नवीन वर्ष २०२४ सुरू झाले असून, नवा महिनाही सुरू झाला आहे. प्रत्येक वेळी महिना बदलला की काही बदल होतात, ज्याचा लोकांच्या खिशावर खोलवर परिणाम होतो. आम्ही तुम्हाला त्या ६ मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत, जे पर्सनल फायनान्सशी संबंधित आहेत आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे आहेत…

लहान बचतकर्त्यांना फायदा

अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा सरकारने नुकताच आढावा घेतला होता. आढाव्यात सुकन्या समृद्धी योजना आणि 3 वर्षांच्या ठेव योजनेवरील व्याज ०.२० टक्क्यांनी वाढवण्यात आले. नवीन वाढलेले व्याजदर जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी आहेत. आजपासून तिमाही सुरू झाली आहे. म्हणजेच या वाढलेल्या व्याजदरांचे फायदे आजपासून मिळू लागतील. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आता ८.२० टक्के झाला आहे. ३ वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७.१० टक्के झाला आहे.

financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  
MMRCL Recruitment 2024
MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रोमध्ये रिक्त पदांची भरती, दोन लाखांपर्यंत मिळेल पगार; आजच अर्ज करा
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

कागदपत्रे सादर न करता डिजिटल प्रक्रियेद्वारे सिम मिळवू शकणार

नवीन मोबाईल कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना नवीन वर्षात सुलभ प्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. नियमांमध्ये अलीकडील बदलांनंतर, फिजिकल कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता संपुष्टात आली आहे. आता नवीन सिमसाठी केवायसी पडताळणी पूर्णपणे डिजिटल असेल. त्यामुळे दुसऱ्याच्या नावावर सिम घेऊन गैरवापराच्या घटनांना आळा बसेल.

हेही वाचाः Money Mantra : यंदा प्राप्तिकराशी संबंधित नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल, ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

विम्याची कागदपत्रे सुलभ होणार

विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना १ जानेवारी २०२४ पासून सुधारित ग्राहक माहिती पत्रक जारी करण्यास सांगितले आहे. ग्राहक माहिती सीट म्हणजेच CIS मध्ये विम्याशी संबंधित सर्व माहिती असते. IRDAI ने विमा कंपन्यांना CIS मध्ये सर्व माहिती सोप्या भाषेत देण्यास सांगितले आहे, जेणेकरून सामान्य ग्राहकाला देखील संबंधित विम्याच्या सर्व अटी व शर्थी समजू शकतील.

हेही वाचाः २०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षात प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्यांकडून नवा विक्रम, ८ कोटींहून अधिक करदात्यांनी…

नवीन कारचे स्वप्न महागले

जर तुम्ही नवीन वर्षात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर हे अपडेट तुमच्यासाठी निराशाजनक असणार आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ आणि ऑडीसह अनेक कार कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या विविध कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढत्या खर्चामुळे त्यांना किमती वाढवाव्या लागल्याचे कार कंपन्यांचे म्हणणे आहे.

…तर हे UPI आयडी बंद होतील

सध्या देशातील बहुतांश व्यवहार UPI द्वारे होत आहेत. मोठमोठ्या शहरांपासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत लोकांचे रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाले आहे. मात्र, डिजिटल बँकिंगच्या वाढीमुळे फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. यामुळे आजपासून वापरात नसलेले मोठ्या प्रमाणात UPI आयडी बंद करण्यात येत आहेत. ज्या यूपीआय आयडीचा वापर गेल्या एक वर्षापासून होत नाही, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.

बँक लॉकरशी संबंधित नियम

बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करून रक्कम जमा करण्याचा पर्याय होता. तसे न केल्यास १ जानेवारीपासून त्यांचे लॉकर गोठवले जाणार आहे.

प्राप्तिकर परतावा

ज्या करदात्यांनी २०२२-२३ (AY-2023-24) या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरले नाहीत, त्यांना १ जानेवारीपासून त्यांचे उशीर झालेला रिटर्न भरता येणार नाहीत. तसेच ज्या करदात्यांच्या रिटर्नमध्ये त्रुटी आहेत ते त्यांचे सुधारित रिटर्न भरू शकणार नाहीत.