र कोठारी वर्षानुवर्षे या बाजाराशी घनिष्ठ संबंध असलेले आहेत. मात्र तरीसुद्धा एखाद्या नवीन गुंतवणुकीसाठी ते किंवा त्यांची मुलगी आदिती कोठारी देसाई (उपाध्यक्ष) कल्पेनला विचारणा करूनच गुंतवणुकीचे निर्णय घेतात.

Ajay Walimbe article Portfolio Market Structure Mutual Funds print eco news
शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
stock market, investing in stock market,
बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
My Portfolio, Avanti Feeds Limited,
माझा पोर्टफोलियो : भाव वधारलेल्या कोळंबीची अव्वल निर्यातदार
Hindustan Zinc Limited Investors Return on Capital Employed
शेअर बाजार- माझा पोर्टफोलियो: किफायतशीर उत्पादन; बहुमूल्य ‘रुपेरी’ बाज
SEBI fined Rs 650 crore to 22 companies including anil ambani in last week
अबब…भयंकर शिक्षा ! (भाग १)
Cafe Coffee Day, accountants,
सुजल्यावर कळतंय मार कुठे पडला!
Innovative and radical changes in the Indian market
आधुनिक किराणा बाजाराचा नादस्वर : शॉपिंग… गेट सेट गो!

हेही वाचा >>>‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!

अत्यंत कमी काळात एवढा विश्वास एखादी व्यक्ती मिळवू शकते, तेव्हा त्या व्यक्तीचे कौतुकच करायला हवे.म्युच्युअल फंड उद्योगात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ते कार्यरत आहेत. एल ॲण्ड टी फायनान्स, आयसीआयसीआय, आयडीएफसी, बिर्ला अशा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात जबाबदारीच्या जागांवर काम करून ते डीएसपीकडे आले. स्थिरावले आणि जुलै २०२१ ला सर्वोच्च पदावर पोहोचले.

मध्यमवर्गीय घरातून आलेल्या व्यक्तींवर संस्कार चांगले होतात. रसायन उद्योगाला भवितव्य चांगले आहे, असे वडिलांनी सांगितल्यावर कल्पेन पारेख हे रसायनशास्त्राचे अभियंता (केमिकल इंजिनीअर) झाले. त्यानंतर नरसी मोनजी या ठिकाणी व्यवस्थापनाचे शिक्षण त्यांनी घेतले आणि त्यानंतर मग म्युच्युअल फंड क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत त्यांनी प्रगती करून दाखवली. दिवसाच्या २४ तासांतले १७/१८ तास पूर्ण वेळ काम करणारा हा माणूस रात्री ११ वाजता एखाद्याचा संदेश आला तरी त्यांनी त्याला पहाटे उत्तर दिलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडून वेळेचे व्यवस्थापनदेखील शिकायचे. आपल्या व्यवसायासंबधी असलेल्या पुस्तकांची स्वतःची मोठी लायब्ररी ठेवणारा आणि ती पुस्तके वाचणारा असा हा माणूस आहे. पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक ज्ञानाची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर या व्यवसायातल्या लहान-मोठ्या व्यक्तींशी संपर्क दांडगा असावा लागतो. आयसीआयसीआयमध्ये असताना वाहन उद्योगांशी संबंधित असलेल्या एका कंपनीची माहिती त्यांच्या निधी व्यवस्थापकाला (फंड मॅनेजर) हवी होती, निधी व्यवस्थापकाने कल्पेन पारेख यांना प्रश्न विचारला. त्याच क्षणी पारेख यांनी सांगितले की, आपल्या व्यवसायात वितरक असलेली व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने वाहन उद्योगात असलेल्या या जर्मन कंपनीत नोकरी केलेली आहे. दूरध्वनीवरून त्यांच्याशी बोलणे झाले आणि फक्त पाच मिनिटांत त्यांना जी माहिती हवी होती ती त्यांना मिळविता आली. पण आश्चर्य याचे की, एवढे संबंध आपल्या डोक्यात कल्पेन कसे काय साठवून ठेऊ शकतात? योग्य वेळी त्या माहितीचा उपयोगही केला जातो आणि त्याचा फायदा सर्व गुंतवणूकदारांना होतो.

हेही वाचा >>>बाजार रंग : चाचणी परीक्षा आणि कंपन्यांचा अभ्यास

म्युच्युअल फंड वितरकांबरोबर त्यांचे जेवढे सहजपणे बोलणे असते, तेवढ्या सहजतेने मंचावरील त्यांचे भाषण असते किंवा कर्मचाऱ्यांशी वागताना, बोलताना वर्तणुकीचे शास्त्र याचा विशेष अभ्यास असल्यामुळे त्याचा उपयोग त्यांच्याकडून केला जातो.

