देव प्लास्टिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड
(बीएसई कोड: ५४३५४७)
संकेतस्थळ : www.ddevgroup.in
प्रवर्तक: नारिंदर सुराणा
बाजारभाव: रु. ३३६/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : पॉलिमर/ विशेष रसायने
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १०.३५ कोटीशेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.९७
परदेशी गुंतवणूकदार ०.०२ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.३१ इतर/ जनता २४.७०
पुस्तकी मूल्य: रु. ६३.८
दर्शनी मूल्य: रु. १/-
गतवर्षीचा लाभांश: १००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १८.०१
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३९.९
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १३.४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): ४१.९
बीटा : १.१
बाजार भांडवल: रु. ३४७६ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४५८/१६०
गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने
देव समूहाची स्थापना वर्ष १९७७ मध्ये झाली. कंपनी पहिल्यापासून भारतातील एक दर्जेदार पॉलिमर कंपाउंडर म्हणून ओळखली जाते. वर्ष २०२१ मध्ये कल्पना इंडस्ट्रीजपासून विभाजन (डीमर्ज) झालेल्या देव प्लास्टिक्स इंडस्ट्रीजने आज भारतातील विशेष संयुगे बनवणाऱ्या मोठ्या उत्पादकाचा दर्जा प्राप्त केला आहे. कंपनीची वार्षिक क्षमता सुमारे २.५० लाख मेट्रिक टन असून कंपनी पीई कंपाऊंड्स (सिओप्लस, एक्सएलपीईसारखी पोलिथिलीन बेस्ड उत्पादने) तसेच पॉवर केबल उद्योगासाठी उत्पादने करते. कंपनीची उत्पादने विविध उद्योगात वापरली जात असून त्यांत बिल्डिंग वायर, कंट्रोल आणि इंस्ट्रुमेंटेशन केबल, वायर आणि केबल उद्योग तसेच पॅकेजिंग, पादत्राणे इत्यादीचा समावेश होतो. तसेच कंपनीची उत्पादने तारांचे इन्सुलेशन आणि जॅकेटिंगसाठी वापरतात.
कंपनीचे पाच उत्पादन सुविधा प्रकल्प असून तीन मुख्य प्रकल्प दादरा, सिल्वासा आणि कोलकाता येथे आहेत. या सुविधा प्रकल्पांमधून प्रामुख्याने अँटीफॅब कंपाऊंड/ मास्टर बॅच, पीव्हीसी कंपाऊंड, सिओप्लास कंपाऊंड / एक्सएलपीई कंपाउंड/ सेमिकॉन्स, इंजिनीअरिंग प्लास्टिक्स इ. विविध उत्पादने तयार केली जातात. कंपनीने वार्षिक ६,००० मेट्रिक टनचा हॅलोजन फ्री फ्लेम रिटार्डंट (एचएफएफआर) संयुगे तयार करण्याचा प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. उत्पादनांची वाढती मागणी पाहता येत्या तीन वर्षांत ही क्षमता २०,००० मेट्रिक टनांवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
हेही वाचा – बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा
भारतात तीन क्षेत्रीय कार्यालये असलेली देव प्लास्टिक्स इंडस्ट्रीजची उत्पादने केबल आणि वायर, पॅकेजिंग, फुटवेअर, पाइप, ऑटोमोबाइल, कंझ्युमर ड्युरेबल, इलेक्ट्रिकल उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि लाइट फिटिंग्ज आणि इलेक्ट्रॉनिक्स इ. विविष उद्योगाला पूरक आहेत. आज जगभरातील ५५ हून अधिक देशात कंपनी आपली उत्पादने निर्यात करत असून कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत अपार इंडस्ट्रीज, केईआय केबल्स, डायनॅमिक केबल्स, फिनोलेक्स केबल, केईसी इंटरनॅशनल तसेच हॅवेल्स इंडिया या कंपन्यांचा समावेश होतो.
कंपनीच्या एकूण महसुलपैकी सुमारे ३० टक्के महसूल निर्यातीचा आहे. आधुनिक उपकरणांमध्ये गुंतवणूक, उत्पादनात वैविध्य आणि जागतिक दर्जाच्या संशोधन संसाधनांमुळे (रिसर्च सेटअप) तसेच उद्योगातील पुरवठादार तसेच ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण केल्यामुळे हे साध्य होऊ शकले.जून २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने ६२५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५६ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची वार्षिक उलाढाल २,४३१ कोटींची होती. येत्या पाच वर्षांत ही उलढाल ५,००० कोटींवर नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याच कलावधीत कंपनी सुमारे ३०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करून विस्तारीकरण करत आहे. आगामी काळातील पॉवर केबलची मागणी पाहता देव प्लास्टिक्स इंडस्ट्रीजचे भवितव्य उज्ज्वल वाटते.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात. यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
stocksandwealth@gmail.com
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• हा गुंतवणूक सल्ला नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.