सहामाही परतावा कामगिरीचा वेध

कंपनीचे नावशिफारस तारीखखरेदी किंमत२७ जूनचा बंद भावनफा/(तोटा) रु.नफा /(तोटा)%
इंडियामार्ट इंटरमेश६.०१.२०२५२,२५६२,६१०३५४१५.७
डीसीएक्स सिस्टीम्स लि.१३.०१.२०२५ ३६४ २७४ ९०२४.७
ओएनजीसी लि.२०.०१.२०२५ २६६ २४४ २२ ८.२
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस३.०२.२०२५ २४४ ३२४ ८० ३३
ट्रान्सरेल लायटिंग लि.१०.०२.२०२५ ५८५ ६६० ७५१२.८
जागरण प्रकाशन लि.१७.०२.२०२५ ७१ ७२ १.५
संधार टेक्नॉलॉजीज लि.२४.०२.२०२५ ३८४ ५४२ १५८४१.२
वरुण बीव्हरेजेस लि.३.०३.२०२ ४३५ ४६२ २७ ६.२
डॅनलॉ टेक्नॉलॉजीज लि.१०.०३.२०२५१,०४२ ९९१ ५१ ४.९
अजॅक्स इंजिनीयरिंग लि.१७.०३.२०२५ ५९० ६२७ ३७ ६.२
अल्केम लॅबोरेटरीज लि.२४.०३.२०२५५,००१४,९१० ९१ १.८
भारत बिजली लि.७.०४.२०२५२,८३४३,०७३ २३९ ८.४
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर१४.०४.२०२५ ५४४ ४९० ५४ ९.९
तेगा इंडस्ट्रीज लि.२१.०४.२०२५१,४४२१,५१६ ७४ ५.२
अलेम्बिक लिमिटेड२८.०४.२०२५ १०१ ११५ १४ १४.२
सीमेन्स लिमिटेड५.०५.२०२५२,९२०३,१९५ २७५ ९.४
एनटीपीसी ग्रीन एनर्जी१२.०५.२०२५ ९७ १०६ ९.३
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लि.१९.०५.२०२५ ३० ३१ ०.३
हिंडाल्को लिमिटेड२६.०५.२०२५ ६५१ ६९६ ४५ ६.९
शारदा क्रॉपकेम लि.२.०६.२०२५ ७३८ ७८६ ४८ ६.५
एलटी माइंडट्री९.०६.२०२५५,२१५ ५,३०० ८५ १.६
एलटी माइंडट्री१६.०६.२०२५ १८६ १९० २.१
व्हेसूवियस इंडिया लि.२३.०६.२०२५ ५५७ ५५६ ०.२
एकूण२६,५५३२७,७६९१,२१६ .६%

आयआरआर २३.६०%

पहिल्या सहामाहीत शेअर बाजार निर्देशांकाप्रमाणेच ‘माझा पोर्टफोलियो’ची कामगिरीदेखील यथातथाच आहे. २६,५५३ रुपयांच्या गुंतवणुकीचे १,२१६ रुपये नफ्यासह (४.६ टक्के वाढ) २७,७६९ रुपये झाले आहेत. म्हणजे सध्याचा आयआरआर अर्थात वार्षिकीकृत परतावा दर २३.६ टक्के आहे. जगभरातील शेअर बाजारात प्रचंड अनिश्चितता असून त्याला सध्याचे युद्धप्रदूषित वातावरण, अमेरिकेची वारंवार बदलणारी आर्थिक धोरणे आणि निर्बंध, बेरोजगारी, चलनवाढ आणि अर्थात परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा वाढता जोर अशी अनेक कारणे देता येतील. सोने आणि चांदी मात्र अपेक्षेप्रमाणे तेजीत आहेत.

अर्थात शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील केवळ दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरत असते हे आतापर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. या सदरातील शेअर्स हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. गुंतवणूकदारांनी सतर्क राहून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल अभ्यासून बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. तसेच वेळोवेळी ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबून तोटा मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे. अजय वाळिंबे Stocksandwealth@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून, त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. ‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत विवेचन केलेले शेअर्स हा आर्थिक सल्ला अथवा शिफारस नाही. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.