scorecardresearch

LIC New Jeevan Shanti: फक्त एकदा प्रिमियम भरून मिळवा १ लाख रुपये; काय आहे जीवन शांती योजना जाणून घ्या

एकच प्रिमियम आणि मिळणार १ लाख रुपये? काय आहे एलआयसीची जीवन शांती योजना जाणून घ्या

LIC New Jeevan Shanti: फक्त एकदा प्रिमियम भरून मिळवा १ लाख रुपये; काय आहे जीवन शांती योजना जाणून घ्या
एलआयसी जीवन शांती योजना (प्रातिनिधिक फोटो

एलआयसीमध्ये अनेकजण पैसे गुंतवतात. जर तुम्ही देखील अशी गुंतवणूक करत असाल तर एक नवी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे नाव ‘जीवन शांती योजना’ आहे. जर तुम्हाला ठराविक रक्कम पेन्शनमध्ये मिळावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

निवृत्तीनंतर पेन्शनचा खुप मोठा आर्थिक आधार असतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारांची काळजी सतावत नाही. एलआयसीकडुन सतत पेन्शन धारकांसाठी नव्या योजना जाहीर केल्या जातात. नव्याने सुरू करण्यात आलेली जीवन शांती योजना वार्षिक योजना आहे. ही योजना निवडल्यानंतर तुम्ही तुम्हाला पेन्शनमध्ये किती रक्कम हवी आहे हे निश्चित करू शकता. ही एलआयसीची नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक, सिंगल प्रीमियम, डिफर्ड ॲन्युइटी योजना आहे.

ही सिंगल प्रिमियम योजना आहे. म्हणजेच यामध्ये केवळ एकदाच पैसे भरावे लागतात आणि आयुष्यभर पेन्शन मिळते. सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ डिफर्ड एन्युटी यामधील एक पर्याय निवडू शकतात.

कधी करता येते गुंतवणूक?
जीवन शांती योजनेतील वार्षिक गुंतवणूकीची किमान रक्कम १,५०,००० रूपये आहे. या योजनेत जर गुंतवणूक करायची असेल तर वय किमान ३० वर्ष आणि कमाल ७९ वर्ष असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या