वित्तीय घोटाळा म्हणावे की हा सामाजिक प्रश्न याबाबत शाशंकता आहे, मात्र तरीही घोटाळा तर नक्कीच आहे. नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे आणि मग नोकरी न देता पोबारा करणे काही नवीन नाही, पण पैसे उकळल्यानंतर नोकरी देणे हा जरा नवीन प्रकारचा घोटाळा आहे. अहो समजले नाही का? कुठे नोकरी देतो तर स्टेट बँकेमध्ये, त्याचे पैसे तर घेतले आहेत आणि घोटाळा ही करायचा आहे. मग काय, चला नवीन शाखा उघडूया. हो पण चक्क खोटी शाखा आणि तेसुद्धा बँकेची!

हा घोटाळा घडला छत्तीसगढ येथील सक्ती जिल्ह्यातील सापोरा नावाच्या गावात. जिथे रातोरात स्टेट बँकेची एक शाखा स्थापन झाली आणि काही लोकांना नोकरी देण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ते ५ लाखांपर्यंत पैसे घेण्यात आले होते. खोटी नेमणूक पत्रे, खोटे प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक बँकेत करण्यात आली. १० दिवस ही शाखा चांगली चाललीसुद्धा. मात्र दुपारच्या जेवणाच्या सुटीच्या वेळेमध्ये काम करूनदेखील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत आणि त्यामुळे लोकांचा संशय वाढू लागला.

mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
investor panic due to share Market slump
बाजाराची घसरगुंडी, गुंतवणूकदारांची घाबरगुंडी!
Tax on someone elses income
दुसऱ्याच्या उत्पन्नावर कर

आणखी वाचा-बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी

अजय कुमार अगरवाल याने बँकेच्या एका किओस्क म्हणजे छोट्याशा खोपट्यासाठी बँकेकडे हेलपाटे मारले तरीही बँक ते द्यायला तयार नव्हते. मग अचानक अख्खी शाखाच कुठून आली असा त्याला प्रश्न पडला? त्याने मग डाब्रा येथील जवळच्या शाखेत जाऊन तक्रार केली की, माझ्या परवानगीचा अर्ज फेटाळताना आधी का नाही सांगितले आणि हा घोटाळा उघडकीस आला. तिथे काम करणाऱ्या तिघांना सप्टेंबर २०२४च्या अखेरीस अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे, पण घोटाळ्याचा म्होरक्या अजून पकडलेला नाही असे दिसते. नशीब १० दिवसांतच हे समजले नाहीतर मोठ्या ‘अर्था’चा अनर्थ झाला असता. अमिताभ बच्चन यांच्या ‘आँखे’ नावाचा एक चित्रपट होता, ज्यात बँक लुटण्यासाठी हुबेहूब तशीच शाखा बनवण्यात येते आणि ३ आंधळ्यांना बँक लुटण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. इथे फक्त उद्देश वेगळा होता, पण तरीही बॉलीवूड चित्रपटाची कथा नक्कीच शोभेल असा घोटाळा होता.

आणखी वाचा-मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….

असाच एक घोटाळा २०२० मध्ये तमिळनाडूमध्ये झाला होता. कमल बाबू नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाने हा कारनामा केला होता. वडिलांच्या निधनानंतर स्टेट बँकेत नोकरी मिळावी म्हणून त्याने बरीच खटपट केली. कारण तेदेखील त्याच बँकेत होते आणि त्याची आईसुद्धा स्टेट बँकेतच होती. पण बँकेने नोकरी नाकारली म्हणून पठ्ठ्याने चक्क स्वतःचीच हुबेहूब स्टेट बँक सुरू केली. त्याचे म्हणणे होते की, लोकांना फसवणे हे उद्दिष्ट नव्हते, पण स्वतःचा उद्योग करायचा म्हणून त्याने हे केले. कुठल्याही ग्राहकाने आपले पैसे बुडाले म्हणून तक्रारही केली नाही! खोटी कागदपत्रे, खोटे संकेतस्थळ, खोट्या नोटा ऐकले होते, पण खोटी शाखा उघडणारे बहुधा आपल्याकडेच असावेत.

पूर्वी आमची कुठेही शाखा नाही, असे दुकानात सर्रास लिहिले जायचे. नवीन काळात हे कोत्या प्रवृत्तीचे समजले जाते. गावोगावी शाखा उघडणारी स्टेट बँक आता म्हणत असेल आमची सगळीकडे शाखा असते, पण खरी का खोटी हे तुम्हीच आधी तपासून घ्या!

Story img Loader