ससा कासवाच्या शर्यतीत ससा हरलेला, पण समभागरूपी ससा हरून कसा चालेल? उत्साहवर्धक बातमीचे गाजर दाखवल्यावर हा ससा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत’ वरचे लक्ष्य गाठेल की, आळसावलेल्या सशावर गाजररूपी बातम्यांचा परिणामच होणार नाही? की ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ तोडत तो कासवगतीने अथवा जलद गतीने खालच्या लक्ष्याकडे वाटचाल करेल? हे आपल्यादृष्टीने महत्त्वाचे. याचाच आढावा हा बातम्यांमध्ये असलेल्या समभागांचा, क्षेत्रांचा ‘बाजार तंत्रकला’च्या अंगाने घेणारे हे साप्ताहिक सदर.

गेल्या वर्षीच्या ६ डिसेंबरच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात ‘रोख राखीव दर’ (सीआरआर) अर्ध्या टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने १.६० लाख कोटी रुपये बँकांना कर्ज वाटपासाठी अतिरिक्त उपलब्ध झाले. बरोबरीने सरकारी बँकांचे ‘मुदत ठेव संकलन’ वाढत असल्याने याचा सर्वात मोठा लाभार्थी हे सरकारी बँकिंग क्षेत्रच ठरेल. या अंगाने आज या क्षेत्रातील बँकांना विचारात घेऊया.

Reserve Bank of India has decided to change interest rate after almost five years
प्रतिशब्द : केल्याने व्याज कर्तन- Interest Rates – व्याज दर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
RBI repo rate cut
RBI repo rate cut : तुमचा ईएमआय किती कमी होणार?
banks interest rates in fds
RBI rate cut: बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरही घटणार? सध्याचे दर काय आहेत जाणून घ्या…
reserve bank of india marathi news
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेकडून यंदा व्याजदर कपात निश्चित?
RBI likely to cut repo rate by 25 basis points
या दोन कारणांनी होईल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात… ,नवीन गव्हर्नरांकडून पहिल्याच बैठकीत निर्णय अपेक्षित
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार

हेही वाचा – माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)

१) स्टेट बँक:

  • ३ जानेवारीचा बंद भाव: ७९३.४० रुपये
  • महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ८१५ रु.

उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: भविष्यात स्टेट बँक ८१५ रुपयांचा स्तर राखत, तिचे प्रथम वरचे लक्ष्य ८२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८५० रुपये.

बातमीचा उदासीन परिणाम: ८१५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७७५ रुपयांपर्यंत घसरण

२) कॅनरा बँक:

  • ३ जानेवारीचा बंद भाव: १०१.४५ रुपये
  • महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १०३ रु.

उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: भविष्यात कॅनरा बँक १०३ रुपयांचा स्तर राखत, तिचे प्रथम वरचे लक्ष्य ११० रुपये, द्वितीय लक्ष्य ११८ रुपये.

बातमीचा उदासीन परिणाम: १०३ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ९३ रुपयांपर्यंत घसरण.

हेही वाचा –  प्रतिशब्द :  अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 

सरते शेवटी निफ्टी निर्देशांक व बँक निफ्टीचा आढावा:

  • ३ जानेवारीचा बंद भाव: निफ्टी: २४,००४.७५ / बँक निफ्टी: ५०,९८८ .८०
  • महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: निफ्टी २३,९००/ बँक निफ्टी: ५१,५००

उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: २३,९०० / ५१,५०० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, निफ्टी / बँक निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २४,२५०/ ५१,९००, द्वितीय लक्ष्य २४,५००/ ५२,४००.

बातमीचा उदासीन परिणाम: निफ्टी तसेच बँक निफ्टी निर्देशांकाची २३,९०० / ५१,५०० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत २३,७०० / ५०,५०० स्तरापर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन आवश्यक आहे. गुंतवणुकीपूर्वी योग्य गुंतवणूक सल्लागाराशी परामर्श आवश्यक आहे.

Story img Loader