गेल्या वर्षभरापासून भारतातील शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या तेजीला या महिन्यात ग्रहणच लागले आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा सर्व इंडेक्समध्ये जोरदार विक्रीचा सपाटा सुरू आहे. परिणामी भारतीय शेअर बाजार नकारात्मक परतावा देत आहेत. या आठवड्यात सेन्सेक्स २.५ % आणि निफ्टी ३ टक्क्यांनी घसरून बंद झाला.

सलग पाच दिवस घसरण नोंदवली गेली असल्याने या घटनेकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी हेल्थकेअर वगळता आयटी, ऑटो, बँक, मेटल असे सर्व ११ इंडेक्स घसरलेले दिसले.

stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

क्रिसिल या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील अर्थव्यवस्थेची वाढ काहीशी मंदावल्याने कंपन्यांच्या नफ्यावर त्याचा परिणाम होणार आहे व यामुळे सलग तीन वर्षापासून वाढते नफ्याचे आकडे दाखवणाऱ्या कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. अर्थात याचा परिणाम शेअरच्या किमतीवर होईल. हे असं का घडतंय यामागील प्रमुख कारणे समजून घेऊया.

आणखी वाचा-Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?

परदेशी गुंतवणूकदारांचा हात आखडता

भारतातील शेअर बाजारात मोठी गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स) यांच्याकडून केली जाते. अमेरिका युरोप मधील गुंतवणूकदार, पेन्शन फंड, इन्शुरन्स कंपन्या यांच्यामार्फत भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले जातात. सध्या मात्र चित्र काहीसे उलट दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात विक्रमी विक्रीचा सपाटा या परदेशी गुंतवणूकदारांनी लावला आहे. फक्त ऑक्टोबर महिन्याचा विचार करायचा झाल्यास जवळपास एक लाख कोटी रुपये एवढ्या किमतीचे शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांनी विकले आहेत.

२०२४ या वर्षाची आकडेवारी विचारात घेतल्यास जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले. जोपर्यंत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एन्ट्री घेत नाहीत तोपर्यंत बाजारातील ही पडझड कायम राहणार आहे. अमेरिकेतील रिझर्व्ह बँक म्हणजेच फेडरल रिझर्वने व्याजदर कमी केल्यामुळे त्याचप्रमाणे चीन या आपल्या शेजारी देशाने फिस्कल स्टीम्युलस अर्थात मंदी रोखण्यासाठी अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवायला सुरुवात केल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपला रोख चीनकडे वळवला आहे.

महागाईची चिंता

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपाती बाबत कोणतेही धोरण अवलंबण्यास स्पष्ट नकार दिला आहे. व्याजदर कपात आणि महागाईचा संबंध महत्त्वाचा आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि त्यामुळे खाद्यपदार्थांच्या भाववाढीची चिंता रिझर्व्ह बँकेला सतावते आहे. जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्याजदर कपात न झाल्यामुळे शेअर बाजारासाठी तो नकारात्मक संकेत ठरणार आहे.

आणखी वाचा-Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?

निकाल वार्ता

दुसऱ्या तिमाहीतील निकालांमध्ये काही निवडक कंपन्यांच्या निकालाने बाजारामध्ये अस्वस्थता पसरली आहे. ज्यावेळी विक्री आणि नफा यांच्या आकड्यावर थेट परिणाम होतो त्यावेळी शेअरच्या भावामध्ये घसरण होते.

या आठवड्याच्या शेवटी बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणात आहे काही शेअर्सनी चमकदार कामगिरी करून दाखवली. बिकाजी फूड्स या एफएमसीजी कंपनीने नफ्याचे उत्साहवर्धक आकडे दाखवल्याने कंपनीचा शेअर दहा टक्क्यांनी वाढला. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट या कंपनीने दुसऱ्या तिमाहीत नफ्यात १३% ची वाढ दर्शवल्याने शेअर सहा टक्क्यांनी वाढलेला दिसला. डीसीबी बँक या कंपनीने तिमाही नफ्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत घसघशीत २३% ची वाढ दर्शवल्याने शेअर मध्ये दहा टक्क्याची वाढ झालेली दिसली. या तेजीतील कंपन्यांबरोबर इंडसइंड बँक या कंपनीच्या नफ्यात ३९ टक्क्याची घट झाल्याने शेअरच्या भावात २० टक्क्याची घसरण दिसून आली. लार्सन अँड टुब्रो या कंपनीचा शेअर आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे आठवड्याभरात ४ टक्क्यांच्या घसरणीने बंद झाला.

आणखी वाचा-Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

येत्या आठवड्यातील कॉर्पोरेट निर्णयांचा विचार करायचा झाल्यास इन्फोसिस, माजगाव डॉक, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, टेक महिंद्रा अशा आघाडीच्या २५ कंपन्यांचा लाभांश देण्याचा आठवडा असणार आहे. याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने २८ ऑक्टोबर ही बोनस शेअर मिळण्यासाठी पात्रता तारीख निश्चित केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने भागधारकांना एकास एक या प्रमाणात बोनस शेअर देऊ केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंट मध्ये हे बोनस शेअर आल्याने त्यातल्या त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

Story img Loader