ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड अर्थात केंद्र सरकारचा ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असलेली ओएनजीसी ही भारतातील सर्वात मोठी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे, जी भारतीय देशांतर्गत उत्पादनात सुमारे ७१ टक्के योगदान देते. ओएनजीसीची स्थापना १९५६ मध्ये भारत सरकारने तेल शोधण्यासाठी केली होती. गेल्या ६९ वर्षांत ओएनजीसीने भारतातील ९ पैकी ८ ठिकाणी उत्पादक खोरे शोधले आहेत. ओएनजीसी भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी असून ती सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात फायदेशीर कंपनीदेखील आहे.

महसूल विभागणी

खनिज तेल – आर्थिक वर्ष २०२१ च्या महसुलाच्या ७० टक्के

Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Most indebted farmers Punjab, Maharashtra
महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा
mahavitaran 100 days target news
मागेल त्याला सौर कृषी पंप; ‘महावितरण’चे १०० दिवसांचे उद्दिष्ट ६० दिवसांत पूर्ण
Kinetic Group president Arun Firodia Hinjewadi
हिंजवडी ‘आयटी पार्क’बाबत उद्योजक अरुण फिरोदिया यांची महत्वाची सूचना, म्हणाले…
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
scheme, Tax, Nagar Parishad, Nagar Panchayat,
थकीत कर! राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये राबविणार ‘ही’ योजना…
Municipal administration unhappy with District Collector honoured by President after Municipal contribute for assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेची यंत्रणा, राष्ट्रपतीकडून सन्मान मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा; पालिका प्रशासन नाराज

नैसर्गिक वायू – आर्थिक वर्ष २०२१ च्या महसुलाच्या १७ टक्के

मूल्यवर्धित उत्पादने – १३ टक्के

हेही वाचा :ससा-कासवाची गोष्ट : या शेअरचा भाव ५५० रुपयांचा भाव गाठणार, तुम्हीही बाजी लावणार काय?

मूल्यवर्धित उत्पदनांमध्ये एलपीजी, नाफ्था, इथेन – प्रोपेन, ब्युटेन आणि सुपीरियर केरोसीन तेल यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या कंपनीचा ९३.५ टक्के महसूल भारतातून येतो आणि ६.५ टक्के आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळतो. आपल्या विस्तारीकरणासाठी ओएनजीसीने अनेक कंपन्यामध्ये गुंतवणूक केली असून काही संयुक्त उपक्रमही राबवले आहेत.

ओएनजीसीच्या महत्त्वाच्या समूह कंपन्यांमध्ये खालील कंपन्यांचा समावेश होतो:

ओएनजीसी विदेश: ही एक पूर्ण मालकीची उपकंपनी असून ती आंतरराष्ट्रीय ‘एक्सप्लोरेशन’ आणि उत्पादनाचे कार्य हाताळते. कंपनी भारताबाहेर १७ देशांमध्ये ३७ तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (महारत्न) : भारतातील दुसरी सर्वात मोठी तेल विपणन कंपनी

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) : मिनिरत्न

पेट्रोनेट एमएचबी लिमिटेड: रिफायनरीमधून कर्नाटकच्या विविध भागांमध्ये पेट्रो उत्पादनांच्या वाहतुकीत सहभागी.

संयुक्त उपक्रम:

ओपीएल (ओएनजीसी पेट्रो-ॲडिशन्स लिमिटेड): दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या ड्युएल-फीड पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सपैकी एक.

ओटीपीसी (ओएनजीसी त्रिपुरा पॉवर कंपनी लिमिटेड): नैसर्गिकरीत्या गॅस टर्बाइन थर्मल पॉवर प्रकल्पावर आधारित आहे.

ओटीबीएल (ओएनजीसी तेरी बायोटेक लिमिटेड): मातीचे जैवउपचार आणि वाढीव तेल पुनर्प्राप्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि विकास करते.

आयजीजीएल (इंद्रधनुष गॅस ग्रिड लिमिटेड): १६५६ किमी लांबीच्या ईशान्येकडील गॅस ग्रिडसह देशाच्या ईशान्य प्रदेशात उपस्थिती.

एमएसईझेड (मंगलोर विशेष आर्थिक क्षेत्र): पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रतिष्ठाने

कंपनीकडे इंडिया गॅस एक्सचेंजमध्ये ५ टक्के हिस्सा आहे.

सहयोगींमध्ये पीएलएल (पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड) आणि रोहिणी हेलीपोर्ट लिमिटेड यांचा समावेश आहे.

हेही वाचा :तिमाही निकाल बाजाराला सावरतील?

कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. सप्टेंबर २०२४ साठी सरलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने १,५८,३२९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०,२७२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या तीन वर्षांत विविध प्रकल्पांवर केलेल्या भांडवली खर्चाचा फायदा आगामी कालावधीत दिसून येईल. सध्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओला उत्तम आधार देईल यात शंका नाही.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड (ओएनजीसी) (बीएसई कोड ५००३१२)

संकेतस्थळ: http://www.ongcindia.com

प्रवर्तक: सरकारी उपक्रम

बाजारभाव: रु. २६६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऑइल अँड गॅस

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६२९०.१४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५८.८९

परदेशी गुंतवणूकदार ८.१२

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १९.०४

इतर/ जनता १३.९५

पुस्तकी मूल्य: रु. २८०/-

दर्शनी मूल्य: रु. ५/-

लाभांश: २४५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३३.७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.०५

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.५४

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५.५९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १८.४

बीटा : १.६

बाजार भांडवल: रु.३,३५,१७५ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३४५/२२३

गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader