अमेरिकेत ३ जुलै १९५१ ला जन्माला आलेला आणि १४ मार्च २०२२ या दिवशी मृत्यू पावलेला मिचेल प्राइस याचा गुंतवणूकदारांचा रॉबिनहूड असा लौकिक होता. मिचेलचे वडील ज्यू होते. न्यूयॉर्कला त्याची कपड्यांच्या विक्रीची साखळी दुकाने होती. मिचेलला वडिलांच्या व्यवसायात यायचे नव्हते म्हणून त्याने १९७३ ला पदवी प्राप्त केल्यानंतर एका कंपनीत नोकरीस सुरुवात केली. ही एक शेअर्स खरेदी विक्री करणारी कंपनी होती. १९८२ साली या संस्थेने त्याला भागीदारी दिली आणि १९८८ ला तर ज्या व्यक्तीने संस्था स्थापन केली होती त्या व्यक्तीचे निधन झाल्याने हा त्या कंपनीचा मालक बनला. मालक बनल्यानंतर त्याने कंपन्यांमध्ये दहशत निर्माण केली पण ती दहशत गुंतवणूकदारांच्या हिताची होती.

चेस मॅनहॅटन बँकेचे ६१ टक्के शेअर्स त्याने १९९५ मध्ये खरेदी केले. आणि त्याने कारभार सुधारावा म्हणून बँकेला सक्ती करण्यास सुरुवात केली. तोट्यात असलेल्या शाखाची विक्री करा, कंपनीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्या, पण शेअर्सची बाजारात किंमत वाढवण्यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न करायलाच हवे. शेवटी २८ ऑगस्ट १९९६ या दिवशी चेस मॅनहॅटन बँक केमिकल बँकिंग कॉर्पोरेशनला विकावीच लागली आणि ही विक्री झाल्यामुळे मिचेलला आपल्या गुंतवणुकीतून ७० टक्क्यांपेक्षा जास्त नफा झाला. अर्थातच विक्री करावी लागू नये म्हणून चेस मॅनहॅटन बँकेने वेगवेगळे प्रयत्न करून बघितले. मिचेलच्या बाजूने कायदेशीर लढाईसाठी एकही वकील मिळत नव्हता. परंतु मिचेलने हार मानली नाही आणि त्याला जे करायचे होते ते त्याने करून दाखवले.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो – पोर्टफोलिओचा भक्कम पाठीराखा : ‘एलआयसी’

पुढे पुढे तर अमेरिकेत असे व्हायला लागले की मिचेलने एखाद्या कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली की समजायचे तो शेअर वाढणारच. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना मिचेलबद्दल तिरस्कार निर्माण होईल एवढे त्या अधिकाऱ्यांना ऐकायला लागायचे. त्याने सुरू केलेली म्युच्युअल शेअर्स ही संस्था १९९६ ला फ्रँकलिन सिक्युरिटीजला विकली. त्या विक्रीचे त्याला ६७० दशलक्ष डॉलर मिळाले. १९९८ ला तो निवृत्त झाला. रोजच्या जबाबदाऱ्यातून मुक्त झाला. परंतु तरीसुद्धा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहण्याची जबाबदारी त्याने सांभाळली. पुन्हा २००१ मध्ये त्याने स्वतःची म्युच्युअल फंड कंपनी एमएफपी पार्टनर्स एलएलपी ही स्थापन केली. अनेक देणग्या दिल्या. एवढा पैसा कमावला की फोर्ब्स ४०० च्या यादीत त्याचा समावेश झाला. गुंतवणूकदारांसाठी त्याने काही ठोस नियम सांगितले होते. ते आजही तेवढेच समर्पक आणि महत्त्वाचे आहेत.

१) रोकड जास्त ठेऊ नका. तुमच्याकडे असलेल्या गुंतवणुकीपैकी ७० टक्के गुंतवणूक व्हॅल्यू (मूल्य ) असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. ३० टक्के गुंतवणूक आर्बिट्राज या प्रकारात गुंतवा. अडचणीत आलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा आणि अत्यंत थोडी रक्कम रोकड म्हणून ठेवा.

२) स्वस्त शेअर्स नेहमीच महागात पडतात. परंतु स्वस्त आणि महाग हे फक्त किमतीवरून ठरवता येत नाही.

३) गुंतवणूकदारांची वृत्ती मेंढरासारखी नसावी.

४) कंपनीचा मालक आहे असा विचार करा.

५) बाजारात जेव्हा एखाद्या विचाराने बाजार वाहवत जातो तेव्हा वेगळा विचार करा.

६) स्वतः संशोधन करा.

७) मागील आकडेवारीचा फार विचार करू नका.

८) भावनांवर नियंत्रण मिळवा भावना काबूत ठेवा.

९) शेअर्सचे भाव जेव्हा कोसळतात तेव्हा घाबरून शेअर्सची विक्री करण्याऐवजी, शेअर्समध्ये गुंतवणूक करा.

१०) एखाद्या कंपनीची एखाद्या वर्षी खराब आकडेवारी आली. एखाद्या कंपनीला तोटा झाला म्हणून लगेच त्या कंपनीतून बाहेर पडू नका.

११) मूल्यांवर आधारित गुंतवणूक करा.

