प्रसन्न पाठक
भारतीय गुंतवणूकदारांसाठी, पुढील दशक परतावा मिळवण्याच्या दृष्टीने एक अतिशय कठीण काळ असेल. मोजक्या क्षेत्रांमधील मोजक्या कंपन्यांची कामगिरी आणि एकंदर भांडवली बाजाराची कामगिरी यात तफावत असेल आणि जलद गतीने बदलणाऱ्या गुंतवणूक शैली, देशांतर्गत इक्विटी, सोने, निश्चित उत्पन्न आणि जागतिक स्तरावरील गुंतवणूक अशी विभागणी करणे आवश्यक असेल. एकाच मालमत्ता वर्गातून (देशांतागत इक्विटी) परतावा मिळविणे कठीण होईल.
याचा अर्थ असा की, विवेकी गुंतवणूक एक जटिल प्रक्रिया बनेल जिथे मालमत्ता विभाजन हे केवळ टिकून राहण्याचेच नाही तर सातत्याने परतावा मिळविण्यासाठी प्राथमिक साधन असेल. या बदलाला चालना देणाऱ्या काही कारणांबाबत खोलवर जाऊन या बदलाबाबत अधिक तपशीलवार समजून घेऊ या;
विस्तृत नेतृत्वाचा अभाव
आपण अशी घटना पाहात आहोत, जिथे निर्देशांकातील प्रभावी कंपन्यांचा एक छोटा संच निर्देशंकाच्या परताव्यांत मोठा वाटा उचलत आहे. जेव्हा असे घडते तेव्हा सक्रिय फंडांच्या निधी व्यवस्थापकांना दुधारी तलवारीचा सामना करावा लागतो. जर त्यांच्याकडे या कंपन्या नसतील तर परताव्याच्या स्पर्धेत ते मागे पडतात, दुसरीकडे, जर ते त्यांच्या पोर्टफोलिओत असतील तर त्यांना निष्क्रिय व्यस्थापानासाठी सक्रिय व्यवस्थापकीय शुल्क भरावे लागते.
निर्देशांक गुंतवणूकदारासाठी, जोखीम म्हणजे मोठी मालमत्ता कमी कंपन्यांत गुंतविण्याची जोखीम अर्थात केंद्रीकरण. अनेकांचा असा विश्वास आहे की ते संपूर्ण अर्थव्यवस्थेत वैविध्यपूर्ण आहेत, परंतु त्यांना हे लक्षात येते की त्यांचा व्यापक निधी प्रत्यक्षात तीन किंवा चार मोठ्या नावांवर आणि संबंधित निर्देशांकात सर्वात जास्त प्रभाव असलेल्या क्षेत्रांत गुंतवणूक करणे होय.
निर्देशांक व्यवस्थापन
ज्या कंपन्यांची भरीव कामगिरी आहे अशा कंपन्या आणि सुमार कामगिरी असलेल्या कंपन्यांमुळे वरवर पाहता निर्देशांक स्थिर दिसत असला तरी, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या आणि गचाळ कामगिरी असलेल्या कंपन्या यांच्या मूल्यांकनातील फरक लक्षणीयरीत्या वाढला आहे. या वातावरणात, योग्य उद्योग क्षेत्रातील कंपन्या निवडणे हे साधारण उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनीत गुंतवणूक असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
तुम्ही विचाराल, आता का? याचे उत्तर हे आहे की, भारताची अर्थव्यवस्था सध्या संरचनात्मक बदलांमधून जात आहे – मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांवर खर्च, उत्पादन प्रोत्साहन आणि बदलते व्याजदर. हे बदल सर्वच कंपन्यांना एकसमान पद्धतीने लागू होत नाहीत. हे एका उदाहरणाने जाणून घेऊ. दोन गुंतवणूकदार, भारतीय समभागात त्यांच्या पोर्टफोलिओचा ६० टक्के हिस्सा राखून आहेत. गुंतवणूकदार ‘अ’ पूर्णपणे निफ्टी ५० फंडात आहे. गुंतवणूकदार ‘ब’च्या पोर्टफोलिओत लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपपैकी ‘मॅन्युफॅक्चरिंग थीमॅटिक’ फंडात लहान भाग गुंतविला आहे.
तसेच १५ टक्के गुंतवणूक सार्वभौम सुवर्ण रोख्यांत आहे. जर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात घसरण झाली आणि रुपया कमकुवत झाला, तर गुंतवणूकदार ‘ब’ चे सोने आणि देशांतर्गत उत्पादन एक्सपोजर स्थिरीकरण म्हणून काम करू शकते, तर गुंतवणूकदार ‘अ’ च्या पोर्टफोलिओवर परकीय अर्थसंस्थांच्या (राखून ठेवण्याचा किंवा विकण्याच्या) निर्णयावर ठरेल.
गेल्या अनेक वर्षांपासून, कोणत्याही किमतीवर गुणवत्ता (QAAP) मंत्राने गुंतवणुकीवर वर्चस्व गाजवले. तथापि, अलीकडेच, आपण मूल्य, सार्वजनिक उपक्रम आणि आवर्तनीय क्षेत्रात जलद बदल पाहिले आहेत – बहुतेकदा, हे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय येतात. हे बदल आठवड्यातही होऊ शकतात, ज्यामुळे खरेदी करा आणि राखून ठेवा, पोर्टफोलिओ हे आळशी रणनीती लयाला गेली आहे. याचा एक अर्थ असा आहे की, गुंतवणूकदारांना आता शैली-अंध राहणे परवडणारे नाही.
