आपण जर सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी असाल तर आपल्या दृष्टीने दरवर्षी नोव्हेंबर हा एक महत्वाचा महिना असतो कारण प्रत्येक सरकारी सेवानिवृत्तांना ३० नोव्हेंबरच्या आत आपल्या कार्यालयात अथवा नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हयातीचा दाखला (लाईफ सर्टिफीकेट)द्यावा लागतो, तसेच मृत सेवानिवृत्तच्या पत्नीस सुद्धा हा हयातीचा दाखला द्यावा लागतो.

सेवानिवृत्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात असा दाखला देणे सेवानिवृत्तास बहुदा सहजपणे शक्य होते तथापि वाढत्या वयानुसार किंवा काही आजारपणामुळे असा दाखला प्रत्यक्ष जाऊन शक्य होतेच असे नाही. जर हयातीचा दाखला वेळेत दिला गेला नाही तर मिळणारे पेन्शन दाखला देईपर्यंत थांबवले जाते, यामुळे सेवानिवृत्ताची किंवा त्याच्या विधवा पत्नीची मोठी अडचण होते. यावर उपाय म्हणून सरकारने आता डिजिटल लाईफ सर्टिफीकेट ऑनलाईन देता येईल अशी जीवन प्रमाण (Jeevan pramaan) सुविधा सुरु केली आहे. या सुविधेचा वापर करून आता सेवानिवृत्त व्यक्ती आपला हयातीचा दाखला घरबसल्या देऊ शकते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?

डिजिटल लाईफ सर्टिफिकेट(हयातीचा दाखला) असा देता येतो.

ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी सर्व प्रथम जीवन प्रमाण अॅप(Jeevan Pramaan app) तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर स्वत:चा आयडी निर्माण करावा लागेल तो खालील प्रमाणे करता येतो.

1) तुमच्या फोनमध्ये जीवन प्रमाण अॅप (Jeevan Pramaan app) ओपन करा.

2) न्यू रजिस्ट्रेशनचा पर्याय ओपन करा.

3) आवश्यक माहिती भरा. यामध्ये आधार नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बॅंक अकाऊंट, बॅंकेचे नाव, मोबाईल नंबर पॅन नंबर यासारखी माहिती भरावी लागते.

4) त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

5) या ओटीपीद्वारा तुम्हाला पुढे आयडी तयार करायला परवानगी दिली जाईल.

6) बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनद्वारा (बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून) सबमिट केले असता युआयडीआयमार्फत पडताळणी केली जाते व आपल्याला कायमचा आयडी (पर्मनंट आयडी) दिला जातो.

हेही वाचा : जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग

सेवानिवृत्तपेन्शन धारक हा पर्मनंट आयडी वापरून jeevanpramaan.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करून खालीलप्रमाणे ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतो.

1) जीवन प्रमाणअॅप वर लॉगिन करून आणि पर्मनंट आयडी टाकून आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.

2) जनरेट जीवन प्रमाण हा पर्याय निवडा.

3) त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक एंटर करून जनरेट ओटीपी वर क्लिक करा.

4) तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला ओटीपी येईल एंटर करा.

5) यानंतर तुम्हांला पीपीओ नंबर, नाव, डीसबर्सिंग एजन्सीचे नाव टाका.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

6) त्यानंतर नो ऑब्जेकशन पर्याय निवडून फिंगरप्रिंट/ आयरिश स्कॅन करा.

7) आधार डेटाच्या माध्यमातून पुन्हा तुमची माहिती तपासली जाईल.

8) जीवन प्रमाणवर वर तुमची माहिती यशस्वीरीत्या अपलोड झाल्यानंतर तसा मेसेज येईल व सोबतच जीवन प्रमाण पत्र (हयातीचा दाखला) दिला जातो. तसा कन्फर्मेशन मेसेज आपल्या मोबाईलवर लगेच येतो.

आजकाल बहुतेक सर्व सेवानिवृत्त स्मार्टफोनचा वापर करून गूगल पे , फेसबूक, व्हॅाट्सअॅप , गुगलमॅप यांचा वापर सर्रास करताना दिसून येते त्यामुळे जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करणे बहुतेकांना सहज शक्य आहे आणि जरी एखाद्यास जमत नसेल तर त्याला ते आपल्या घरातील मुले / नातवंडे यांच्याकडून करून घेता येईल. विशेष म्हणजे जीवन प्रमाण पत्र आय डी एकदाच सुरवातीस बनवावा लागतो व तो पुढे दरवर्षी ऑनलाईन हयातीच्या दाखल्यासाठी वापरता येतो.

Story img Loader