EPS Higher Pension Calculator: जर तुम्हालासुद्धा एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) च्या जास्त पेन्शनची निवड करायची असल्यास EPFO मध्ये किती योगदान द्यावे लागणार आहे, ​याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे EPFO ने नवीन जास्त EPAS पेन्शन कॅल्क्युलेटर लाँच केले आहे. त्यामुळेच तुम्हाला आता जास्तीच्या पेन्शनसाठी किती योगदान द्यावे लागणार, याचीसुद्धा गणना करता येणार आहे. ज्याचे पेमेंट तुम्हाला EPF मधील उरलेल्या रकमेतून किंवा गरज पडल्यास तुमच्या बचतीतून EPFO ​​ला करावे लागेल. हे कॅल्क्युलेटर एक्सेल युटिलिटी आधारित कॅल्क्युलेटर आहे आणि ते वापरण्यास अतिशय सोपे आहे.

आज म्हणजेच २६ जून ही उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय घेण्याची अंतिम मुदत होती, परंतु ती ११ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र यामध्ये नवीन पेन्शनचा पर्याय स्वीकारणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. प्रत्यक्षात हा पर्याय घेतल्यास किती वाढीव योगदान द्यावे लागेल, याबाबत आतापर्यंत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता या कॅल्क्युलेटरमुळे त्यांचा संभ्रम दूर होणार आहे. कॅल्क्युलेटर नुकतेच लाँच केले गेले आहे.

Race for science admissions up 3 percent increase last year
विज्ञानाच्या प्रवेशासाठी चढाओढ, मुंबई विभागाचा निकाल ९१.९५ टक्के; गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ
चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
Womens Health For Whom Is Medical Abortion Law Reformed
स्त्री आरोग्य : वैद्यकीय गर्भपात कायद्यातली सुधारणा कोणासाठी?
Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
Chances of BJP increasing seats in Lok Sabha elections in Bengal
बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता? तृणमूलसमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान?
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
Yavatmal Washim Lok Sabha Constituency, Fears of declining Low Voting, Wedding Season, Rising Temperatures, yavatmal news, washim news, lok sabha 2024, election 2024, marathi news,
वाढते तापमान, लग्नसराई, अवकाळीमुळे मतदानात घट होण्याची भीती; राजकीय पक्षांसमोर टक्का वाढविण्याचे आव्हान
loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण : टेस्लाच्या वाटचालीत स्पीडब्रेकर? जगभर मागणीत घट का? भारतात आगमन लांबणीवर?

हेही वाचाः एक कोटी लघुउद्योजकांना डिजिटल मंचावर आणण्याचे ॲमेझॉनचे लक्ष्य

कोण जास्त पेन्शन निवडू शकतो?

जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​चे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य राहिल्यास तुमच्याकडे निवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे. खरं तर तुम्ही खासगी नोकरीत असाल आणि तुमचे पैसे भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये कापले जात असतील तेसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. तसेच तुम्ही १० वर्षे काम केले असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात. तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा एक भाग पेन्शन फंडासाठी कर्मचारी पेन्शन स्कीम (ईपीएस) मध्ये जातो.

हेही वाचाः ‘मनरेगा’ वेतनासाठी आधारसक्षम देयक प्रणालीच्या सक्तीला मुदतवाढ

गणना कशी करायची?

EPS चे हे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी कर्मचाऱ्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेत सामील झालेली तारीख माहीत असणे आवश्यक आहे. कर्मचार्‍याला EPF योजनेत सामील झाल्याच्या तारखेनुसार किंवा नोव्हेंबर १९९५ नंतर जे योगदान देत आहेत, त्यांना आपल्या पगाराची माहिती द्यावी लागणार आहे. जर तुम्ही सेवानिवृत्त झाला असाल तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या तारखेच्या पगाराचे तपशील द्यावे लागतील. प्रत्येक वर्षाचा पगार डेटा शीटमध्ये भरल्यावर हे कॅल्क्युलेटर अतिरिक्त EPS योगदानाची गणना करेल. ही गणना EPS मध्ये सामील झाल्याच्या तारखेपासून सेवानिवृत्तीपर्यंत किंवा EPS मध्ये सामील झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंतची असेल. म्हणजेच आतापर्यंत जास्त पेन्शनसाठी तुमचे योगदान किती आहे तुम्हाला समजेल.

अतिरिक्त योगदानावर व्याजदेखील भरावे लागेल

याबरोबरच एक्सेल आधारित युटिलिटी कॅल्क्युलेटर ३१ मार्च २०२३ पर्यंत कमावलेल्या एकूण व्याजाची गणना तुमच्याकडून अल्प योगदानानुसार करणार आहे. ही रक्कम तुमच्या EPF खात्यातूनही वसूल केली जाईल.