scorecardresearch

Premium

Money Mantra: महिन्याच्या अखेरीस निफ्टी 19600च्या वर बंद; फार्मा कंपन्या तेजीत !

Money Mantra: अमेरिकेतील औषध निर्माण उद्योगांमध्ये झालेले सकारात्मक बदल यासाठी कारणीभूत ठरले आहेत. आगामी काळात भारतीय फार्मा कंपन्यांना परदेशात विस्तार करणे सुलभ होणार आहे, या सकारात्मक बातमीमुळे फार्मा कंपन्यांमध्ये तेजी परतली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

pharma companies doing well
फार्मा कंपन्या तेजीत (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आठवड्याच्या सुरुवातीला अनिश्चित पद्धतीने सुरू झालेल्या बाजाराने मध्यावर चांगलीच गटांगळी खाल्ली होती. मात्र आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोरदार वापसी करून तेजी वाल्यांनी बाजार पुन्हा एकदा १९६००च्या वर नेऊन ठेवला. निफ्टी आणि सेन्सेक्स पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये नवीन तेजीची पातळी गाठण्यास सज्ज झाले आहेत.

तेजीचे मानकरी

New Rules From 1st October
१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार
plot allotted for oxygen plant, businessman given option, businessman can start new business on the plot allotted by government
प्राणवायू निर्मात्या कंपन्यांसाठी नव उद्योगांचा गालिचा, जुन्याच भुखंडावर नवा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय खुला
Festive Season Retail Sector job
रिटेल क्षेत्रात भरपूर नोकऱ्यांची संधी; रिलायन्स रिटेल, ट्रेंट, टायटन यांसारख्या कंपन्या देणार रोजगार
insurance must Long term financial planning
दीर्घकालीन अर्थनियोजन विमा हवाच!

हिंडाल्को, एन.टी.पी.सी. या कंपन्यांनी सर्वोत्तम कामगिरी दाखवली. हिंडाल्कोचा शेअर साडेपाच टक्क्यांनी तर एन.टी.पी.सी. चार टक्क्यांनी वाढला. डॉक्टर रेड्डी, डिव्हिज लॅबोरेटरीज, टाटा मोटर्स, अपोलो, हिरो मोटो, ओएनजीसी, सन फार्मा, सिप्ला, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी या शेअरच्या भावात एक ते तीन टक्के एवढ्या पातळीत वाढ झालेली दिसली.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय?

यांच्या भावात घसरण

अदानी एंटरप्राइजेस अडीच टक्क्याने कमी झालेला दिसला. एल अँड टी माईंड ट्री, एच.सी.एल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, एशियन पेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालेली दिसली.

निफ्टी आणि सेन्सेक्सच्या तुलनेत मिडकॅप शेअर्समध्ये तेजी पुन्हा परतली. सर्वच मिडकॅप कंपन्यांमध्ये तेजी दिसलेली नसली तरी मिडकॅप इंडेक्स अन्य ब्रॉडर मार्केटच्या तुलनेत वर गेला. बीएससी मिडकॅप इंडेक्स एक टक्क्याने वर गेला तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये अर्ध्या टक्क्याचीच वाढ झालेली दिसली.

सेक्टरचा अंदाज

या आठवड्याचा हिरो ठरले फार्मा सेक्टर ! फार्मा कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत दिसले. NSE निफ्टी फार्मा इंडेक्स मध्ये २.७% एवढी घसघशीत वाढ एका आठवड्यात नोंदवली गेली. अमेरिकेतील औषध निर्माण उद्योगांमध्ये झालेले सकारात्मक बदल यासाठी कारणीभूत ठरले आहेत. आगामी काळात भारतीय फार्मा कंपन्यांना परदेशात विस्तार करणे सुलभ होणार आहे, या सकारात्मक बातमीमुळे फार्मा कंपन्यांमध्ये तेजी परतली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. फार्मा कंपन्यातील आघाडीची कंपनी असलेल्या ग्लेनमार्कचा भाव शुक्रवारी बाजार बंद होताना आठ टक्क्यांनी वाढलेला दिसला. यामुळे एकूणच फार्मा इंडेक्सला बळ मिळालेले दिसले. अरविंद फार्मा या कंपनीचा शेअर सहा टक्क्याने वाढलेला दिसला. या कंपनीला परदेशी बाजारांमध्ये एका औषधाचे उत्पादन आणि त्याची निर्यात करण्याचे परवाने मिळाल्याची बातमी आल्याने शेअरच्या भावात उसळी दिसून आली.

बँक निफ्टीमध्ये सुरू असलेली घसरण थोडीशी का होईना मंदावली. २० आठवड्याच्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या (20 W Moving Average) वर बँक निफ्टी बंद झाल्याने ती एक सकारात्मक बाब समजली जात आहे.

आठवड्या अखेरीस निफ्टी ११४ (०.५९ %) अंकाने वर जाऊन १९६३८ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ३२० (०.४९ %) अंकाने वर जाऊन ६५८२८ या पातळीवर बंद झाला. निफ्टी आयटी इंडेक्स वगळता सर्वच क्षेत्रातील इंडेक्स चा परतावा सकारात्मक होता. सप्टेंबर महिन्याचा एकूण अंदाज घेता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच एफ. आय. आय. बाजारातून पैसे काढून घेताना दिसले. अखेरची आकडेवारी उपलब्ध झाली तोपर्यंत एफ. आय. आय. गुंतवणूकदारांनी २५००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले व भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १७५०० कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेतले. परदेशी गुंतवणूकदारांनी विकलेल्या शेअर्समध्ये मुख्यत्वे बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सोने खरेदीसाठी महत्त्वाचा समजला जातो या महिन्याखेरीस सोन्याच्या दरांमध्ये विशेष वाढ किंवा घट दिसून आली नाही.

ग्लोबल मार्केट आणि क्रूड ऑइल

ग्लोबल मार्केटसाठी एक आशादायक बातमी म्हणजे क्रूड ऑइलच्या भावामध्ये घसरण होताना दिसली. रशिया आणि सौदी अरेबिया या प्रमुख क्रूड उत्पादक देशांनी आपल्या क्रूड ऑइलच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर क्रूड ऑइलचा सगळ्यात मोठा आशियातील ग्राहक असलेल्या चीनच्या मागणीमध्ये वाढ दिसून आल्याने क्रूड ऑइलचे भाव घसरले. गुरुवारी उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये क्रूड ऑइलचा भाव एक टक्क्यांनी कमी झालेला दिसला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nifty closes above 19600 pharma companies doing well mmdc psp

First published on: 30-09-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×