वसंत माधव कुळकर्णी
केंद्र सरकारच्या रोख्यांचा परतावा हा अर्थव्यवस्थेतील व्याजदर निश्चित करण्याचा मानदंड असतो. विविध मुदतीच्या रोख्यांचा परतावा (वाय अक्षावर) आणि रोख्यांची उर्वरित मुदत (एक्स अक्षावर) अशा आलेखाला ‘जी-सेक यील्ड कर्व्ह’ असे म्हणतात. चालू महिन्यात २२ सप्टेंबरच्या विविध मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांच्या बंद भावानुसार, अस्तित्वात आलेला ‘यील्ड कर्व्ह’ सोबत दिला आहे. दोन वर्षे मुदतीपर्यंत हा यील्ड कर्व्ह असे दर्शवितो की, ९० दिवसांच्या ट्रेझरी बिलवर ६.८५ टक्के वार्षिक परतावा असून दोन वर्षे मुदतीच्या रोख्यांवर ७.२४ टक्के वार्षिक परतावा आहे. दोन वर्षे ते १० वर्षे मुदतीत परतावा ७.२४ ते ७.११ टक्क्यांदरम्यान आहे. ११ वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परताव्याचा दर ७.३४ टक्के असून त्यापुढील मुदतीच्या रोख्यांच्या परताव्यात घसरण दिसत आहे. सप्टेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील रोखे सर्वाधिक परतावा देत असल्याचे दिसत आहे.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G sec yield curve bond investment central government bond markets print eco news amy