आपण शक्यतो आपल्याच देशात गुंतवणूक करणं पसंत करतो. कारण ती सोपी असते, त्याबाबत चांगल्या प्रकारे माहिती मिळवता येते, त्यातून पैशांची काढ-घाल बऱ्यापैकी सुरक्षित असते. गैरप्रकारांविरोधात योग्य कायदे असतात. मात्र एक जागतिक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओकडे बघतो, तेव्हा ‘ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन’ अर्थात गुंतवणुकीमध्ये जागतिक विविधीकरण साधतो. उदाहरण घ्यायचं तर भारतातील गुंतवणूकदार अमेरिका, जपान, चीन इत्यादी देशांच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला जागतिक गुंतवणूकदाराचा दर्जा मिळतो. असे गुंतवणूकदार जिथे कुठे वाजवी किंमत आणि झेपण्याजोगी जोखीम असेल तिथे गुंतवणूक करतात. कारण सगळ्याच ठिकाणी एकसारखी शेअरबाजाराची कामगिरी नसते. कधी एक बाजार वर तर कधी दुसरा खाली. काही उद्योग काही देशांमध्ये जास्त चांगली कामगिरी दाखवतात, तर काही गुंतवणुकीच्या पद्धती आपल्या देशात नसतात. मग अशा वेळी योग्य माहिती काढून आपल्या देशाच्या बाहेर जे चांगलं असेल त्यात गुंतवणूक करता येऊ शकते.

आता ही गुंतवणूक मुळात कशी करता येते हे आपण समजून घेऊ. आपण एक तर थेट समभाग विकत घेऊ शकतो किंवा अशा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवू शकतो जे या प्रकारची गुंतवणूक करतात. या सर्व प्रकारांचं एक थोडंसं विश्लेषण इथे मांडत आहे.

Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत

१. थेट गुंतवणूक – यासाठी गुंतवणूकदाराला अशा ब्रोकरकडे स्वतःचं खातं उघडावं लागतं, जो परदेशातील शेअर बाजाराशी संलग्न आहे. असा ब्रोकर भारतीय असू शकतो किंवा परदेशीसुद्धा असू शकतो. गुजरातमधील गिफ्टसिटीमार्फतदेखील अशी गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला ‘फेमा’ कायद्यानुसार २,५०,००० अमेरिकी डॉलरची वार्षिक मर्यादा लागू होते. अशा प्रकारे गुंतवणूक करताना बऱ्यापैकी दलाली आणि इतर शुल्क लागते. याशिवाय ७ लाख रुपयांच्यावर वार्षिक गुंतवणूक केल्यास २० टक्के ‘टीसीएस’देखील लागू होतो. या गुंतवणुकीला परकीय चलनाच्या वर-खाली होण्याने फरक पडतो. रुपया वधारला तर नुकसान होतं आणि परकीय चलन वधारलं तर फायदा.

हेही वाचा : Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?

२. म्युच्युअल फंड (ऑफशोर किंवा फीडर फंड) – हे फंड आपल्या देशात गुंतवणूकदारांचे पैसे गोळा करून, बाहेरच्या देशातील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. हे बाहेरचे फंड थेट समभाग गुंतवणूक करत असतील किंवा एखाद्या निर्देशांकांत पैसे घालत असतील. उदाहरण – डीएसपी वर्ल्ड गोल्ड मायनिंग फंड, फ्रँकलिन इंडिया फीडर, फ्रँकलिन यूएस ऑपर्च्युनिटीज फंड ही गुंतवणूक रुपयांमध्ये होत असल्याने कोणतीही मर्यादा नाही. शिवाय इथे चलनाशी निगडित जोखीम गुंतवणूकदाराला नाही, पण फंडाला आहे.

