आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे ३.५ लाख कोटींची मालमत्ता व्यवस्थापित करतात. त्यांना समभाग संशोधन आणि मालमत्ता व्यवस्थापनाचा ३० वर्षांहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. ते फंड व्यवस्थापक आणि विश्लेषकांचा समावेश असलेल्या संपूर्ण गुंतवणूक संघाचे नेतृत्व करतात. ते आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. प्रत्येक तिमाही निकालानंतर निधी व्यवस्थापकांना भेटून त्यांची मते जाणून घेणे हा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शिरस्त्याचा भाग असलेल्या या मालिकेत एप्रिल-जून तिमाही निकालांवर भाष्य करण्यासाठी महेश पाटील यांची भेट घेतली. या संवादाचे हे संक्षिप्त रूप.

नुकत्याच संपलेल्या एप्रिल-जून २०२४ निकालांकडे आपण कसे पाहता ?

Dev Plastics Industries Limited,
माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
fineotex chemical ltd marathi news
माझा पोर्टफोलियो : पटीपटीने वाढीच्या गुणाकाराचे ‘रसायन’
rbi to declare willful defaulters
निर्ढावलेले आणि हेतुपुरस्सर कर्जबुडवे
central government, 48 lakh crore budget, budget, consumption, consumption funds, cental government priortize consumption, Central government budget, investment in consumption funds,
स्वत:च्याच सुगंधाची स्वत:लाच भूल…
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
Fraud, compensation, digital transaction,
बँकांच्या डिजिटल व्यवहारातील फसवणूक आणि नुकसानभरपाई
Satish Menon, Geojit Financial,
‘परताव्याची अपेक्षा १५ टक्क्यांच्या माफक मर्यादेत राखणे यथोचित’

एप्रिल जून या तिमाहीच्या काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेनुसार आहेत, तर काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेनुसार नाहीत. या निकालांबाबत दोन तीन निरीक्षण अशी. करोनापश्चात सर्वात संथ गतीने वाढ नोंदविलेली ही तिमाही होती. अनेक कंपन्यांच्या विक्रीतील वाढ (टॉपलाइन) ८-९ टक्क्यांनी नोंदविलेली दिसली तरी त्याचे प्रतिबिंब कंपन्यांच्या नफ्यात आणि उत्सर्जनात (ईपीएस) दिसले नाही. याचा अर्थ कंपन्यांच्या परिचलन खर्चात (ऑपरेटिंग कॉस्ट) वाढ झाली. आधीच्या कालावधीत विक्रीतील वाढीपेक्षा नफ्यातील वाढ अधिक होती. कंपन्यांच्या परिचलन खर्चात वाढ होण्यास मुख्यत्वे जिन्नसांच्या आणि इंधनांच्या किमतीत झालेली वाढ कारण ठरली. आमचा अंदाज पहिल्या तिमाहीत, निफ्टीच्या कमाईत ७-८ टक्के वाढ नोंदवणे अपेक्षित होते. ही वाढ मुख्यत्वे आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या आणि वाहन निर्मिती, ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या कमाईतून येणे अपेक्षित होते. धातू आणि आरोग्य सेवेचे निफ्टीच्या कमाईत योगदान वाढण्याची अपेक्षा होती. या अपेक्षांची पूर्ती या निकालांनी केली असे म्हणता येईल.

आणखी वाचा-उद्योग क्षेत्रांच्या लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्यांसाठी मॅन्युफॅक्चरिंग फंड

कोणत्या उद्योग क्षेत्रांच्या कामगिरीबाबत तुम्ही आशावादी आहात?

आम्ही भावनांच्या हिंदोळ्यांवर विसंबून गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करीत नसतो. कंपन्यांच्या निकालांनी आम्हाला आनंद होत नसतो किंवा एखाद्या कंपनीच्या निकालांनी आम्ही निराश होत नसतो. एखादे उद्योग क्षेत्र भविष्यात चांगली कामगिरी करेल असे वाटले तर त्या उद्योग क्षेत्रातील वाजवी मूल्यांकन आणि वृद्धीक्षम कंपनीची आम्ही गुंतवणुकीसाठी निवड करतो. एखादे उद्योग क्षेत्र भविष्यात अडथळ्यांना सामोरे जाणार असेल आणि त्यामुळे त्या उद्योग क्षेत्रातील कंपन्या समाधानकारक वृद्धी नोंदविण्यात समस्या येणार असतील तर आम्ही अशा उद्योग क्षेत्राबाबत पुनर्विचार करतो. एक तर एकूण पोर्टफोलिओत अशा कंपन्यांचे प्रमाण कमी करतो. सरलेल्या तिमाहीचा विचार करता, मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत, औद्योगिक वापराच्या वस्तू (इंडस्ट्रिअल कंझ्युमेबल), ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांचे निकाल समाधानकारक आहेत. आरोग्यनिगा क्षेत्रात कंपन्यांच्या निकालांनी सुखद धक्का दिला तर रसायने, सिमेंट, धातू या क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल संमिश्र आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्सर्जनात घट होणे जवळजवळ थांबले असून इथून भविष्यात उत्सर्जनात स्थैर्य येणे अपेक्षित आहे.

निफ्टीत सर्वाधिक प्रभाव असल्याने पोर्टफोलिओ बांधण्याच्या दृष्टीने बँकिंग आणि वित्तीय सेवा हे महत्त्वाचे उद्योग क्षेत्र आहे. या उद्योगाबाबत आपण काय सांगाल?

विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निरीक्षण असे की, वित्तपुरवठादारांपेक्षा (लेंडिंग बिझनेसेस) वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी जसे की सर्वसाधारण आणि आयुर्विमा, दलाली पेढ्या (स्टॉक ब्रोकिंग), पत मानांकन या व्यवसायांनी चांगली कामगिरी केली. मर्यादित व्याजदरात बँकांना ठेवी गोळा करण्यात मर्यादा येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत बँकांच्या ‘क्रेडिट डिपॉझिट रेशो’तील वाढ जवळजवळ नगण्य आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी कठोर अनुपालन योजले आहे. याचा परिणाम बँकांच्या नफ्यावर होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-भांडवली नफ्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदी – संभ्रम, वाद काय?

या निकालांच्या पार्श्वभूमीवर नवीन गुंतवणुकीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल ?

मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे मूल्यांकन सध्या अधिक आहे. मागील दोन-तीन वर्षात गुंतवणूकदारांनी जो नफा कमविला त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याच्या अपेक्षा कमी करायला हव्यात. दोन वर्षातील नफा पाहता गुंतवणूकदारांना सांगावेसे वाटते, की अपेक्षा कमी करायला हवी. विस्तृत निर्देशांकाच्या तुलनेत कोणत्याही निर्देशांकातील १० टक्के कंपन्यांची कामगिरी निर्देशांकाच्या तुलनेत सरस झाली आहे. आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात संभवत आहे. गुंतवणूकदारांनी ‘लॉन्ग ड्युरेशन बॉण्ड’ फंडाचा नक्कीच विचार करावा, असे सुचवावेसे वाटते.

‘इक्विटी फंडां’बाबत गुंतवणूकदारांनी कोणत्या फंडांचा विचार करावा?

आदित्य बिर्ला सन लाईफ मल्टी ॲसेट फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ अग्रेसिव्ह हायब्रीड फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंट लाइन इक्विटी फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ जेनेक्स फंड यांचा विचार करावा.