अजय वाळिंबे

नेस्ले इंडिया लिमिटेड ही स्विस बहुराष्ट्रीय कंपनी नेस्ले एसएची उपकंपनी आहे. कंपनी अन्न प्रक्रिया उद्योगात कार्यरत असून उत्पन्नावर आधारित जगातील सर्वात मोठी खाद्य कंपनी आहे. नेस्ले इंडिया ही भारतातील अग्रगण्य ‘एफएमसीजी’ कंपनी असून ती दुग्धजन्य पदार्थ, इन्स्टंट कॉफी, नूडल्स तसेच इतर बहुतांश खादय उत्पादन श्रेणींमध्ये भारतीय बाजारपेठेतील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनीचे भारतात नऊ उत्पादन प्रकल्प असून लवकरच दहावा प्रकल्प ओडिसा राज्यात सुरू होईल. कंपनीचे देशभरात दहा हजारहून अधिक वितरक आहेत.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

उत्पादन पोर्टफोलियो:

मॅगी नाममुद्रेअंतर्गत उत्पादनांच्या श्रेणीसह नेस्ले पाककला विभागातील अग्रणी कंपनी आहे. कंपनीचा दूध आणि पोषण उत्पादने या श्रेणीमध्ये भारतात मोठा बाजार हिस्सा असून कंपनी कंडेन्स्ड मिल्क (मिल्कमेड), स्किम्ड मिल्क (नेस्ले ए स्लिम मिल्क), दूध पावडर यांसारखी दुधावर आधारित उत्पादने बनवते. तसेच कंपनी ‘नेस्ले एनएएन’, लॅक्टोजेन, सेरेलॅक, नेस्टम या नाममुद्रेखाली बेबी फूड म्हणजेच लहान मुलांसाठी पोषणयुक्त आहारदेखील बनवते. मॅगी या नाममुद्रेअंतर्गत उत्पादनांमध्ये केचप आणि सॉस, इन्स्टंट नूडल्स (मॅगी नूडल्स, आटा, ओट्स, चिकन फ्लेवर्ड नूडल्स) यांचा समावेश आहे. नेस्लेकडे चॉकलेट्समधील किट-कॅट, मंच, बार-वन. अल्पिनो, मिल्कीबार इ. चॉकलेट लोकप्रिय आहेत. कंपनीने मंच (मंच नट्स) आणि किट-कॅट (किट-कॅट सेन्स, डार्क चॉकलेट) मध्ये एक नवीन प्रकार बाजारात आणला आहे.

हेही वाचा >>> Money Mantra : मार्ग सुबत्तेचा : आरोग्य निधीचे आर्थिक नियोजन

वर्ष २०१५ मध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने (एफएसएसआय) ५ जून रोजी मॅगीवर देशभरात बंदी घातली होती. मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचे प्रमाण मर्यादेहून अधिक असल्याने त्याचे सेवन घातक असल्याचे ‘एफएसएसआय’चे म्हणणे होते. मात्र या मोठ्या धक्क्यातून सावरत काही महिन्यांतच कंपनीने आपले उत्पादन बाजारात पुन्हा सादर केले. यावेळी सर्व अनुपालनांसह आज मॅगी भारतात सर्वात लोकप्रिय आहे.

जून २०२३ साथी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ५,०३७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८२९ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो २५ टक्क्यांनी अधिक आहे. लवकरच म्हणजे ७ फेब्रुवारीला कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार असून अंतरिम लाभांशदेखील जाहीर करण्यात येईल.

हेही वाचा >>> Money Mantra : नॉमिनेशन नुसार मिळालेल्या संपत्तीवर नॉमिनीचा कायदेशीर हक्क असतो का?

नेस्लेने संशोधन, विकास आणि नवनिर्मितीला कायम प्राधान्य देऊन भारतीय बाजारपेठेला चवीप्राणे उत्पादने पुरवली आहेत. उत्तम, अनुभवी बहुराष्ट्रीय प्रवर्तक असलेल्या नेस्लेने भारतातील वाढती लोकसंख्या तसेच वाढते शहरीकरण लक्षात घेऊन मोठी शहरे तसेच ग्रामीण बाजारपेठेत आपली विविध उत्पादने सादर केली आहेत. कंपनीच्या उत्पादनांना त्यांच्या गुणवत्ता आणि दर्जामुळे कायम वाढती मागणी असून उत्तम विपणन व्यवस्थेमुळे कंपनी आपली उत्पादने खेड्यापाड्यात पुरवू शकते. नेस्लेने कायमच उत्तम कामगिरी करून आपल्या भागधारकांना कायम फायद्यात ठेवले आहे. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या एका शेअर भाव २६,५०० च्या आसपास गेल्यावर कंपनीने आपल्या दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे विभाजन १ रुपया दर्शनी मूल्यात केले. त्यामुळे शेअरचा भाव आता आवाक्यात वाटू लागला आहे. सध्या २,५०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर प्रदीर्घ काळासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता.

नेस्ले इंडिया लिमिटेड 

(बीएसई कोड: ५००७९०)

वेबसाइट: www.nestle.in

प्रवर्तक: नेस्ले एसए स्वित्झर्लंड

बाजारभाव: रु.२४८२/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : अन्न प्रक्रिया

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९६.४२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६२.७६

परदेशी गुंतवणूकदार १२.०९

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.१६

इतर/ जनता १५.९९

पुस्तकी मूल्य: रु. २९.६

दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: २२००%

प्रति समभाग उत्पन्न: रु.३०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८२.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५५.६

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २७.७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई ): १३८%

बीटा: ०.४

बाजार भांडवल: रु. २३९,२०० कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २७७१/ १७८८

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

Stocksandwealth@gmail.com

हा लेख म्हणजे गुंतवणूक सल्ला नव्हे. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.