३. म्युच्युअल फंड (थेट गुंतवणूक) – असे फंड परदेशी कंपन्यांचा पोर्टफोलिओ स्वतः तयार करून त्यात गुंतवणूक करत असतात. या प्रकारच्या फंडांमध्ये भारतीय कंपन्यांमधील गुंतवणूकसुद्धा असू शकते किंवा ते पूर्णपणे परदेशातील कंपन्यांमध्येच गुंतवणूक करत असतील. उदाहरण – पराग पारिख फ्लेक्झीकॅप फंड, निप्पॉन इंडिया तैवान इक्विटी फंड. ही गुंतवणूक रुपयांमध्ये होत असल्याने कोणतीही मर्यादा नाही. शिवाय इथे चलन निगडित जोखीम गुंतवणूकदाराला नाही, पण फंडाला आहे.

कर नियम

या वरील कोणत्याही प्रकारात गुंतवणूक करण्यापूर्वी करासंबंधित नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. जर थेट समभाग गुंतवणूक असेल तर परदेशात लागणारा भांडवली कर आणि लाभांशावर (डिव्हिडंड) लागणारा कर हे दोन्ही समजून घ्यायला हवेत. कोणत्या देशाबरोबर ‘डबल टॅक्सेशन अव्हॉइडन्स ॲग्रिमेंट’ आहे आणि त्यात कोणत्या मिळकतीवर कुठल्या देशात किती कर कधी भरावा लागणार हे गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे अशी गुंतवणूक २४ महिन्यांनंतर विकल्यास नफ्यावर १२.५ टक्के कर लागतो, परंतु २४ महिन्यांच्या आत विकून जर नफा झालेला असेल तर त्यावर गुंतवणूकदाराच्या उत्पन्न स्तरानुसार कर आकारला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करण्याआधी खालील प्रश्न गुंतवणूकदाराने स्वतःला विचारायला हवेत:

१. मला खरंच ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे का?

२. अशा गुंतवणुकीतून किती फायद्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी किती खर्च करायची तयारी आहे?

३. परकीय चलनात गुंतवणूक करायची असेल तर कोणते नियम लागू पडतील?

४. बाहेरच्या देशातील राजकीय स्थैर्य, चलनवाढ, मध्यवर्ती बँक धोरण, सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) अपेक्षित वाढ, भूराजकीय परिस्थिती इत्यादी गोष्टींचा आपल्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजण्याइतका आपला अभ्यास आहे का?

५. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आपले पैसे परत भारतात आणायला त्रास होऊ शकतो का?

६. आपला आर्थिक आराखडा भक्कम करून त्यानुसार गुंतवणूक केलेली आहे का?

हेही वाचा : बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी

येत्या काळातील संभाव्य धोके लक्षात घेता, अशा प्रकारची गुंतवणूक फायद्याची होऊ शकते. उदाहरण घ्यायचं तर येत्या काळात जर अमेरिकेत जास्त मंदी असेल आणि जपानमध्ये कमी, तर जपानमध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची असेल. जे गुंतवणूकदार आज देशाबाहेर आहेत, परंतु पुढे कधीतरी निवृत्तीनंतर परत येण्याचा विचार करत असतील तर त्यांनी दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक ठेवावी. जर मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च परकीय चलनात करावा लागणार असेल, तर त्या देशात काही काळ आधी पैसे गुंतवून चलनाची जोखीम कमी करता येऊ शकते. एक प्रगल्भ आणि मुरलेला गुंतवणूकदार या सर्व गोष्टींचा विचार करून मग पुढचं पाऊल उचलतो. कारण या गोष्टी सोप्या नसतात. गरजेनुसार, अभ्यासानुसार वेळीच योग्य सल्ला घेऊन अशी गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओचं जोखीम व्यवस्थापन आणि कामगिरी दोन्ही साधता येतं. तेव्हा जसजशी संपत्ती निर्मिती वाढत जाईल तसतशी अशा प्रकारच्या गुंतवणुकीबद्धल माहिती वाढवून योग्य पद्धतीने आपला जागतिक दर्जाचा पोर्टफोलिओ तयार करून बघता येईल.

सर्व वाचकांना दीपावलीच्या अनेक शुभेच्छा!

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

Story img Loader