गुंतवणुकीबाबतदेखील अभ्यासाने काही विचार डोक्यात पक्के बसलेले आहेत. गुंतवणूकदारांनी त्यांचे विश्वस्त म्हणून आपल्याकडे निधी सोपवलेला आहे. त्यामुळे उगाचच मोठी जोखीम घेण्याऐवजी गुंतवणुकीचे जे विविध पर्याय आहेत त्याचा योग्य उपयोग करून घ्या, असे त्यांचे नेहमी सांगणे असते. गोव्यातल्या एका मोठ्या वितरकाला सहजपणे त्यांनी प्रश्न विचारला – ‘आतापर्यंत किती वर्षे म्युच्युअल फंडाच्या बैठकीला हजेरी लावलेली आहे आणि या बैठकीतून नेमके काय मिळाले?’ तेव्हा वितरकाने जे उत्तर दिले त्यामुळे कुणीही खरे तर नाराज व्हावे. पण त्याऐवजी बाजाराची दिशा कशी राहील याचा योग्य अंदाज जे इतर कोणीही करू शकत नाहीत, ते केवळ कल्पेन यांनाच शक्य असते. त्यामुळे वितरकांना उगाचच बाजाराविषयीच्या माहितीचा भडिमार करण्याऐवजी व्यवसायासंबंधित पण इतर अनेक विषयांचे प्रशिक्षण द्यायचे असा डीएसपी व्यवस्थापनाने निर्णय घेतला. अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कल्पेन पारेख यांचे प्रयत्न कामी आले.

याचा उपयोग नेमका काय? असा जर प्रश्न कोणी विचारला तर म्युच्युअल फंड आणि गुंतवणूकदार याचा दुवा म्हणून वितरक काम करत असतो. वितरकांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांपर्यंत गुंतवणुकीचे विचार पोहोचवणे आणि त्यामुळे बाजारात दीर्घकालीन गुंतवणूकदार निर्माण करणे हे महत्त्वाचे काम यामुळे होऊ शकेल.

वितरकांच्या सभा जेव्हा होतात, त्या वेळेस योजनांच्या कामगिरीवर चर्चा होत असते. अशा वेळेस शांतपणे एखाद्या योजनेची कामगिरी कमी पडली तर त्यांची जबाबदारी घेणे, एखादा फंड कामगिरीत मागे का पडला याची कारणे व्यवस्थित समजावून सांगणे, त्याचबरोबर कामगिरीत सुधारणा करण्यासाठी काय काय प्रयत्न केले हेसुद्धा वितरकांबरोबर मोकळेपणाने बोलण्याचे धाडस या उद्योगात फारच थोड्या व्यक्तींकडे आहे. त्यामध्ये कल्पेन पारेख हे नाव अग्रेसर आहे.

तुमची स्वतःची गुंतवणूक कोणत्या योजनेत आहे? त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋणपत्रांच्या योजनांकडे दुर्लक्ष करू नका हे तर उत्तर मिळालेच त्याचबरोबर समभागसंलग्न बचत अर्थात इक्विटी सेव्हिंग फंड, रोखे योजना अशा योजनांमध्ये मी स्वतः गुंतवणूक केलेली आहे हेसुद्धा कल्पेन पारेख यांनी मोकळेपणाने सांगितले. मात्र याचा अर्थ बाजाराबद्दलची भीती आहे, असे अजिबात नाही तर वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक विभागलेली असावी आणि एकूण गुंतवणुकीत सोन्यालासुद्धा महत्त्व आहे, असे कल्पेन पारेख यांचे म्हणणे आहे.

डीएसपीने आणलेल्या इनोव्हेशन फंड या योजनेला योजनेच्या सुरुवातीपासूनच फक्त नियमित गुंतवणूक पद्धती (एसआयपी) या पद्धतीनेच गुंतवणूक स्वीकारली जाईल असे सांगणे आणि तो निर्णय राबविणे यांचे श्रेय कल्पेन पारेख यांना द्यावेच लागेल. पण त्यापेक्षाही कंपन्या ओएफएस ऑफर म्हणून शेअर विक्री झाल्यानंतर आणखी शेअरची विक्री करण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे डीएसपी म्युच्युअल फंडाने नव्या योजना आणण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या योजनांची आणखी विक्री करणे यावर भर दिला. पारेख आपल्या मुलालासुद्धा गप्पागोष्टीच्या माध्यमातून युनिट्सची संख्या वाढव असे सहजपणे सांगतात. गुंतवणूकदारांनीसुद्धा हा दृष्टिकोन आपल्या गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे.