गेल्या आठवड्याच्या लेखात भारतातील रिटेल क्षेत्र कशा पद्धतीने आकारास येत आहे याचा विचार आपण केला. या आठवड्यातील ‘क्षेत्र अभ्यास’ मध्ये याच क्षेत्रातील आघाडीच्या प्रमुख कंपन्यांचा व्यवसाय नेमका कसा आहे हे जाणून घेऊ.

टायटन कंपनी लिमिटेड

या कंपनीचे नाव रिटेल व्यवसाय क्षेत्रात कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या कंपनीचे बदलते व्यवसाय प्रारूप (बिझनेस मॉडेल) तुम्हाला समजून घ्यायला हवे. मुख्यत्वे घड्याळ हे उत्पादन विकणारी कंपनी आता आभूषणे, दागिने, चष्मे आणि लेन्स, भारतीय पारंपरिक आणि आधुनिक वस्त्र प्रावरणे, उंची सुगंधी द्रव्य अशा विविध प्रकारचे व्यवसाय करते. टायटन कंपनी तनिष्क, जोया, मिया, कॅरेट लेन अशा विविध नाममुद्रेच्या साखळी दुकानांद्वारे दागिने विक्रीच्या व्यवसायात जोरदारपणे उतरली आहे. भारतातील आकाराने मध्यम आणि उदयाला येणाऱ्या शहरांमध्ये ‘कॅरेटलेन’या ब्रँडची साखळी उभी राहत आहे. भारतातील शंभरहून अधिक शहरांमध्ये २७० पेक्षा अधिक दालनांची साखळी टायटनने तयार केली आहे. स्वतःचेच उत्पादन स्वतःच्याच दुकानात विकणे हे नवे व्यवसायाचे स्वरूप यानिमित्ताने पुढे येत आहे.

Bajaratali manas Shashidhar Jagadishan Managing Director HDFC Bank
बाजारातली माणसं : ब्रह्मा, विष्णू, महेश – शशिधर जगदीशन
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Hindustan Zinc Limited Investors Return on Capital Employed
शेअर बाजार- माझा पोर्टफोलियो: किफायतशीर उत्पादन; बहुमूल्य ‘रुपेरी’ बाज
My Portfolio, Avanti Feeds Limited,
माझा पोर्टफोलियो : भाव वधारलेल्या कोळंबीची अव्वल निर्यातदार
Cafe Coffee Day, accountants,
सुजल्यावर कळतंय मार कुठे पडला!
stock market, investing in stock market,
बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
sebi fined rs 650 crore to 22 companies including anil ambani part 2
अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)
Ajay Walimbe article Portfolio Market Structure Mutual Funds print eco news
शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!

डी मार्ट – ॲव्हेन्यू सुपर मार्ट

राधाकृष्ण दमानी यांनी ॲव्हेन्यू सुपर मार्ट या नावाने सुरू केलेल्या साखळी दुकानाने गेल्या वीस वर्षात आपला व्यवसाय मुंबईतील पवई येथे चालू केलेल्या पहिल्या दुकानापासून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू आणि पंजाब या राज्यातील एकूण ३७५ दुकानापर्यंत नेऊन ठेवला आहे. भारतीय समाजातील उदयास येणाऱ्या नव मध्यमवर्गाच्या गरजा ओळखून किफायतीशीर दरात आणि तरीही विविध प्रकारच्या वस्तू दुकानातून विक्रीला ठेवण्याची त्यांची योजना यशस्वी ठरताना दिसत आहे. अगदी महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर औरंगाबाद, धुळे, इचलकरंजी, जयसिंगपूर, कराड, मिरज, नंदुरबार, रत्नागिरी, सोलापूर अशा ठिकाणी डीमार्ट साखळी दुकान उपलब्ध आहे.

