नवीन आठवड्याच्या सुरुवातीला भारतातील आघाडीच्या ऑटो कंपन्यांच्या उत्साहवर्धक आकडेवारीवर लक्ष देऊया. बजाज ऑटो या भारतातील आघाडीच्या वाहन निर्मिती कंपनीची मे महिन्याच्या विक्रीची आकडेवारी नवीन उत्साह निर्माण करणारी आहे. ऑटो सेक्टर हे बाजार सुस्थितीत असल्याचे लक्षण स्पष्ट करणारे महत्त्वाचे सेक्टर आहे. बजाज ऑटोने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात दुचाकीतील विक्रीची वाढ दमदार आहे हे दिसून येते. जुन्या काळातील स्कूटर आणि रिक्षा विकणाऱ्या बजाजचे नवीन रूप सर्वसमावेशक दुचाकी निर्मिती करणारी कंपनी असे झाले आहे.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या १२५cc पेक्षा कमी क्षमतेच्या टू व्हीलर त्याचप्रमाणे शक्तिशाली २५० ते ४००cc च्या टू व्हीलर ची निर्मिती विक्री आणि निर्यातही कंपनीकडून केली जाते. गेल्या मे महिन्यातील दुचाकीच्या विक्रीच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात तब्बल २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यातीमध्ये थोडीशी घट झालेली दिसली तरी देशांतर्गत बाजारपेठेत बजाज ऑटोने तब्बल सव्वा दोन लाख दुचाकींची विक्रमी विक्री नोंदवली मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ही वाढ १००% पेक्षाही अधिक आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

सरत्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नव्हती, जो उत्साह आठवड्याच्या सुरुवातीला दिसला तसाच उत्साह या आठवड्यातही दिसेल का? याबद्दल शंका व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांतील बाजाराची वाटचाल नक्कीच उत्साहवर्धक आहे, पण या वाटेतील संभाव्य अडथळे समजून घ्यायला हवेत. रशिया युक्रेन युद्ध आटोक्यात येणार अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत, उलट रशिया विरुद्ध युक्रेनला मित्रराष्ट्रे अधिकाधिक रसद पुरवत आहेत. त्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये अनिश्चितता कायम राहू शकते, याचा परिणाम थेट भारतीय बाजारावरही होऊ शकतो.

युरोपातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महागाई ही युरोपातील कळीची समस्या असणार आहे. युरोपीय अर्थव्यवस्था सलग सहा ते नऊ महिने नकारात्मक वाढ दर्शवत राहिल्या म्हणजेच सलग तीन क्वार्टर अर्थात तिमाहीसाठी जीडीपीमध्ये घट नोंदवली गेली तर युरोपीय बाजारपेठा मंदीच्या चक्रात सापडल्या, असे म्हणता येते. अजून तशी कोणतीही ठोस चिन्ह दिसत नसली तरीही शंकेला वाव निश्चितच आहे. याचा परिणामही परदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर दिसून येतो.

हेही वाचाः Money Mantra : ‘टीसीएस’ उतरणार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्यवसायात !

यूएस डेट सिलिंग अर्थात अमेरिकन सरकार किती कर्ज उभे करू शकते याची मर्यादा वाढवण्याबद्दल सुरू असलेल्या सगळ्या उलट सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे अमेरिकन बाजार उत्साही असतील असे म्हणू या. भारताच्या केंद्रीय बँकेचे रिझर्व्ह बँकेचे धोरण कायम बाजार नियंत्रित करणारे ठरते. गेल्या वर्षात रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे महागाई दर नियंत्रणात आला आहे. मागच्या वर्षीच्या एप्रिलपासून महागाई दरात जी घट होण्यास सुरुवात झाली ती कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये नेमके काय बदल करते हे बघायला लागेल. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी अर्थात पतधोरण ठरवणाऱ्या समितीची बैठक आहे. या बैठकीत व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जातात का? व्याजदर नेमक्या कोणत्या दिशेला जातात यावर बँकिंग शेअर्सचे भवितव्य अवलंबून आहे. या आठवड्यात घडणारी आणखी एक महत्त्वाची घटना गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे एसबीआय कार्ड लिमिटेड आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये ३००० कोटी रुपये कर्ज स्वरूपाने उभारण्याबद्दल निर्णय घेणार आहे. भारतातील क्रेडिट कार्ड उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या एसबीआय कार्डने आपले व्यवसाय वाढवण्याचे धोरण यापूर्वी स्पष्ट केले आहे. टाटा मोटर्स आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट या कंपन्यांची वार्षिक सर्वसाधारण सभासुद्धा याच आठवड्यात आहे.

हेही वाचाः Money Mantra: प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्नाचे प्रकार किती? संपत्ती म्हणजे काय? (भाग दुसरा)

निफ्टीची कोणती लेव्हल महत्त्वाची?

१८४६० या लेव्हलपर्यंत निफ्टीचा प्रवास कसा होतो याकडे टेक्निकल चार्ट बघून गुंतवणूक करणाऱ्या आणि पोझिशन घेणाऱ्या सर्वांनी लक्ष द्यायला हवे. भारताचा जीडीपीचा आकडा समाधानकारक असल्याने पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारांकडेच आकर्षित होतील अशी चिन्ह आहेत.