लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजारात एकीकडे पडझड सुरू असली प्राथमिक बाजारात म्हणजेच प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. कृषी क्षेत्राशी निगडित सामग्रीची निर्माता असलेल्या नोव्हा ॲग्रीटेकच्या प्रारंभिक समभाग विक्रीला पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांकडून दमदार प्रतिसाद लाभला. २३ जानेवारी रोजी ‘आयपीओ’ खुला होताच गुंतवणूकदारांनी १०.२८ पट अधिक प्रतिसाद दिला. कंपनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून २.४५ कोटी समभागांची विक्री करणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून दसपट अधिक म्हणजेच २५.२३ कोटी समभागांची मागणी करणारे अर्ज दाखल झाले.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

कंपनीचा ‘आयपीओ’ येत्या २५ जानेवारीपर्यंत खुला राहणार असून गुंतवणूकदारांना किमान ३६५ समभाग आणि त्या पटीत ‘आयपीओ’साठी अर्ज करता येईल. या ‘आयपीओ’साठी प्रधान व्यवस्थापक म्हणून कीनोट कॉर्पोरेट सर्व्हिसेस काम पाहत आहे. सुकाणू गुंतवणूकदारांनी यापूर्वीच कंपनीचे ४३ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.

हेही वाचा >>>Money Mantra : ‘हे’ खर्च आणि गुंतवणूक’ कर सवलतीस पात्र आहेत हे तुम्हाला माहितेय का?

मेगाथर्म इंडक्शनची भागविक्री २५ जानेवारीपासून

मेगाथर्म इंडक्शनची भागविक्री येत्या २५ जानेवारीपासून खुली होणार असून, ३० जानेवारीपर्यंत ‘आयपीओ’साठी अर्ज करता येईल. कंपनीने यासाठी १०० ते १०८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी असलेला हा ‘आयपीओ’ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १२०० समभाग आणि त्यानंतर १२०० समभागांच्या पटीत ‘आयपीओ’साठी अर्ज करता येईल. मेगाथर्म इंडक्शन लिमिटेड ही कंपनी इंडक्शन मेल्टिंग फर्नेस आणि इतर इंडक्शन हीटिंग उपकरणे तयार करते. हेम सिक्युरिटीज या भागविक्री प्रक्रियेची प्रधान व्यवस्थापक आहे. रेल्वे, स्टील, वाहनपूरक उद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगांतील नामांकित कंपन्यांसह, ऑर्डिनन्स फॅक्टरी, बीएचईएल, महिंद्र, टाटा मोटर्स आणि हिंडाल्को या कंपनीच्या सेवा-उत्पादनांची मुख्य ग्राहक आहे.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- डीएसपी टॉप १०० इक्विटी फंड

मेडी असिस्ट ११ लाभासह सूचिबद्ध

विद्यमान वर्षातील पहिल्या ‘आयपीओ’च्या भांडवली बाजारातील यशस्वी पदार्पणानंतर मंगळवारच्या सत्रात मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेसचे समाधानकारक आगमन झाले. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होऊन यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना या समभागाने सूचिबद्धतेलाच ११ टक्के परतावा दाखविला आहे.

मंगळवारी मेडी असिस्टच्या समभागाने मुंबई शेअर बाजारात ४६५ रुपयाच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. प्रति समभाग ४१८ रुपये किमतीला प्रारंभिक भागविक्रीतून हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला असून, त्याने बाजारात पहिले पाऊलच ११ टक्के अधिमूल्यासह टाकले. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने ५१८ रुपयांचा किमतीतील उच्चांकही गाठला. दिवसअखेर तो प्रति समभाग ४६.१० रुपयांच्या लाभासह ४६४.१० रुपये या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर स्थिरावला.