scorecardresearch

Premium

Money Mantra: सोने- प्रत्यक्ष खरेदी, ईटीएफ की, सोव्हिरियन बॉण्ड? लाभदायी काय ठरेल?

Money Mantra: सोनेखरेदी करताना नेमके काय करायचे? प्रत्यक्ष खरेदी, ईटीएफ की, सोव्हिरियन गोल्डबॉण्ड? यामध्ये नेमके काय लाभदायी काय ठरेल किंवा या खरेदी मार्गांचे फायदे- तोटे काय आहेत?

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 Online Purchase
सोव्हिरियन गोल्ड बॉण्ड की, इटीएफ, सोनेखरेदी (फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बहुतेक मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात मुला- मुलींच्या लग्नासाठी सोने जमा करण्याकडे कल असतो व जमेल तसे दर वेळी ५-१० ग्रॅम सोन्याचे वळे घेतले जात असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. मात्र आता प्रत्यक्ष सोने न घेता पेपर गोल्ड घेणे जास्त सोयीस्कर व फायदेशीर तसेच सुरक्षित झाले आहे. असे असले तरी बहुतेकांना या याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. आणि म्हणून आज याबाबत थोडक्यात माहिती घेऊ.

आणखी वाचा: Money Mantra: मेडिक्लेम पॉलिसी कुठली घ्यावी?

passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
sakhee and suvrat
“लग्न करण्याअगोदर…” ‘दिल दोस्ती दुनियादारी फेम’ सुव्रतने सांगितला लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव, म्हणाला, “त्या व्यक्तीबरोबर…”
festival shopping planning
Money Mantra: सणासुदीला खर्चाचे प्लॅनिंग कसे कराल?
Want cigarettes secret ganja Zomato delivery boy sent a shocking message to the customer the screenshot went vira
‘आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…

प्रत्यक्ष सोने (फिजिकल गोल्ड ) खरेदी न करता गोल्ड ईटीएफ व सोव्हिरियन गोल्ड बॉण्ड मार्फत सोने खरेदी करता येते व यालाच पेपर गोल्ड असे म्हणतात. विशेष म्हणजे यातील या दोन्हीही गुंतवणुकीतील मार्केट रिस्क (जोखीम) सारखीच असते, कारण याचे बाजारमूल्य सोन्याच्या बाजारमूल्याशी निगडीत असते. गोल्ड ईटीएफच्या एका युनिटची खरेदी बाजारातील एक ग्रॅम सोन्याच्या (०.९९५ शुद्धतेचा) दराने होत असते. तर सोव्हिरियन गोल्ड बॉण्डची खरेदी बाजारातील एक ग्रॅम सोन्याच्या (०.९९९ शुद्धतेचा) दराने होत असते. याशिवाय विविध म्युचुअल फंडांच्या गोल्ड फंड मार्फतही एकरकमी अथवा दरमहा ठराविक रकमेचे सोने एसआयपी पद्धतीनेही घेता येते.

आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते का आवश्यक असते?

सोव्हिरियन गोल्ड बॉण्डच्या गुंतवणुकीची मुदत ८ वर्षे असून ५वर्षांनंतर गरज पडल्यास ते विकताही येतात आणि विशेष म्हणजे मूळ गुंतवणुकीवर २.७५% दराने व्याज दिले जाते. बॉण्ड विकते वेळी असणाऱ्या युनिटची बाजारभावाने होणारी रक्कम अधिक मूळ गुंतवणुकीवर २.७५% दराने झालेले व्याज इतकी रक्कम गुंतवणुकदारास दिली जाते. मुदत संपताना जर सोन्याचे भाव खाली असतील तर गुंतवणूक पुढील ३ वर्षा करिता रोलऑन करता येते. मुदतीनंतर रिडीम केल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही व मिळणाऱ्या व्याजावर टीडीएसही कापला जात नाही. मात्र मिळणारे व्याज करपात्र असते. मात्र बॉण्डचे ट्रेडिंग केल्यास गोल्ड ईटीएफ प्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. यावरून असे लक्षात येईल की, गोल्ड ईटीएफ व सोव्हिरियन गोल्ड बॉण्डच्या गोल्ड म्युचुअल फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक केल्यास असणारी जोखीम सारखीच आहे व जी प्रत्यक्ष सोने(फिजिकल गोल्ड ) खरेदी करण्यात सुद्धा असते. मात्र अशा प्रकारे पेपर गोल्ड पद्धतीने खरेदी केल्यास सोन्याचा शुद्धतेची खात्री असते. शिवाय चोरीची भीती नसते, लॉकरचे भाडे भरावे लागत नाही. तसेच एकावेळी आपल्याला परवडू शकेल इतके सोने (१ ग्रॅम ते ५०० ग्रॅम) आपण हवे तेव्हा घेऊन आपल्या भविष्यातील गरजेइतके सोने सुरक्षितरित्या साठवू शकतो.

आणखी वाचा: Money Mantra: थोडी जोखीम पण जास्त परतावा; फिनटेक कंपन्यांचं काम कसं चालतं? (पूर्वार्ध)

डी-मॅट स्वरूपातही खरेदी शक्य

विशेष म्हणजे सोव्हिरियन गोल्ड बॉण्डमध्ये दरवर्षी जास्तीतजास्त ५०० ग्रॅम इतके सोने आपण खरेदी करू शकता. दर वर्षीच्या मूळ गुंतवणुकीवर आपल्याला २.७५% व्याजही मिळते. शिवाय रिडीम करताना त्यावेळच्या बाजारभावाने रक्कम तसेच व्याज मिळते या उलट गोल्ड ईटीएफ रिडीम केल्यास आपल्याला केवळ त्यावेळच्या बाजारभावाने रक्कम मिळते. सोव्हिरियन गोल्ड बॉण्ड आपल्याला डी-मॅट स्वरूपातही घेता येतात, शिवाय गरज पडल्यास कर्जासाठी तारण म्हणूनही देता येतात. वरील सर्व बाबीचा विचार करता भविष्यातील गरजेसाठी सोव्हिरियन गोल्ड बॉण्ड, गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युचुअल फंड पद्धतीने सोने खरेदी करणे निश्चितच हितावह व सुरक्षित आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Direct gold purchase from market or etf or souverain bond what can be more beneficial mmdc vp

First published on: 21-09-2023 at 21:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×