scorecardresearch

Salary Account वर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात जाणून घ्या

Salary Account Benefits: झिरो बॅलन्ससह सॅलरी अकाउंटमध्ये आणखी कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या

Salary Account वर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात जाणून घ्या
सॅलरी अकाउंटमध्ये मिळणाऱ्या सुविधा (संग्रहीत छायाचित्र)

ज्या बँक खात्यामध्ये दर महिन्याचा पगार येतो, त्या खात्याला ‘सॅलरी अकाउंट’ म्हटले जाते. सॅलरी अकाउंट हे सेविंग्स अकाउंट प्रमाणेच असते, पण यावर सेविंग्स अकाउंट पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध असतात. चेकबुक, एटीएम, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड या सेविंग्स अकाउंटप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सुविधांशिवाय इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत जाणून घ्या.

झिरो बॅलन्स सर्विस

सॅलरी अकाउंटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर झिरो बॅलन्स सर्विस उपलब्ध असते. म्हणजेच या खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची चिंता नसते. जर यामध्ये काहीही रक्कम नसेल तरीही बँकेकडुन कोणतीही पॅनल्टी आकारण्यात येत नाही.

आणखी वाचा: Zero Balance Account म्हणजे काय? ऑनलाईन सुरू करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

कर्ज घेणे सोपे होते
सॅलरी अकाउंटवरुन पर्सनल लोन, कार लोन, होम लोन मिळवणे सोपे होते, कारण बँक स्टेटमेंटद्वारे बँकेकडे उत्पन्नाचा ढोस पुरावा असतो. त्यामुळे सॅलरी अकाउंटचा हा फायदा असल्याचे म्हणता येईल.

ओवरड्राफ्ट सुविधा
२ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सॅलरी अकाउंटवर ओवरड्राफ्टची सुविधा उपलब्ध होते. २ महिन्यांच्या पगाराइतकी ओवरड्राफ्टची लिमिट असते.

एटीएम ट्रान्झॅक्शन
बहुतांश बँका सॅलरी अकाउंटवर फ्री एटीएम ट्रानजॅक्शन सुविधा उपलब्ध करतात. यात एसबीआई, आईसीआईसीआई बँक , एक्सिस बँक, एचडीएफसी बँक या बँकांचा समावेश आहे.

आणखी वाचा- ATM Card: एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ काय असतो? जाणून घ्या

वेल्थ सॅलरी अकाउंट
जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे असतील तर ते वेल्थ सॅलरी अकाउंट देखील उघडू शकतात. या अंतर्गत बँकेकडुन डेडिकेटिड वेल्थ मैनेजर देण्यात येतो, जो बँकेशी संबंधित सर्व काम पाहतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 15:49 IST

संबंधित बातम्या