अल्प आणि दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कराच्या आकारणीत आमूलाग्र बदल झाले आहेत. हे आपण मागील काही लेखांमधून समजून घेतले. संपत्ती अल्प किंवा दीर्घमुदतीची ही त्याच्या धारणकाळानुसार ठरते. हा धारणकाळ पूर्वी (म्हणजे २३ जुलै, २०२४ पूर्वी) ३६ महिन्यांचा होता, तो आता (२४ जुलै, २०२४ नंतर) २४ महिन्यांचा करण्यात आला. याला प्रामुख्याने दोन अपवाद होते. एक म्हणजे शेअरबाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग, किंवा सूचिबद्ध सिक्युरिटीज, इक्विटी फंडातील युनिट यांच्यासाठी हा कालावधी १२ महिने आहे. स्थावर मालमत्ता आणि खासगी कंपन्यांचे समभाग यांच्यासाठी हा कालावधी पूर्वीच २४ महिने केला होता. आता या व्यतिरिक्त इतर सर्व भांडवली संपत्तीसाठीसुद्धा (सोने वगैरे) हा कालावधी २४ महिन्यांचा करण्यात आला आहे. यामुळे करदात्यांची भांडवली संपत्ती दीर्घमुदतीची होण्यासाठी खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिने वाट न बघता ती २४ महिन्यातच दीर्घमुदतीची होणार. अशा दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यासाठी करदात्याला कर वाचविण्यासाठी किंवा करदायित्व कमी करण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. या तरतुदीमुळे करदात्याला लाभच होणार आहे. या पर्यायांमध्ये एक लोकप्रिय पर्याय म्हणजे नवीन घरात गुंतवणूक करून कर वाचविणे किंवा कमी करणे.

एक घर विकून नवीन घरात गुंतवणूक :

करदात्याने एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक केल्यास कर भरावा लागत नाही. यासाठी कलम ५४ नुसार अटींची पूर्तता करावी लागते. घर खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यानंतर विकले तरच हे कलम लागू होते. नवीन घरातील गुंतवणूक जुने घर विक्रीच्या १ वर्ष आधी किंवा विक्रीनंतर २ वर्षाच्या आत (खरेदी केले तर) किंवा ३ वर्षाच्या आत (बांधले तर) करावी लागते. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक नवीन घरात केल्यास करदात्याला भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास, नवीन घरातील गुंतवणुकीएवढी वजावट करदाता घेऊ शकतो. ज्या आर्थिक वर्षात जुन्या घराची विक्री केली त्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र भरण्यापूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास करदात्याला भांडवली नफ्याएवढी रक्कम ‘कॅपिटल गेन खात्यात’ जमा करावी लागते.

Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?

इतर संपत्ती विकून नवीन घरात गुंतवणूक :

करदात्याने घराव्यतिरिक्त इतर कोणतीही संपत्ती विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक केल्यास कर भरावा लागत नाही. यासाठी कलम ‘५४एफ’नुसार अटींची पूर्तता करावी लागते. विकलेली संपत्ती दीर्घ मुदतीची असली पाहिजे. शिवाय इतर काही अटींची पूर्तता देखील करावी लागते. इतर संपत्ती विकून नवीन घरात गुंतवणूक करावयाची असल्यास संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविल्यास करदात्याला कर भरावा लागत नाही. कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास, त्याप्रमाणात वजावट करदाता घेऊ शकतो. या कलमानुसार वजावट घ्यायची असेल, तर करदात्याकडे एकापेक्षा जास्त घर (नवीन घर सोडून) नसले पाहिजे किंवा मूळ संपत्ती विक्रीच्या तारखेनंतर, नवीन घरातील गुंतवणूक सोडून, अजून एक घर एका वर्षात खरेदी केले (किंवा ३ वर्षात बांधले) नसले पाहिजे. या दोन्ही कलमानुसार नवीन घरातील गुंतवणुकीची मर्यादा १० कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचा – Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

आता प्रश्नोत्तराकडे वळूया :

प्रश्न : मी डिसेंबर, २०२१ मध्ये माझे एक घर विकले आणि मला दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. मी नवीन घर बांधणार होतो, त्यामुळे मी ‘कॅपिटल गेन’ खात्यात पैसे जमा करून त्यावर्षीच्या भांडवली नफ्यातून वजावट घेतली. परंतु मी नवीन घर बांधू शकत नाही. मला आता कर भरावा लागेल का?

