फोसेको क्रुसिबल (इंडिया) लिमिटेड (बीएसई कोड ५२३१६०) संकेतस्थळ : www.morganmms.com प्रवर्तक: वेसुवियस समूहबाजारभाव: रु. १२००/ प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फौंडरी/ रीफ्राक्टरी उत्पादनेभरणा झालेले भाग भांडवल: रु. २.८० कोटीशेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ७६.७७परदेशी गुंतवणूकदार ०.१६ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.२४इतर/ जनता २२.८३ पुस्तकी मूल्य: रु. २५० दर्शनी मूल्य: रु. ५/-
लाभांश: ४२०%प्रति समभाग उत्पन्न: रु.३३.४३ किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.८समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३७.४ डेट इक्विटि गुणोत्तर: ०.०१इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: २५२ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): ३३.०५ % बीटा: ०.८०बाजार भांडवल: रु. ३६३७ कोटी (स्मॉल कॅप)वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १९६४/११५५ गुंतवणूक कालावधी : ३६ महीने
इतिहास
१९८६ मध्ये स्थापना. सुरुवातीला नाव ग्रीवज मोर्गनाइट क्रुसिबल लिमिटेड.
२००७ मध्ये नाव बदलून मोर्गनाइट क्रुसिबल (इंडिया) लिमिटेड .
२०२५ मध्ये फोसेको / वेसुवियस समूहाने ७५ टक्के हिस्सा विकत घेण्याचा करार केला.
२०२६ मध्ये नाव बदलून फोसेको क्रुसिबल (इंडिया) लिमिटेड करण्यात आले.
फोसेको म्हणजे फाउंड्री सर्व्हिस कंपनी. फोसेको क्रुसिबल आता वेसुवियस पीएलसी या जागतिक स्तरावरील समूहाशी संबंधित आहे. वेसुवियस हा स्टील आणि फाउंड्री उद्योगांसाठी रिफ्राक्टरी आणि प्रोसेस सोल्यूशन पुरवणारा मोठा बहुराष्ट्रीय समूह आहे. फोसेको क्रुसिबल (इंडिया) लिमिटेड सिलिकॉन कार्बाइड आणि क्ले ग्रॅफाइट क्रुसिबल आणि त्याच्या ॲक्सेसरीजचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनी उच्च-कार्यक्षमता क्रुसिबल, फाउंड्री उपभोग्य वस्तू आणि संबंधित रिफ्रॅक्टरी उत्पादनांची उत्पादक आहे. हे अलॉय धातू उद्योगांना क्रुसिबल पुरवते आणि फाउंड्री, डाय-कास्टर आणि धातू वितळवणाऱ्या सुविधांना वितळवण्याचे उपाय (मेल्टिंग सोल्युशन्स) पुरवण्यात विशेषज्ञ आहे, ज्यामध्ये जस्त, मौल्यवान धातू, ॲल्युमिनियम, तांबे/पितळ/कांस्य आणि इतर अलॉय धातूंचा समावेश आहे.
उत्पादन: बाजारपेठेतील अग्रगण्य सॅलामँडर (पूर्वीचे मॉर्गनाइट) आणि नोल्टिना क्रुसिबल्ससाठी कंपनी प्रसिद्ध असली तरीही, कंपनीचा पोर्टफोलिओ त्यापलीकडेही विस्तारलेला आहे.
प्रमुख उत्पादन श्रेणी: क्रुसिबल: सिलिकॉन कार्बाइड आणि ग्राफाइटसारख्या सामग्रीचा वापर करून, विशिष्ट औष्णिक आणि कार्यात्मक कामगिरीसाठी तयार केलेली, विविध आकार आणि प्रकारांची विस्तृत श्रेणी.
फाउंड्री उपभोग्य वस्तू: थर्मोकपल शीथ्स, कोटिंग्ज, डिगॅसिंग ट्यूब्स, लाँडर्स, सिमेंट्स आणि लॅडल लायनर्स.फर्नेस उद्योग: क्रुसिबल, क्युपल्स आणि फर्नेसची (फ्यूजन आणि क्युपेलेशन फर्नेससह) एक विशेष श्रेणी, जी प्रामुख्याने जगभरातील सुवर्ण शोध आणि खाणकाम उद्योगाला सेवा देते. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने एरोस्पेस, उत्पादन, वीज निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोकेमिकल, खाणकाम, औषध, वाहतूक, संरक्षण इ. क्षेत्रात वापरली जातात. कपंनीच्या प्रमुख ग्राहकांत टाटा ग्रुप, हिंदुस्तान पेन्सिल, भारतीय रेल्वे, जिंदाल सॉ, टायटन कंपनी, सुंदरम क्लेटन ग्रुप, महिंद्र सीआयई, आणि बजाज ऑटो इ. कंपन्यांचा समावेश करता येईल.भौगोलिक महसूल विभागणी :निर्यात ~४८%,देशांतर्गत ~५२%
देशनिहाय विक्री विभागणी :
आशिया आणि सुदूर पूर्व ~१४%,
युरोप ~१३%,
आफ्रिका आणि मध्य पूर्व ~७%,
उत्तर अमेरिका ~१३%,
इतर ~१%,
भारत ~५२%कंपनीचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. मार्च २०२६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २२०८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३९६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षाच्या तिंमाहीच्या तुलनेत उलाढालीत ७ टक्के वाढ साध्य केली असून निव्वळ नफा ८८ टक्क्यांनी वाढला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनीने ६ टक्के वाढीसह ७७७३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८०८ कोटी रूपयांचा (९ टक्के वाढ) नक्त नफा कमावला आहे. कंपनीने २१ रुपये प्रतिशेअर लाभांश जाहीर केला आहे. कुठलेही कर्ज नसलेली, उत्तम दर्जाचे उत्पादन असलेली ही बहुराष्ट्रीय कंपनी सध्याच्या अनिश्चित काळातील एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
