अजय वाळिंबे
हिंदुस्तान झिंक लिमिटेड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(बीएसई कोड ५००१८८)

संकेतस्थळ: https://www.hzlindia.com

प्रवर्तक: वेदान्त समूह

बाजारभाव: रु.४९७/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : खाणकाम

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ८४५.०६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६४.९२

परदेशी गुंतवणूकदार ०.७४

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार: ३२.५५

इतर/ जनता: १.७९

पुस्तकी मूल्य: रु. ३६

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: ६५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १९.३५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३५.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.५७

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ११.९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): ४६.२%

बीटा: ०.८

बाजार भांडवल: रु. २०९,९१५ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८०८/२८५

गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने

हेही वाचा >>>अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)

वर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेली हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही वेदान्त समूहाची ६४.९२ टक्के गुंतवणूक असलेली महत्त्वाची उपकंपनी आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जस्त (झिंक) उत्पादक कंपनी आहे, तसेच वार्षिक ८०० टनांहून अधिक उत्पादनासह जागतिक स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी चांदी उत्पादकदेखील आहे. भारतातील वाढत्या जास्त बाजारपेठेत कंपनीचा ७५ टक्के हिस्सा आहे. हिंदुस्तान झिंकच्या झिंक-लेड खाणी आणि स्मेल्टिंग कॉम्प्लेक्स राजस्थानमध्ये आहेत.

हिंदुस्तान झिंक कॅप्टिव्ह थर्मल पॉवर प्रकल्पासह ऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण असून कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्प उभारून हरित ऊर्जेमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीचे खाण आयुष्य २५ वर्षांपेक्षा जास्त आहे. हिंदुस्तान झिंकच्या कार्यामध्ये वायव्य भारतातील लेड-झिंक खाणी, हायड्रोमेटालर्जिकल झिंक स्मेल्टर, लेड स्मेल्टर, पायरो मेटलर्जिकल लेड-झिंक स्मेल्टर तसेच सल्फ्यूरिक ॲसिड आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्प यांचा समावेश आहे. एकूण धातू उत्पादन क्षमता १.१२३ मेट्रिक टन आहे. कंपनीच्या राजस्थानमधील पाच जिल्ह्यांमध्ये सुविधा आहेत ज्यात उदयपूर, चित्तोडगड, भिलवाडा, राजसमंद आणि अजमेर आणि उत्तराखंडच्या एका जिल्ह्याचा समावेश आहे. या सुविधांमध्ये झावर ग्रुप ऑफ माईन्स, राजपुरा दरिबा खाण, सिंदेसर खुर्द खाण, रामपुरा अगुचा खाण आणि कयाड खाण तसेच झिंक-लेड प्रक्रिया सुविधा ज्यामध्ये देबरी, चंदेरिया आणि दरिबा येथे स्मेल्टर आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथील सिल्व्हर रिफायनरी यांचा समावेश आहे. रामपुरा अगुचा येथील खाण जगातील सर्वात मोठी भूमिगत झिंक खाण आहे. कंपनी मुख्यत्वे जस्त-शिसे आणि चांदीच्या व्यवसायात असून तिच्या एकूण महसुलापैकी ६२ टक्के जस्तातून तर सुमारे १९ टक्के महसूल चांदीतून प्राप्त होतो. एकूण उलाढालीत कंपनीच्या निर्यातीचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि कमी किमतीच्या उच्च दर्जाच्या झिंक रिझर्व्हमुळे हिंदुस्तान झिंक आज जागतिक स्तरावर जस्ताची सर्वात किफायतशीर उत्पादक बनली आहे.

हेही वाचा >>>क… कमॉडिटीचा: धोरणबदलांची क्षेपणास्त्रे

कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असून कंपनीने त्यासाठी भांडवली खर्च, क्षमतावाढीसाठी विस्तारीकरण आणि नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. यात प्रामुख्याने पुढील प्रकल्पांचा समावेश करता येईल.

१. चंदेरियामधील फ्युमर आणि मिश्र धातू संयंत्राने त्यांचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे.

२. डेबरी येथे नवीन रोस्टर आणि हिंदुस्तान झिंक फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड पुढील आर्थिक वर्षात ५० किलो टन क्षमता पूर्ण करण्याचे लक्ष्य.

३. बामनिया कलान खाणींसाठी आवश्यक नियामक मंजुरी प्राप्त झाली असून कंपनी प्रकल्पाचे क्रियाकलाप सुरू करण्यासाठी व्यवसाय भागीदाराला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे

जून २०२४ साठी संपलेल्या तिमाही साठी कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांच्या वाढीने ८,१३० कोटी रुपयांची उलाढाल साध्य करून २,३४५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तो १९ टक्क्यांनी अधिक आहे.

वेदान्त समूह जस्त आणि शिसे, चांदी आणि धातूंच्या पुनर्वापर (रिसायकलिंग) व्यवसायाचे संभाव्य मूल्यलाभ भागधारकांना मिळवून देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यासाठी मूल्यांकन मापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात भागधारकांना त्याचा लाभ होऊ शकेल. काही दिवसांपूर्वीच प्रवर्तकांनी (वेदान्त) आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून म्हणजेच ‘ओएफएस’द्वारे आपला ३.१७ टक्के हिस्सा ४८६ रुपये प्रति समभाग दराने विकला. साधारण त्याच दरात उपलब्ध असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरू शकतो.

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच

टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण निश्चित करावे.

– अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindustan zinc limited investors return on capital employed print eco news amy
Show comments