  • शिवानंद कोरे

उत्तर : एक घर विकून झालेल्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी ३ वर्षात नवीन घर बांधणे अपेक्षित होते. ते आपण बांधू शकत नसल्यामुळे ही तीन वर्षांची मुदत संपल्यावर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करपात्र असेल. आपली मुदत डिसेंबर, २०२४ मध्ये संपते, त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात आपल्याला या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल. आपल्याला ‘कॅपिटल गेन’ खात्यात जमा असलेले पैसे काढण्यासाठी फॉर्म ‘जी’, प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या मान्यतेसह, बँकेला सादर करावा लागेल.

प्रश्न : एका खासगी कंपनीचे समभाग मी २०२० मध्ये ५० लाख रुपयांना खरेदी केले होते आणि ऑगस्ट, २०२४ मध्ये मी ते ८० लाख रुपयांना विकले. मला ३० लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. मला यावर किती कर भरावा लागेल? नवीन घरात गुंतवणूक केल्यास कर वाचविता येईल का?

  • संध्या कोंदे

उत्तर : या अर्थसंकल्पात झालेल्या सुधारणेनुसार, आपण हे समभाग २३ जुलै, २०२४ नंतर विकल्यामुळे, आपल्याला ‘इंडेक्सेशन’चा लाभ मिळणार नाही. हे खासगी कंपनीचे समभाग असल्यामुळे भांडवली नफा गणतांना समभागाचे ‘वाजवी बाजार मूल्य’ सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागेल. भांडवली नफा गणतांना आपल्याला झालेल्या ३० लाख रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५० टक्के इतका कर (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) भरावा लागेल. नवीन घरात गुंतवणूक केल्यास आपला कर वाचू शकतो. आपल्याकडे एकापेक्षा जास्त घरे (नवीन घरातील गुंतवणूक सोडून) असल्यास आपल्याला या नवीन घरातील गुंतवणुकीचा लाभ, कर वाचविण्यासाठी मिळणार नाही. आपल्याला संपूर्ण विक्री रक्कम म्हणजेच किमान ८० लाख रुपये नवीन घरात गुंतवावे लागतील. याशिवाय ‘५४ एफ’ या कलमानुसार इतर अटींची पूर्तता करावी लागेल.

प्रश्न : मला वर्ष २०२२ मध्ये ३ लाख रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला होता. हा तोटा मी त्यावर्षीच्या विवरणपत्रात दाखविला होता आणि ‘कॅरी-फॉरवर्ड’ केला होता. यावर्षी मला समभागाच्या विक्रीवर पाच लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. मला २०२२ मध्ये झालेला अल्पमुदतीचा भांडवली तोटा यावर्षीच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल का?

  • शशांक शिंदे

उत्तर : अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. पुढील वर्षी तो अल्पमुदतीच्या किंवा दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. ज्या वर्षी भांडवली तोटा झाला, त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले तरच तो तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो.

प्रश्न : माझा मुलगा परदेशात आहे आणि तेथेच स्थायिक होणार आहे. त्याला परदेशात घर खरेदी करावयाचे आहे. माझ्या मुलाने ठाणे येथे एक घर २०१० मध्ये खरेदी केले होते, ते विकून त्याने परदेशात पैसे पाठवून तेथे नवीन घर खरेदी केले तर ठाणे येथील घरावर झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविता येईल का?

  • एक वाचक

उत्तर : कलम ‘५४’ नुसार एक घर विकून दुसऱ्या घरात पैसे गुंतविल्यास करदाता कर सवलत घेऊ शकतो. या कलमानुसार एक अट अशी आहे की हे घर भारतातच असले पाहिजे. त्यामुळे नवीन घरातील गुंतवणूक परदेशात केली असल्यास त्याची सवलत घेता येणार नाही.

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader