Premium

Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग- निवृत्तीवेतन साठीनंतर की, सत्तरीनंतर?

Money Mantra: आपल्याकडे साधारणपणे एक समज आहे की, निवृत्ती झाल्यावर लगेचच निवृत्तीवेतन सुरू व्हावे. पण अधिक लाभ कशात? साठीनंतरच्या की, सत्तरीनंतरच्या निवृत्तीवेतनात?

Pension old age
निवृत्तीवेतन नेमके केव्हा सुरू करावे? (फोटो: Pixabay)

मिलिंद देवगांवकर

“विसर्जनापूर्वी आरती म्हणून घ्या” इति नारायणराव.
“घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे”
“देवा प्रेमे …. “
“अच्युतम् केशवम् रामनारायणम् …. “
भक्तमंडळींचा आवेश एकदम जोरदार, त्यात नारायणरावांचा तर भलताच जोरकस. स्वतःभोवती गिरक्या घेत असताना आजूबाजूचे, भवतालच्या विश्वाचे त्यांना अजिबात ध्यान नव्हते. “हरे राम, हरे राम, रामराम हरे हरे’ च्या शेवटच्या ध्रुवपदावर एकदम गपकन खाली बसून त्यांनी बाप्पाला साष्टांग नमस्कार घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Money Mantra: वाहन विमा- ‘नो क्लेम बोनस’ म्हणजे नेमकं काय?| money …

बाप्पाचे रीतसर विसर्जन झाले. मोठ्या भक्तीभावाने सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. खिरापतीचे वाटप झाले. तेवढ्यात समोरून धोतर सोडून लेंगा-कुडता घालून नारायणराव हातात पिशवी घेऊन लगबगीने बाहेर निघाले. “अहो कुठे?” असं विचारता, “आता मत्स्य अवतारातील भगवंताला आणावयास निघालो.” असे सांगून स्कुटीवरून बाहेर पडले देखील. हे नारायणराव, आता दोन वर्षांनी सत्तरी ओलांडतील. तुकतुकीत कांती, सडपातळ बांधा आणि तैलबुद्धी याचे श्रेय ते त्यांच्या मत्स्यआहाराला देतात. बाप्पाच्या आगमनाची आणि मोदकाची त्यांना जेवढी आस तेवढीच मत्स्यआहाराची. बाप्पाच्या विसर्जनापाठोपाठ लगेचच त्यांना समस्त मत्स्य परिवार आपल्या उद्धाराची वाट पाहत आहे असा भास व्हावयास लागतो आणि परिणामी लगोलग ते ‘बाजाराला’ निघतात.

आणखी वाचा: फिरायला जाण्याचं बजेटिंग | how to plan foreign trips financially? mmdc …

खाण्यात चोखंदळ असलेले नारायणराव गुंतवणुकीच्या बाबतीतही तितकेच चोखंदळ. निवृत्तीनंतर त्यांनी ‘सहकारी गृह संस्थांची’ (Housing Societies) अकाऊंटची कामे करायला सुरुवात केली. त्याअगोदर त्यांनी रीतसर GDCA चा अभ्यासक्रमपण पूर्ण केला. आपल्या निवृत्तीपश्चात उत्पन्नाकरिता, नोकरीत असताना ते ‘NPS’ मध्ये वर्षाला पन्नास ते साठ हजार भरायचे. निवृत्तीनंतर त्यांनी ते थांबवले. पण निवृत्ती नंतर त्वरित वयाच्या साठीला पेन्शन सुरू न करता त्यांनी ते सत्तरीत सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय? काय कराल? काय टाळाल?

मंडळी, आपल्याकडे साधारणपणे असा समज आहे की निवृत्ती झाल्यावर लगोलग निवृत्तीवेतन सुरू व्हावे. मग, त्याकरिता बहुतांश लोक पोस्टाची ‘मासिक मिळकत योजना’ (Postal MIS) व ‘वरिष्ठ बचत योजना’ (SCSS) ह्यांचा आधार घेतात आणि सेकंड इनिंगला सुरूवात करतात. तर मंडळी, त्या सोबत ‘NPS’ ही योजनादेखील विचारात घ्यावी. ही योजना केंद्र सरकारने PFRDA मार्फत ‘NPS’ ही ट्रस्ट स्थापून कार्यान्वित केली आहे. वयवर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात. ही योजना बाजाराशी संलग्नअसल्याने आपली गुंतवणूक दोन आकडी परतावा देऊ शकते. आपले योगदान हे समभाग (Equity), निमसरकारी कर्जे (Corporate Debt) व सरकारी रोखे (Govt. Securities) अश्या तीन प्रकारच्या संपत्तीच्या प्रकारात वर्गीकृत करत असल्याने ह्यात जोखीम ‘ना के बराबर.’ ह्यात आयकर कलम ८० सीसीडी (१बी) अंतर्गत पन्नास हजाराची गुंतवणूक कर वाचवण्यास पात्र आहे (कलम ८० सी व्यतिरिक्त).

मंडळी आपण काय कराल?

‘साठी बुद्धी नाठी’चा प्रत्यय येण्याअगोदरच पुढील अर्थाजनाची रूपरेषा ठरवावी. मंडळी, होत असं की, उभ्या आयुष्यात एकत्रित न बघितलेली रक्कम एकदम बँकेत दिसल्याने थोडं का होईना पण आपला हात खर्चात सढळ होतो.
तसेच वाढत्या महागाईसमोर कापरासारखी आपली पुंजी उडून जाऊ द्यायची नसेल तर ‘दुसऱ्या इंनिंग’ मध्येही आपण अर्थार्जन करणे स्तुत्य. त्यामुळे आपली मानसिक व शाररिक तंदुरुस्ती सुद्धा उत्तम राहील.
आणि हो! नारायणरावांनी निवडलेला ‘प्रलंबित वर्षासन’ (Deferred Annuity) हा पर्याय जरूर विचारात घ्या कारण सत्तरी नंतर आपण जेव्हा खऱ्या अर्थाने ‘रिटायर्ड’ होऊ त्यावेळेस ही प्रलंबित पेन्शन कामी येईल.
काय म्हणता?

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money mantra retirement planning when to take pension after 60 or nps or postal savings mmdc vp

First published on: 22-09-2023 at 20:04 IST
Next Story
Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय? काय कराल? काय टाळाल?