scorecardresearch

Premium

‘महिंद्रा अँड महिंद्रा’ची भरारी; नफ्यामध्ये 98 टक्के वाढ !

Money Mantra: कृषी व्यवसायातील दमदार विक्रीमुळे कंपनीला ही नफ्यातील वाढ नोंदवता आली असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

mahindra automobiles transport
महिंद्राची आगेकूच (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतातील वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्र अँड महिंद्र या कंपनीचे या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे विक्री आणि नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. मागच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीशी तुलना करता कंपनीने नफ्यामध्ये घसघशीत ९८ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी हाच नफा १४०४ कोटी रुपये होता तो यावर्षी २७७४ कोटी रुपये एवढा नोंदवला गेला आहे. एकूण विक्री २३ टक्क्यांनी वाढून २४३६८ कोटी रुपये एवढी नोंदवली गेली.

करोना साथ संकटानंतर अर्थव्यवस्था सावरताना बाजारात सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये मागणी वाढताना दिसली व याचाच फायदा कंपनीला झाला. वाहन विक्री वगळता अन्य उत्पन्न १४० कोटी रुपयांवरून वाढून ६५८ कोटी रुपये इतके नोंदवले गेले. एबीटा मार्जिन (EBITDA margin = Earnings Before Interest and Tax + depreciation + Amortization ) १२% वरून १४% एवढे वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी फक्त प्रवासी किंवा खाजगी वाहतुकीची गरज भागवत नाही, तर भारतातील ट्रॅक्टर बनवणारी, सर्वाधिक ट्रॅक्टर विक्री नोंदवणारी कंपनी आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराच्या गाड्या आणि त्याचबरोबर कृषी व्यवसायातील दमदार विक्रीमुळे कंपनीला ही नफ्यातील वाढ नोंदवता आली असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

India trained seafarers achieve the target of a five lakh crore economy
पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठायचे तर देशाला अधिक प्रशिक्षित खलाशांची गरज
Maharera
विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले?
Mobile phones disputes family
मोबाईल ठरतोय कुटुंबातील खलनायक! न्यायालयात दाखल दाव्यापैकी ४० टक्के घटस्फोटाचे कारण मोबाईल
vedanta group
वेदान्त समूहातील व्यवसायांचे विलगीकरण; पाच नवीन सूचिबद्ध कंपन्या उदयास येणार

आणखी वाचा: Money Mantra: क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसीचं महत्त्व

भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी बदलू लागली आहे पारंपरिक छोट्या गाड्यांपेक्षा ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’ अर्थात ‘एसयूव्ही’ प्रकारच्या गाड्या भारतात अधिक विकल्या जाऊ लागल्या आहेत. महिंद्रा कंपनीच्या थार, बोलेरो, एक्स यु व्ही या गाड्यांच्या विक्रीमध्ये २१ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या तीन महिन्यात या प्रकारच्या १८६००० गाड्या कंपनीने विकल्या आहेत. ट्रॅक्टर ची विक्री तीन टक्क्यांनी कमी झाली असली तरी उत्पादन खर्चात बचत केल्याने त्यातील नफ्याचे प्रमाण १५% वरून १७% पलीकडे पोहोचले आहे.

आणखी वाचा: Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी कराराचं महत्त्व

कंपनीने अलीकडेच सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीतील तीन चाकी इलेक्ट्रिकल वाहने विक्रीत कंपनीने आपले बाजारातील पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. या श्रेणीमध्ये कंपनीचा बाजारातील वाटा ६०% पेक्षा अधिक आहे. सलग सहा तिमाही म्हणजेच १८ महिन्यांपासून ‘स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल’ या श्रेणीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा पहिल्या क्रमांकाचा वाहन निर्मिती उद्योग ठरला आहे. महिंद्राने अलीकडेच ‘लाईट कमर्शियल व्हेईकल’ म्हणजेच ट्रक निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे.

साडेतीन टनांपेक्षा कमी क्षमता असलेल्या ट्रकच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये महिंद्राचा वाटा ४९% एवढा पोहोचला आहे. ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित अवजारे, उपकरणे निर्मितीमध्ये कंपनीचा बाजारातील एकूण हिस्सा ४२ टक्क्यावर पोहोचला आहे. कंपनीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घडामोड स्पष्ट झाली आहे. महिंद्रा उद्योग समूहातर्फे आरबीएल बँकेत हिस्सेदारी वाढवण्यात आली. शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार कंपनीने ४१७ कोटी रुपये गुंतवून ‘आरबीएल बँके’त ३.५३% हिस्सेदारी विकत घेतली आहे. भविष्यात वित्त क्षेत्रामध्ये जाण्याचा कंपनीचा इरादा स्पष्ट आहे व त्यासाठी ‘आरबीएल बँके’त गुंतवणूक केली आहे असे व्यवस्थापनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ही गुंतवणूक सात ते दहा वर्षाच्या दीर्घकालीन उद्देशाने करण्यात आलेली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra registeres big profit automobiles suv trucks tractor mmdc psp

First published on: 05-08-2023 at 12:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×