scorecardresearch

Premium

Money Mantra : कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार अन् जोखीमही शून्य; व्यवसाय करायचा असल्यास ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

केंद्र सरकारने एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जाच्या ३ श्रेणी आहेत. पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज योजना, दुसरी किशोर कर्ज आणि तिसरी तरुण कर्ज योजना आहे.

pradhan mantri mudra loan
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MUDRA LOAN SCHEME : जर आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल तर बरेच लोक बँकेकडून कर्ज घेतात. यात केवळ अधिक कागदपत्रेच लागत नाहीत तर तुम्हाला अधिक व्याजदेखील द्यावे लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घ्यायचे असेल तर हमी म्हणून काहीतरी द्यावे लागते किंवा गहाण ठेवावे लागते, असे सांगितले जाते. पण जर तुम्हाला हमीशिवाय कमी व्याजासह आणि जोखीममुक्त कर्ज हवे असेल, तर तुम्ही सरकारी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता. ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्हीदेखील व्यावसायिक बनू शकता.

केंद्र सरकारने एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जाच्या ३ श्रेणी आहेत. पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज योजना, दुसरी किशोर कर्ज आणि तिसरी तरुण कर्ज योजना आहे. या अंतर्गत सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. कोणताही भारतीय नागरिक ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तो PMMY अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. मोठी गोष्ट म्हणजे हे कर्ज घेताना कोणतीही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. याबरोबरच कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही.

Meeting RBI Monetary Policy Committee decision interest rates announced friday
व्याजदर बदलण्याची शक्यता शून्यच! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू; शुक्रवारी निर्णय
Disappointment with small savers
छोट्या बचतदारांच्या पदरी निराशाच
Bank of Baroda festive offer
Money Mantra : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर लाँच; गृह आणि वाहन कर्जांवर विशेष सूट
15G 15H forms
Money Mantra: फॉर्म १५जी व १५एच कोण भरू शकतात?

तुम्ही किती कर्ज घेऊ शकता?

शिशू कर्ज: ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज शिशू कर्ज अंतर्गत दिले जाते.

किशोर कर्ज: किशोर कर्ज अंतर्गत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

हेही वाचाः १ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

परतफेड कालावधी काय?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड ३ वर्षे ते ५ वर्षांमध्ये म्हणजेच ३६ महिने ते ६० महिन्यांत करावी लागते. वैयक्तिक कर्ज घेणाऱ्याची आर्थिक स्थिती कमी रक्कम इत्यादी पाहून हे ठरवले जाते.

हेही वाचाः Money Mantra : सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF मध्ये खाते असल्यास आजच करा ‘हे’ काम; २ दिवसांचा अवधी अन्यथा खाते गोठवले जाणार

कर्ज घेण्यासाठी पात्रता

२४ ते ७० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकते. यासाठी तुमच्याकडे असलेल्या मुख्य कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, केवायसी प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची हमी मायक्रो युनिट्ससाठी (CGFMU) क्रेडिट गॅरंटी अंतर्गत दिली जाते, जी राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (NCGTC) द्वारे प्रदान केली जाते. गॅरंटी कव्हर ५ वर्षांसाठी उपलब्ध आहे आणि म्हणून मुद्रा योजनेंतर्गत दिलेल्या कर्जासाठी कमाल कालावधी ६० महिने आहे.

मुद्रा कर्ज कसे मिळवायचे?

https://www.mudra.org.in/ वेबसाइटवर कर्ज अर्ज डाऊनलोड करा.
शिशू कर्जाचा फॉर्म वेगळा आहे, तर तरुण आणि किशोर कर्जाचा फॉर्म एकच आहे.
कर्ज अर्जामध्ये सर्व माहिती भरा.
योग्य मोबाईल नंबर, आधार क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी द्या.
तुम्हाला तुमचा व्यवसाय कुठे सुरू करायचा आहे, याची माहिती द्या.
OBC, SC/ST प्रवर्गांतर्गत येणाऱ्या अर्जदारांना जात प्रमाणपत्राचा पुरावा द्या.
२ पासपोर्ट फोटो द्या.
फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाची माहिती घेतात. त्या आधारावर PMMY तुम्हाला कर्ज मंजूर करते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loans up to 10 lakhs without any guarantee and zero risk keep these documents ready if doing business vrd

First published on: 29-09-2023 at 19:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×