ध्येय म्हणजे बारमाही परतावा देणारी वैशिष्ट्ये असलेला पोर्टफोलिओ तयार करणे, जेणेकरून बाजारात अचानक बदल झाल्यास मूल्य वाढले आहे किंवा इतर काही थीम पुन्हा अनुकूल असल्याचे ठरवल्यावर तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य किमान टिकून ठेवेल याची खात्री करणे होय.
पुनर्संतुलन वारंवारता
परकीय अर्थसंस्था विकण्यास वाट पाहात नाहीत. ते जागतिक स्तरावर शिस्तबद्ध पुनर्संतुलन करत असतात. बरेच जण “थ्रेशोल्ड रीबॅलन्सिंग” वापरतात. उदाहरणार्थ, जर बाजारातील तेजीमुळे त्यांचा इक्विटी पोर्टफोलिओ वर गेला तर समभाग संलग्न अर्थात इक्विटी ६० टक्क्यांवरून ६५ टक्के होतो. अशा वेळी परकीय अर्थसंस्था भारतीय समभागांचे प्रमाण कमी करतात आणि अतिरिक्त गुंतवणूक रोखे किंवा सोन्यात हलवतात. जिथे पुढील तेजीची शक्यता असू शकते, हे सतत विकसित होत असलेल्या संकेतांच्या आधारावर असते.
हे केवळ नफावसुली करण्याबद्दल नाही तर समभाग गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापित करण्याबद्दल आहे. मूळ विभाजनानुसार पोर्टफोलिओचे नियमित पुनर्संतुलन करून, ते एका क्षेत्रातील एकच देशातील एकाच मालमत्ता वर्गातील जोखीम एखाद्या अपघातामुळे पोर्टफोलिओचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरणात नाही, यासाठी हे केले जाते.
तर, उपाय काय आहे? एक निधी व्यवस्थापक या नात्याने माझे असे सांगणे आहे की, हायब्रिड आणि मल्टी-ॲसेट फंड. फंड ऑफ फंडस आणि इक्विटी आणि रोखे गुंतवणूक करणारे फंड सोने (आणि कधी कधी रिट्स) दरम्यान मालमत्तेचे विभाजन करावे. भारतात या प्रकारच्या फंडांना मोठी मागणी आल्याचे दिसत आहे.
यासह सर्वात मोठा फायदा म्हणजे कर कार्यक्षमता. हे घडते कारण फंडामध्ये पुनर्संतुलन केल्याने एखाद्या व्यक्तीला भांडवली नफ्यावरील कर दायित्व तयार होते. हा व्यवहार म्हणजे नियंत्रणाचा अभाव आणि सरासरी कामगिरीची क्षमता. गुंतवणूकदारांनी फंडाच्या सक्रिय वाटपातील बदलांमुळे खरोखरच मूल्य वाढते की फक्त खर्चाच्या प्रमाणात भर पडते हे तपासले पाहिजे.
त्यांच्या लोकप्रियतेचा अर्थ असा नाही की, कंपन्यांची निवड जुनी रणनीती झाली आहे. ती फक्त वेगाने आणि वेगाने पुढे जात आहे. स्मॉलकॅप परिघात किंवा ग्रीन एनर्जी किंवा स्पेस-टेकसारख्या उदयोन्मुख, विशिष्ट क्षेत्रांमध्ये, सखोल आणि काळजीपूर्वक संशोधन अजूनही मोठ्या प्रमाणात अल्फा निर्मिती करू शकते. हे सॅटेलाइट गुंतवणूकदारासाठी योग्य आहे, ज्याने त्याचे मुख्य बीटा क्रमवारी लावले आहे आणि या प्रकारच्या गुंतवणुकांत भांडवलाचा एक छोटासा हिस्सा वापरला पाहिजे.
टोकाचे मालमत्ता विभाजन टाळणे
या सर्व बाबतीत, एखाद्याला फोमो (मिस आउटची भीती) बाजूला ठेवून तर्कशुद्ध गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कळपाची मानसिकता टाळा – जर रस्त्यावर एखाद्या विशिष्ट कंपनीचे शेअर, क्षेत्र किंवा थीम-आधारित कल्पनेवर गुंतवणूक केली जात असेल तर सहज पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे. वेगवेगळ्या घटकांमध्ये विविधता आणा: उदाहरणार्थ, मजबूत रुपयामुळे फायदा होणाऱ्या काही गोष्टी आणि कमकुवत रुपयामुळे फायदा होणाऱ्या काही गोष्टी यांचा विचार करा. विचारा, जर महागाई जास्त काळ जास्त राहिली तर माझ्या मालमत्ता वाटपाचे काय होईल ?
शेवटी, भारतातील पुढील दशक सर्वात मोठ्या संकल्पनेने जिंकले जाणार नाही, तर सर्वात शांत, सर्वात शिस्तबद्ध मालमत्ता विभाजनाने जिंकले जाईल. या उत्क्रांतीची बीजे आधीच पेरली गेली आहेत. आपण उगवण्याची वाट पाहू.
(लेखक प्रसन्न पाठक, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