१२) निर्णय घेण्याची कला अवगत करा. या बाजारात खूप हुशारी चालत नाही, पण निर्णय घेता आले पाहिजेत इतकी जाण हवी.

त्याने सांगितलेले हे नियम आजसुद्धा लागू होतात. मिचेलने पैसा कसा कमावला त्याबद्दल विस्तृत प्रमाणात लिहिता येईल. परंतु त्याने जो म्युच्युअल फंड चालवला तो त्याने एकट्याच्या विचाराने चालवला. त्यांच्या कंपनीचे जे गुंतवणूकदार होते, युनिटधारक होते, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा पुरेपूर मोबदला मिळायलाच हवा या विचाराने तो काम करायचा.

हेही वाचा : आरोग्य विमा नाकारला का जातोय? अंशतः अथवा पूर्णतः दावे नाकारण्याचे प्रमाण ९५ टक्के का? 

त्याच्या फंडाने चार योजना सुरु केल्या होत्या – १) म्युच्युअल शेअर्स २)म्युच्युअल क्वालिफाइड ३) म्युच्युअल डिस्कव्हरी ४) म्युच्युअल बेकन

या सगळ्या योजनांकडे व्यवस्थापनासाठी असलेली एकूण मालमत्ता १६ अब्ज डॉलर होती. त्याने अतिशय चांगली भांडवलवृद्धी मिळवून दिली. परंतु असे असतानाही अनेक गुंतवणूकदारांना त्याची किंवा त्याच्या संस्थेची माहितीच नव्हती. कारण का तर त्याने जाहिरातबाजी कधी केलीच नाही. तो असे म्हणायचा की, माझे काम हीच माझी जाहिरात आणि त्यामुळे वॉलस्ट्रीटवरचे आर्थिक क्षेत्रातले अतिशय हुशार गुंतवणूकदार डोळे झाकून त्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायचे. साहजिकच पुढचा प्रश्न निर्माण होतो त्याला चार योजना स्वतंत्रपणे चालवण्याची काय गरज होती? या चारही योजनांचे अस्तित्व निर्माण झाले ते वेगवेगळ्या परिस्थितीमुळे. एक फंड तर असा होता की, त्या फंडाचे जे मालक होते त्यांनीच मिचेलला सांगितले आमची योजना तूच सांभाळायची. म्युच्युअल क्वालिफाइड हा फंड करमुक्त खाती यासाठी कार्यरत होता. तर म्युच्युअल डिस्कव्हरी हा ग्लोबल फंड होता. चारही फंडांनी १० वर्षात १५ टक्क्यांपेक्षा जास्त चक्रवाढीने वार्षिक सरासरी परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला. बाजारात जेवढे चढ-उतार होते त्याच्या तुलनेने या योजनांमध्ये ५० टक्केसुद्धा चढउतार झाले नाहीत. म्युच्युअल शेअर या नावाची त्याची व्यवस्थापन करणारी जी कंपनी होती त्या कंपनीचे तर २० वर्षाचे रेकॉर्ड असे होते की, साधारणपणे चक्रवाढीने वार्षिक सरासरी २० टक्के परतावा तिने दिला. हे करण्यासाठी एखाद्या कंपनीत फार मोठ्या प्रमाणात पैसे लावण्याची त्याची ताकद असायची. कंपन्या जर पिंजऱ्यात अडकून पडल्या असतील तर ते पिंजरे तोडा असे त्याचा धडाका असायचा.

हेही वाचा : निर्देशांकांच्या नवीन उच्चांकांच्या आणि परताव्याच्या अपेक्षाही माफक ठेवल्या जाव्यात!

या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पहिला शेअर खरेदी केला तो त्याच्या वडिलांच्या शेअर दलालांकडे आणि तो शेअर ९० डॉलरपर्यंत पोहचला. त्याच्या वडिलांनी शेअर्स विकून टाकले. याने मात्र सांभाळले आणि त्यावेळेस त्याला शेअर्समधले काहीच कळत नव्हते. मात्र त्यावेळेस त्याने वडिलांच्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करून जोखीम कमी करण्यासाठी आर्बिट्राजचा वापर कसा करायचा याचे शिक्षण घेतले. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हे शिक्षण घेण्यासाठी ट्रेनी म्हणून कामसुद्धा केले. एक स्त्री आणि तीन सहाय्यक शेअर बाजारात काम करून प्रचंड पैसा कमवायचे हे ज्यावेळेस त्याने बघितले त्यावेळेस आपणसुद्धा हाच व्यवसाय करायचा हे त्याने पक्के ठरवले. एखादी कंपनी दिवाळखोर झाली की मिचेलने त्या कंपनीवर लक्ष केंद्रित केले असे नेहमी व्हायचे. अडचणीत आलेल्या कंपन्यांना पैसा उपलब्ध करून देणे आणि त्या बदल्यात त्या कंपन्यांचे शेअर बाजारभावापेक्षा कमी भावाने कंपनीच्या व्यवस्थापनाकडून खरेदी करणे आणि ते जास्त भावाने विकणे असे प्रकार त्याने केले. बाजारातली अशी एक एक माणसे आणि त्यांच्या करामती यांचा परिचय करून देणे एवढाच यामागचा माफक हेतू.

प्रमोद पुराणिक

Story img Loader