scorecardresearch

‘इन्शुरन्सदेखो’ची १५ कोटी डॉलरची निधी उभारणी

अंकित अग्रवाल आणि ईश बब्बर यांनी २०१६ मध्ये ‘इन्शुरन्सदेखो’ची स्थापना केली होती. ‘इन्शुरन्सदेखो’ने मालिका ए अंतर्गत १५ कोटी अमेरिकी डॉलरची निधी उभारणी अलिकडेच केली.

Insurance Dekho company fund
‘इन्शुरन्सदेखो’ची १५ कोटी डॉलरची निधी उभारणी (Image Source – Financial Express)

मुंबई : विमा वितरणांती तंत्रज्ञानाधारीत कंपनी ‘इन्शुरन्सदेखो’ने मालिका ए अंतर्गत १५ कोटी अमेरिकी डॉलरची निधी उभारणी अलिकडेच केली. भागभांडवल आणि कर्ज असे दोहोंचे मिश्रण असलेल्या निधी उभारणीत, गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंट आणि टीव्हीएस कॅपिटल फंड यांच्यासह इन्व्हेस्टकॉर्प, अवतार व्हेंचर्स आणि लीपफ्रॉग इन्व्हेस्टमेंट्स यांनी सहभाग केला.

हेही वाचा – जाहल्या काही चुका… : दरवळतो पुरिया…

हेही वाचा – ‘एटीएम’ आणि त्याचा जागतिक इतिहास

नव्याने उभारलेल्या निधीचा वापर तंत्रज्ञान सक्षमतेसाठी, नवीन बाजारपेठांमध्ये विस्तारासाठी, आरोग्य आणि जीवन श्रेणींमध्ये नवीन नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या प्रस्तुतीसाठी, तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी नेतृत्वदायी संघाला मजबूत करण्यासाठी केला जाईल. अंकित अग्रवाल आणि ईश बब्बर यांनी २०१६ मध्ये स्थापित केलेल्या ‘इन्शुरन्सदेखो’ने मार्च २०२३ पर्यंत ३५०० कोटी रुपयांचे वार्षिक विमा हप्ते संग्रहणाचे आणि २०२३ कॅलेंडर वर्षाच्या अखेपर्यंत त्यांच्या व्यासपीठावर दोन लाखांपेक्षा जास्त विमा सल्लागारांना सक्रिय करण्याचे उद्दिष्ट राखले आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 09:59 IST