Money Mantra प्रश्न १: इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असणारा ‘फ्री लूक पिरीयड’ म्हणजे काय ?

उत्तर : पॉलिसी घेत असताना कधी कधी चुकीची पॉलिसी अपुऱ्या माहितीमुळे किंवा दबावाखाली घेतली जाते, अशी घेतलेली पण नको असलेली पॉलिसी या कालावधीत रद्द करता येते . या कालावधीस ‘फ्री लूक पिरीयड’ असे म्हणतात.

Jugaad Video do clean furniture at home with the help of single plastic bottle
Jugaad Video : फक्त १ बाटलीने करा तुमच्या घरातील सर्व फर्निचर स्वच्छ; जाणून घ्या, कसे?
a girl's hair style goes viral on social media
‘या’ हेअर स्टाइलला तुम्ही कोणते नाव देणार? मुलीच्या हेअर स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO
Idli batter recipe
VIDEO : एकदा इडलीचे पीठ तयार करा अन् चार महिने पाहिजे तेव्हा इडली बनवून खा, पाहा भन्नाट रेसिपी
Mona Singh Lost 15 Kgs Weight
‘मुंज्या’तील पम्मी म्हणजे मोना सिंगने १५ किलो वजन कमी वेळात घटवलं! वजन कमी करताना व्यायाम व झोप किती असावी? डॉक्टरांकडून ऐका
Car Tips
कारचे ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या यामागील खरं कारण
vat purnima 2024 how to choose perfect jackfruit how to pick a ripe jackfruit easy tips to buy cut and clean jackfruit difference between kapa fanas barka fanas
फणस खरेदी करताय? मग कापा आणि बरका फणसातील फरक ओळखायचा कसा? ते समजून घ्या….
Monsoon bike driving tips why does bike or scooter tyre burst the prevention will save your life during riding
बाईक, स्कूटरचालकांनो ‘ही’ एक चूक बेतू शकेल जीवावर; वेळीच ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Chicken handi in red gravy recipe in marathi chicken handi recipe in marathi
एकाच चवीचं चिकन खाऊन कंटाळलात? रविवारी करा स्पेशल गावरान पद्धतीची “चिकन हंडी”

प्रश्न २ : फ्री लूक पिरीयड किती दिवसांचा असतो?
उत्तर : या आधी हा कालावधी डिजिटल स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी ३० दिवस तर प्रत्यक्ष स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी १५ दिवस एवढा होता. मात्र आता आयआरडीएने नुकत्याच दिलेल्या सूचनेनुसार १ एप्रिल २०२४ पासून हा कालावधी दोन्ही स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी ३० दिवस एवढा असेल.

हेही वाचा…Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

प्रश्न ३: फ्री लूक पिरीयड कसा ठरविला जातो?
उत्तर : पॉलिसीधारकास पॉलिसी मिळालेल्या तारखेपासून (प्रत्यक्ष किंवा मेल/ एसएमएस/ व्हॉटस्पअ‍ॅवर मिळालेल्या तारखेपासून) ३० दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करता येते.

प्रश्न ४: फ्री लूक पिरीयडमध्ये पॉलिसी रद्द करताना खर्च होतो का?
उत्तर : फ्री लूक पिरीयडमध्ये पॉलिसी रद्द करताना स्टॅम्प ड्युटी, कुरिअर चार्जेस यासारखे अनुषंगिक खर्च वजा जाता प्रीमियमची उर्वरित रक्कम परत दिली जाते.

हेही वाचा…क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

प्रश्न ५: : फ्री लूक पिरीयड मध्ये पॉलिसी रद्द केल्यानंतर किती दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होत असते?
उत्तर : आयआरडीएच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया १५ दिवसांच्याआत पूर्ण करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे इन्शुरन्स कंपन्या ही प्रक्रिया ५ ते ६ दिवसांत पूर्ण करतात.