दिवसेंदिवस म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी एसआयपी हा पर्याय लोकप्रिय होत चालला असल्याचे दिसून येते दरमहा सुमारे रु.१८ ते २० हजार कोटी एवढी गुंतवणूक एसआयपी द्वारा होत असून यात सातत्याने वाढ होत आहे. एसआयपी हा पर्याय आणखी ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यात आता टॉप अप ही सुविधा देऊ केली व तिची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-या सुविधेनुसार गुंतवणूकदार आपल्या एसआयपीचा हप्ता (मासिक/तिमाही/सहामाही /वार्षिक) किमान रु.५०० किंवा रु५००च्या पटीत ठरविक कालावधी नंतर वाढवू शकतो. उदाहरणार्थ आपली रु.१०००० ची दरमहाची एसआयपी आहे तर आपण ही रु.१०००० ची रक्कम एका ठराविक टक्केवारीने (उदा ५%, १०% ) किंवा किमान रु ५०० किंवा त्या पटीत दर तिमाही/सहामाही/वार्षिक पद्धतीने वाढू शकतो. थोडक्यात जर आपण रु.१००० ने दरवर्षी आपली एसआयपी वाढवण्याचा पर्याय निवडला तर पहिल्या वर्षी दरमहा रु.१०००० , दुसऱ्या वर्षी दरमहा रु.११००० तर तिसऱ्या वर्षी रु.१२००० या पद्धतीने आपल्या एसआयपीचा मासिक हप्ता वाढत जाईल व ही प्रक्रिया आपोआप होईल. मात्र हा पर्याय एसआयपी सुरु करतानाच घ्यावा लागतो. अधेमध्ये घेता येत नाही.

हेही वाचा…कर्जवसुली न्याय प्राधिकरण

-सर्व प्रमुख म्युच्युअल फंड ही सुविधा देऊ करत आहेत.

-ज्या प्रमाणात आपले उत्पन्न वाढते त्या प्रमाणात आपली गुंतवणूक यामुळे सहजगत्या वाढविता येते.

-यात जास्तीजास्त किती रकमेपर्यंत हप्ता वाढू द्यायचा ही मर्यादा ठरवता येते. उदाहरणार्थ आपली रु.१०००० ची दरमहाची एसआयपी असून आपण ती वयाच्या ३० व्या वर्षी रिटायरमेंट नंतरच्या खर्चाच्या तरतुदीच्या उद्देशाने सुरु केली आहे व ती आपण पुढील ३० वर्षे चालू ठेवणार आहात मात्र वयाच्या ४५ नंतर आपल्याला मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामुळे यात दरमहा रु.१००० वाढ दरवर्षी करता येणे शक्य होणार नाही तर आपण आपल्या एसआयपीची कमाल मर्यादा रु.२५००० ठेऊ शकता यामुळे पहिली १५ वर्षे आपली एसआयपी दरवर्षी रु.१००० वाढेल व पुढील १५ वर्षे ती दरमहा रु.२५००० इतकीच राहील.

हेही वाचा…बक्षीस समभाग आणि करपात्रता

-आजकाल बहुतेक सर्व म्युच्युअल फंडाच्या अधिकृत वेबसाईटवर टॉप अप एसआयपी कॅलक्युलेटर उपलब्ध असतो त्याचा वापर करून आपण आपल्या गरजेनुसार टॉप अप सुविधेचा लाभ घेऊ शकतो.उदाहरणार्थ आपण इक्विटी म्युच्युअल फंडात रु.१००००ची एसआयपी २० वर्षे कालावधीसाठी केली आहे व त्यात दरवर्षी रु.१००० इतकी वाढ करण्यचा पर्याय निवडला आहे तर २०वर्षानंतर आपल्याला अंदाजे रु.१.६० कोटी एवढी रक्कम मिळेल व यासाठी आपण केवळ रु.४६८००० एवढी रक्कम २० वर्षाच्या कालावधीत गुंतविलेली असेल.(१२% वार्षिक परतावा गृहित धरून )

हेही वाचा…कंप्यूटरजी ‘लॉक’ किया जाए!

थोडक्यात असे म्हणता येईल की आपल्या दीर्घकालीन गरजा व त्यात महागाई नुसार होणारी वाढ विचारात घेता टॉप अप सुविधा वापरून आपली दीर्घकालीन गरजासाठी तरतूद (उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणाचा खर्च/ रिटायरमेंटसाठीची तरतूद/लग्नासाठीची खरेदी ) करणे सहज शक्य आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra article on what is sip top up mmdc psg