अजय वाळिंबे
:फाइव्ह-स्टार बिजनेस फायनान्स लिमिटेड (बीएसई कोड ५४३६६३) संकेतस्थळ: http://www.fivestargroup.in प्रवर्तक: डी लक्ष्मीपथी बाजारभाव: रु. ४६६/- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: एनबीएफसी भरणा झालेले भाग भांडवल: रु.२९.५२ कोटी शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक १८.६१ परदेशी गुंतवणूकदार ४८.४८ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १७.५८ इतर/ जनता १५.३३ पुस्तकी मूल्य: रु. २५० ,दर्शनी मूल्य: रु.१/- लाभांश: २००% प्रति समभाग उत्पन्न: रु. ३७.२२ किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.५ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.६ डेट इक्विटी गुणोत्तर: १.११ कॅपिटल ॲडीक्वसी गुणोत्तर: ५१.८९% नेट इंट्रेस्ट मार्जिन: १९.८६% नक्त अनुत्पादित कर्ज प्रमाण: २% रिटर्न ऑन इक्विटी (ROE): १६.०६% बीटा : १

बाजार भांडवल: रु.१३,७४८ कोटी (स्मॉल कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८२८/३३८ गुंतवणूक कालावधी: ३६ महिने वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेली ”फाइव्ह-स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड” ही एक दक्षिण भारतातील आघाडीची बॅंकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी) आहे. दक्षिण भारतात प्राबल्य असलेली ही कंपनी सर्वात वेगाने वाढणाऱ्या एनबीएफसीपैकी एक आहे. कंपनी प्रामुख्याने सूक्ष्म-उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित व्यावसायिक कर्जे देण्याच्या व्यवसायात आहे.कपनीचे मुख्यालय चेन्नई येथे असून, भारतामधील ११ राज्ये/केंद्र शासित प्रदेश आणि १५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये तिच्या ८४४ शाखांचे विस्तृत जाळे कार्यरत आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये कंपनीची प्रमुख उपस्थिती आहे; या कामकाजाला १४,१५९ कर्मचाऱ्यांच्या कार्यबळाचा आधार लाभला आहे.

  • शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमधील ग्राहक
  • असे लोक जे प्रामुख्याने दैनंदिन रोख-आधारित व्यवसायातून उत्पन्न मिळवतात • ज्यांच्या कुटुंबाचा मासिक रोख प्रवाह २५,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान असतो • जे तारण म्हणून मालमत्ता देऊ शकतात (सामान्यतः सुमारे १० लाखांची जमीन / इमारत); आणि • ज्यांचे कुटुंबातील सदस्य कर्जासाठी सह-अर्जदार म्हणून सहभागी होतील. व्यवस्थापनाधीन मालमत्ता (ॲसेट अन्डर मॅनेजमेंट अर्थात एयूएम)

मार्च २०२६ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा कर्ज पोर्टफोलिओ १३,२२५ कोटींवर पोचला, जो वार्षिक आधारावर ११ टक्के वाढ दर्शवतो. आर्थिक वर्ष २०२६ साठी वितरित कर्जे: ४६७६ कोटी. सक्रिय कर्ज खाती: ४,९५,४३६ सरासरी कर्जाची रक्कम : ₹ ३.९० लाख भौगोलिक क्षेत्रांनुसार एयूएम आंध्र प्रदेश – ३६% तमिळनाडू – २८% तेलंगणा – १९% मध्य प्रदेश – ९% कर्नाटक – ५% इतर – ३% जोखमीचे सुयोग्य व्यवस्थापन कंपनीने एक असे व्यवसाय मॉडेल विकसित केले आहे, जे जोखमीची योग्य चौकट आणि कर्जाचा हप्ता व उत्पन्न यांचे आदर्श गुणोत्तर निश्चित करण्यावर आधारित आहे. ग्राहकांच्या नियमित आर्थिक जबाबदाऱ्या आणि इतर प्रसंग-आधारित भांडवली गरजा पूर्ण केल्यानंतरही, त्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसे आर्थिक स्रोत उपलब्ध असतील, याची खात्री करून वितरण केले जाते. त्यामुळे अनुत्पादित कर्ज मर्यादित राहतात. कंपनीची अनुत्पादित कर्ज २ टक्के असून कर्ज वसुलीची कार्यक्षमता ९७ टक्के आहे.

मार्च २०२६ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत ९ टक्के वाढ होऊन ते ८१७ कोटी रुपयांवर गेले आहे तर नक्त नफ्यात ४ टक्के घट होऊन तो २६९ कोटी रुपयांवर आला आहे. तर आर्थिक वर्ष २०२६ साठी कंपनीने गत वर्षीच्या तुलनेत ३,२१८ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर १,०९९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो केवळ २ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने प्रतिसमभाग २ रुपये (२०० टक्के) लाभांश जाहीर केला आहे. उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन, दक्षिणेतील राज्यांखेरीज इतर राज्यात कंपनीचा व्यवसाय विस्तार आणि उत्तम कर्जवसुली यामुळे हा शेअर सद्य भावात आकर्षक वाटतो.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com
(हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून तो गुंतवणूक सल्ला नव्हे प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)