हे ही वाचा…अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल

भारतातील आधुनिक वस्त्र प्रावरणाच्या श्रेणीतील सर्वात आघाडीचे नाव म्हणजेच आदित्य बिर्ला फॅशन हे आहे. प्रत्येक वयोगटाच्या आणि प्रत्येक उत्पन्न गटाच्या गरजा ओळखून आदित्य बिर्ला फॅशन आपला व्यवसाय विस्तारत नेत आहे. जागतिक ब्रँड विकत घेऊन आणि नव्या नाममुद्रा जन्माला घालून बाजारात आपला दबदबा कायम ठेवण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. लुई फिलिप, व्हॅन हुसेन, एलनसोली, पीटर इंग्लंड, रीबॉक, फॉरएव्हर २१ असे अनेक तुमच्या आमच्या परिचयाच्या नाममुद्रा याच आदित्य बिर्ला कंपनीच्या मालकीचे आहेत. पेंटलून्स या आपल्या साखळी दुकानाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला कंपनीने आपला व्यवसाय विस्तारला आहे. १५,००० पेक्षा जास्त ठिकाणी आणि सहा हजार दालनांमध्ये पेंटलून्सच्या माध्यमातून कंपनी फॅशन व्यवसायात कार्यरत आहे. पुरुष स्त्रिया यांच्यासाठी पारंपरिक आणि पाश्चात्त्य शैलीतील वस्त्र प्रावरणे आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी पेंटलून्स बेबी आणि पेंटलून्स ज्युनिअर या ब्रँडनी हळूहळू व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे राल्फ लॉरेन, ट्रेड बेकर, हॅकेट, फ्रेड पेरी हे ब्रँडसुद्धा आदित्य बिर्ला फॅशन या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात.

आदित्य बिर्ला फॅशन उद्योग समूहाचे दहा ठिकाणी निर्मितीचे कारखाने आहेत, तर ११ ठिकाणी गोदामे आहेत. एकूण अकरा दशलक्ष चौरस फूट एवढ्या आकाराची स्वमालकीची साखळी दुकाने असल्यामुळे कंपनीला व्यवसाय विस्तार करण्यात अडचणी येणार नाहीत. आदित्य बिर्ला फॅशन या कंपनीच्या मालकीचे २१ प्रमुख नाममुद्रा असून त्यांची उत्पादने कंपनीच्या दुकानांबरोबरच ३७,००० अन्य दुकानांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हे ही वाचा…सावधान: प्राप्तिकर कायदा बदलणार

ट्रेंट लिमिटेड :

टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली पूर्वाश्रमीची लॅक्मे लिमिटेड ही कंपनी आता ट्रेंट या नावाने रिटेल व्यवसायात कार्यरत आहे. वेस्टसाइड, झुडीओ, स्टार मार्केट, मिसबू या विविध नाममुद्रेच्या माध्यमातून स्वतःची पुरवठा साखळी तयार करून कंपनीने आपला व्यवसाय विस्तारला आहे. तयार कपड्यांच्या बाबतीत डिझाइन, उत्पादन, पुरवठा, दुकाने हे सर्वच ट्रेंटच्या मालकीचे असल्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी दुसऱ्या व्यावसायिक भागीदारावर अवलंबित्व कमीत कमी आहे. वेस्टसाइड ही नाममुद्रा भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय आहेच, पण आता ई-कॉमर्सच्या आगमनानंतर वेस्टसाइडच्या संकेतस्थळावरून किंवा ‘टाटा न्यू’ या टाटांच्या ऑनलाइन पोर्टलवरून या वस्तू विकत घेता येतात. यामुळे कंपनीचे व्यवसाय क्षेत्र विस्तारले आहे. ‘वेस्ट साइड’या साखळी दुकानांची घोडदौड सुरूच आहे. भारतातील ९१ शहरांमध्ये २३२ दालनांमधून उत्पादने विक्री केली जाते. ‘झुडीओ’ या नाममुद्रेअंतर्गत तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून वस्त्र प्रावरणे आणि ॲक्सेसरीज बाजारात आणल्या गेल्या आहेत. १६४ शहरातून ५४५ साखळी दुकानाच्या माध्यमातून हा व्यवसाय चालवला जात आहे. ट्रेंट या कंपनीचे ‘स्टार’ या नाममुद्रेअंतर्गत भारतातील दहा शहरांमध्ये ६६ मॉल आहेत. तसेच ही उत्पादने कंपनीच्या संकेतस्थळावरून म्हणजेच ई-कॉमर्स या माध्यमातूनही विकत घेता येतात.

हे ही वाचा…क… कमॉडिटीचा: धोरणबदलांची क्षेपणास्त्रे

भारतातील नव मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग जसजसा वाढत जाईल तसे या क्षेत्रात कंपन्यांना व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळणार आहेत. या क्षेत्राशी सबंधित गुंतवणूक जोखीम एकच आहे, ती म्हणजे जर लोकांच्या हातातील खेळता पैसा कमी झाला तर विक्रीवर थेट परिणाम दिसून येतो. या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंझम्प्शन फंड या प्रकारच्या म्युच्युअल फंडातील योजनांचा विचार करता येईल.