डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थ क्षेत्रातील योगदानाबद्दल लिहिणे म्हणजे साक्षात देवाची आरती म्हणण्यासारखेच आहे. खरे तर इंद्रप्रसाद गोरधनभाई पटेल या माणसामुळे आजचा आर्थिक दिवस आपण बघू शकतो. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची पहिली पसंती १९७७ ते १९८२ या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राहिलेल्या आणि त्या वेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून नुकतेच निवृत्त झालेल्या पटेलांना होती. पण त्यांनी डॉ. मनमोहन सिंग या पदाला न्याय देऊ शकतील असे सांगत त्यांना पुढे केले. अर्थात डॉ. सिंग यांचे त्याआधीदेखील देशासाठी मोठे योगदान होतेच. अर्थशास्त्रामधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया होता. त्यांच्या विनयशीलतेमुळे आणि ज्ञानामुळे त्यांना आयुष्यात खूप वेळा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचे त्यांनी अक्षरशः सोने केले.
मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत कित्येक निर्णय मैलाचा दगड सिद्ध झाले. यात थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर), आधार, मनरेगा, पोलिओ निर्मुलन, माहितीचा अधिकार, स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ), मल्टिब्रँड रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूक, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा इत्यादी. जेवढे त्यांचे काम होते तेवढीच त्यांच्यावर टीकादेखील झाली. विशेषतः त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. भारतातील भांडवली बाजार, सर्व नियामक आणि त्या संबंधी असणाऱ्या सगळ्या सुधारणांचे जनक हे डॉ. मनमोहन सिंगच आहेत.
हेही वाचा – Money Mantra: आयुर्विम्याच्या पारंपारिक योजना- टर्म इन्शुरन्स की, एन्डोव्हमेंट अशुरन्स?
हेही वाचा – Money Mantra: आठवड्याअखेरीस विक्रीचा जोर कायम, निफ्टी १९७०० खाली
वर्ष १९९१च्या आर्थिक सुधारणांचा फायदा भारताला सगळ्यात जास्त झाला तो २००० ते २०१० च्या दशकात आणि सुदैवाने त्यातील बराचसा काळ ते स्वतः पंतप्रधानपदी होते. आज अचानक त्यांच्याविषयी लिहिण्याचे कारण म्हणजे २६ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग
@AshishThatte
ashishpthatte@gmail.com
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pm manmohan singh career info on occasion of his birthday print eco news ssb