Rajesh Mehta Success Story : सोने हा भारतीयांच्या आभूषणाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु सध्या सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस सोने खरेदी करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतोय. सोने खरेदी करणेच इतके महाग आहे, मग सोन्याचा व्यवसाय करणाऱ्यांची काय अवस्था असेल, ते कसे आणि किती सोन्याचे व्यवहार करत असतील हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने १२००० रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती २.५ लाख कोटी रुपये आहे. होय, आपण राजेश एक्सपोर्ट्सचे मालक राजेश मेहता यांच्याबद्दल बोलत आहोत. मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता कर्नाटकात दागिन्यांच्या व्यवसायासाठी आले होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी राजेश यांनी आपल्या वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि आज देशात, जगात एक यशस्वी सोने निर्यातदार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ते राजेश एक्सपोर्ट्सचे मालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत.

हेही वाचाः Avenue Supermartsमुळे आर. के. दमाणी यांचे नशीब पालटले, अव्वल अब्जाधीशांमध्ये सामील

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले अन् सोन्याचा व्यापारी झाले

राजेश मेहता यांनी बंगळुरू येथील सेंट जोसेफ शाळेत शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण नंतर ते वडिलांच्या दागिन्यांच्या व्यवसायात रुजू झाले. त्यांनी आणि त्यांचा भाऊ प्रशांत यांनी वडिलांचा व्यवसाय वाढवण्याचा संकल्प केला. राजेश मेहता यांनी त्यांचा भाऊ बिपीन यांच्याकडून चांदीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यादरम्यान राजेश मेहता चेन्नईहून दागिने आणून राजकोटमध्ये विकायचे. यानंतर त्यांनी गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांना दागिने विकण्यास सुरुवात केली.

हेही वाचाः मदर डेअरीने ग्राहकांना दिला दिलासा, धारा ब्रँडच्या तेलाच्या दरात कपात, नवीन दर काय?

चांदीच्या विक्रीनं प्रवास सुरू केला अन् आज जगभरात सोने विकतायत

सुरुवातीच्या यशानंतर राजेश मेहता यांनी आपला व्यवसाय बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे विस्तारला. १९८९ मध्ये त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले आणि बंगळुरूमध्ये त्यांच्या गॅरेजमध्ये सोन्याचे उत्पादन युनिट सुरू केले. त्यांनी ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमध्ये सोने निर्यात करण्यास सुरुवात केली. १९९२ पर्यंत त्यांचा व्यवसाय दरवर्षी २ कोटी रुपयांपर्यंत वाढला. १९९८ पर्यंत व्यवसायाने वेग पकडला आणि वार्षिक १२०० कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली. पुढे त्यांनी शुभ ज्वेलर्स नावाचे दुकान उघडले. कंपनीची आता कर्नाटकात अशी अनेक दुकाने आहेत. कंपनीने जुलै २०१५ मध्ये स्विस रिफायनरी वाल्कम्बी ताब्यात घेतली. आता त्यांच्याकडे स्वित्झर्लंड आणि भारतातही रिफायनरी आहेत. ही जगातील सर्वात मोठी सोने निर्यात करणारी कंपनी आहे. २०२१ मध्ये कंपनीचा महसूल २.५८ लाख कोटी रुपये होता. कंपनी भारत, स्वित्झर्लंड आणि दुबई येथून सोन्याचे दागिने आणि सोन्याची उत्पादने निर्यात करते.

Story img Loader