scorecardresearch

Premium

Money Mantra: रिटायरमेंट प्लॅनिंग आणि इन्शुरन्स यांची सांगड कशी घालावी?

Money Mantra: बहुतांश वेळा रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करताना फक्त बचत आणि गुंतवणुकीचाच विचार केला जातो, पण ‘जोखीम सुरक्षेचा’ विचार मागे पडतो.

retirement planning & insurance
निवृत्तीचं नियोजन आणि विमा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी एक दमदार पोर्टफोलिओ असायला पाहिजे यात काही शंकाच नाही. पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होऊ शकतात याचा विचार करून आरोग्य विमा, जीवन विमा असायला हवा हेही तितकेच महत्त्वाचे. बहुतांश वेळा रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करताना फक्त बचत आणि गुंतवणुकीचाच विचार केला जातो, पण ‘जोखीम सुरक्षेचा’ विचार मागे पडतो. याच जोखीम सुरक्षेसाठी विमा काम करत असतो.

विम्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत आरोग्य विमा आणि जीवन विमा (लाइफ इन्शुरन्स)

what is IPO?
Money Mantra: प्रश्नं तुमचे उत्तरं तज्ज्ञांची; आयपीओ म्हणजे काय?
Viral of Dhol Vadak
”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने हटके स्टाइलमध्ये घातली लग्नाची मागणी, अट एकच; VIDEO तुफान व्हायरल
Food Vlogger vs Chaat Vendor Viral Video
फूड व्लॉगरने प्रश्न विचारताच कचोरी विक्रेता संतापला, व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
Want cigarettes secret ganja Zomato delivery boy sent a shocking message to the customer the screenshot went vira
‘आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…

जीवन विमा अगदी कमी वयातच घेतला पाहिजे. जसजसं वय वाढतं तशी वयाची जोखीम वाढते आणि म्हणूनच इन्शुरन्सचा प्रीमियम सुद्धा वाढत जातो. आपण ठणठणीत असताना कशाला हवा जीवन विमा ? असा विचार मनाला कॉन्फिडन्स देण्यासाठी चांगला आहे पण त्याचा उपयोग रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये होत नाही. आयुष्यात कोणत्या टप्प्यावर माणसाला काय होईल आणि काय होणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही. आपले शरीर स्वास्थ्य कितीही चांगले असले तरीही दुर्धर आजारपण, मृत्यू कधी येईल ? हे कोणीही सांगू शकत नाही. जरी आकस्मिक निधन झाले नाही तरीसुद्धा आजारपण अपघात हा आपली चूक नसतानाही होऊ शकतो. त्यासाठीच आरोग्य विमा असायला हवा.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायर होताना हाताशी किती पैसे असले पाहिजेत?

आरोग्य विमा आणि जीवन विमा या दोघांमध्ये गफलत नको.

आरोग्य विमा हा एखादी व्यक्ती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तर होणाऱ्या खर्चासाठी विकत घ्यायचा असतो आणि जीवन विमा हा एखाद्या पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित असतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले तर जीवन विम्याचे लाभ मिळतात. अपघात झाला आणि दोन-तीन महिने उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागले तर त्याचा खर्च खूप असतो. तेव्हा आरोग्य विमा आपल्याकडे हवाच. आरोग्य विमा विकत घेताना वैयक्तिक स्वरूपाचा (Personal Mediclaim Policy) किंवा फॅमिली फ्लोटर घेता येतो.

फॅमिली फ्लोटर योजनेमध्ये विमा घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील त्याने ठरवलेल्या सर्व सदस्यांना आरोग्य विम्याचे फायदे मिळतात. एक उदाहरण घेऊया, एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपये रकमेची फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतली तर एका वर्षाच्या कालावधीत ज्या कुटुंबातील सदस्यांचे नाव या पॉलिसीमध्ये आहे त्या सर्वांनाच आरोग्य विम्याचा लाभ होऊ शकतो. यामध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या अटी शर्ती वेगवेगळ्या असतात हे वेगळे सांगायला नकोच ! त्यामुळे पॉलिसी विकत घेताना त्या नक्की पहाव्यात. आरोग्य विमा विकत घेताना कंपनीशी संलग्न कोणकोणती हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलच्या साखळीमध्ये कॅशलेस विमा उपलब्ध आहे का ? आपण जिकडे राहतो किंवा आपण व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने जर सगळीकडे फिरत असू तर तिकडे ही कॅशलेस सुविधा असलेली हॉस्पिटल आहेत का ? याची आवर्जून खात्री करून घ्यावी. यामुळेच गरज पडली तर आपल्याला आरोग्य विम्याचा फायदा होणार आहे.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय? काय कराल? काय टाळाल?

आरोग्य विमा किती वर्षापर्यंत?

आरोग्य विमा बंद करावा का ? या प्रश्नाचे उत्तर खरे तर ‘नाही’ असे आहे. वयाच्या साठीनंतर आरोग्य विम्याचा हप्ता वाढतो. त्यामुळे बरेचदा आरोग्य विमा टाळण्याकडे लोकांचा कल दिसतो. एवढा मोठा प्रीमियम भरून फक्त दोन आणि तीन लाख रुपयांचा फायदा मिळणार ? असा विचार केला जातो.

एक लक्षात घ्या जर एखादा छोटा अपघात वगैरे झाला मोतीबिंदू सारख्या छोट्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या तर यासारख्या खर्चासाठी खिशातले पैसे देण्यापेक्षा आरोग्य विमा असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

उमेदीच्या काळात विमा हवाच

वय वर्ष 40 ते 55 हा आपला उमेदीचा काळ असतो. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. अशावेळी आपल्यावर विम्याचे कवच असणे अत्यावश्यक आहे. चैनीच्या वस्तूवर पैसे कमी खर्च केले तर एक वेळ चालतील पण विम्याचा खर्च टाळणे हा धोकादायक निर्णय आहे.

रिटायरमेंट प्लॅन म्हणजे फक्त पैशाची सुरक्षितता नसून आपल्या एकूणच आयुष्याची काळजी आपण करणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to do retirement planning keeping insurance in mind mmdc psp

First published on: 28-09-2023 at 12:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×