अजय वाळिंबे
Stock Market Crash FII Selling :
गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जूनअखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७६,४७८ अंशांवर तर निफ्टी २३,८६६ च्या आसपास होते. मात्र ऑगस्टमध्ये जी घसरण सुरू झाली ती आजतागायत आहे. सप्टेंबरअखेर सेन्सेक्स ७२,४८० अंशांवर तर निफ्टी २२६२० वर बंद झाला. या दोन्ही प्रमुख निर्देशांकात सुमारे ६ टक्के घसरण झाली आहे.

या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री हा बाजारासाठी सर्वात महत्त्वाचा नकारात्मक घटक ठरला आहे. यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी ३ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम बाजारातून काढून घेतली आहे. वाढलेले अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर (बाँड यिल्ड), मजबूत डॉलर, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक भू-राजकीय अनिश्चितता यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांतील गुंतवणुकीचे आकर्षण कमी झाले आहे.

‘माझा पोर्टफोलियो’ची कामगिरी मात्र या काळातही बाजारच्या तुलनेत सरस आहे. गेल्या नऊ महिन्यात पोर्टफोलियोने १७ टक्के आयआरआर (वार्षिक परतावा) दिला आहे तर मुंबई शेयरबाजारचा याच काळातील आयआरआर (-१८.६५%) आहे. ‘माझा पोर्टफोलिओ’ साठी कंपनी निवडताना केवळ बाजाराची दिशा लक्षात न घेता कंपनीची मूलभूत आर्थिक स्थिती, व्यवसायाची गुणवत्ता, नफा वाढीची क्षमता, कर्जाचे प्रमाण, व्यवस्थापनाची गुणवत्ता, मूल्यांकन आणि आगामी काळातील वाढीच्या शक्यता यांचा विचार करण्यात येतो. अर्थात वाचकांनी स्वतः अभ्यास करून, बाजाराचा कल बघून आणि संभाव्य धोके लक्षात ठेवून दीर्घकालीन गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

मंदीची प्रमुख कारणे

१. परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री.
२. अमेरिकन ट्रेझरी यिल्ड मधील वाढ.
३. घसरता रुपया.
४. खनिज तेलाच्या किमतीतील वाढ
५. पश्चिम आशियातील संघर्ष आणि अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितेत वाढ.
६. विविध बाजारांमधील परतावा आणि मूल्यांकन यांची तुलना करता भारतीय शेअरचे तुलनेने उच्च मूल्यांकन.

बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता घाबरून सर्व गुंतवणूक विकून बाहेर पडण्याऐवजी कंपन्यांच्या मूलभूत कामगिरीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बाजारातील घसरण ही चांगल्या कंपन्यांमध्ये योग्य मूल्यांकनावर गुंतवणुकीची संधी निर्माण करते याचाही विचार करणे आवश्यक आहे. सुचवलेल्या समभागांचा वारंवार आढावा घेऊन ज्या समभागांचे मूलभूत घटक मजबूत आहेत, ते राखून ठेवा आणि जे कमकुवत आहेत त्यांचा स्टॉप लॉस करावा. संयम ठेवा. शेअरमधील गुंतवणूक ही अल्पकालीन चाचणी नसून, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे टिकून राहा, कारण दीर्घकाळातच समभागांचे आणि पोर्टफोलियोचे मूल्य ओळखले जाईल.

कंपनीचे नावप्रसिद्धीची तारीखखरेदी किंमत ३०.०९.२०२६ चा बंद भावनफा/तोटा (रुपये)नफा /(तोटा)%
सियाराम सिल्क मिल्स१२.०१.२०२६५८५ ५४० (४५)७.७)
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स१९.०१.२०२६२००१२३१० ३०९ १५.४
ऑटो कार्पोरेशन ऑफ गोवा</td>२६.०१.२०२६१६७० १६३६(३४)(२)
इंडियन हॉटेल्स०९.०२.२०२६६८३ ७२९ (४४) ६.४
राजू इंजिनीअर्स १६.०२.२०२६६४ ५३ (११)(१७.५)
एनबीसीसी २३.०२.२०२६९५ ७९ (१६)(१७.३)
जीएचसीएल ०२.०३.२०२६४८१ ४०५ (७६)(१५.७)
प्रीमियर एनर्जीज ०९.०३.२०२६७२४ ८७३ १४९ २०.६
टाइम टेक्नोप्लास्ट१६.०३.२०२६१६१ १८२ २१ १३.२
झेगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस २३.०३.२०२६२०८ १७३(३५)(१६.८)
कम्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (कॅम्स)३०.०३.२०२६६३६ ६७३ ३७ ५.८
ग्राइंडवेल नॉर्टन१३.०४.२०२६१५४० १९९० ४५० २९.२
आयटीसी २०.०४.२०२६३०७ २६४ (४३)१४.१
बँको प्रॉडक्ट्स२७.०४.२०२६६०७६०६ (१)—
टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनीअरिंग०४.०५.२०२६१२८९ १००६ (२८७)(२१.९)
सुंदरम फास्टनर्स११.०५.२०२६८४७ ११३९२९२ ३४.५
फाइव्ह-स्टार बिजनेस फायनान्स१८.०५.२०६४६६ ५१७ ५१ १०.९
जीएनएफसी २५.०५.२०२६५०७ ६०४ ९७ १९.२
एचबीएल इंजिनीअरिंग०१.०६.२०२६८२६ ७९४(२९)(३.५)
फोसेको क्रुसिबल ८.०६.२०२६१२०० १९८४ ७८४ ६५.३
एएसके ऑटोमोटिव्ह१५.०६.२०२६४२९ ६४१ २१२ ४९.३
पॉवरिका २२.०६.२०२६५९१ ६०१ १० १.७
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस२९.०६.२०२६७४४ ६२१ (१२३) (१६.५)
करारो इंडिया१३.०७.२०२६५६९ ५२७ (४२)(७.३)
जी एम ब्रुअरीज २०.०७.२०२६८९९ ९६९ ७० ७.८
डॉ रेड्डीज२७.०७.२०२६११५१ १२३६ ८५ ७.४
आयआयएफएल फायनान्स ०३.०८.३०३६६०९ ६०२ (८) (१.२)
दीपक नायट्राइट१०.०८.२०२६१७५० १५३१ (२१९)(१२.५)
गुलशन पॉलीऑल्स१७.०८.२०२६१८८ १६६ (२२)(११.७)
होंडा पॉवर २४.०८.२०२६२०६५ १८८४(१८१) (८.८)
पार्क मेडी वर्ल्ड ३१.०८.२०२६२९१ २७५(१६)(५.६)
अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट०७.०९.२०२६११२६ १२३१ १०६ ९.४
व्ही गार्ड इंडस्ट्रीज १४.०९.२०२६३२४ २९६ (२८)(८.५)
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज २१.०९.२०२६३२६० ३३०० ४० १.२
गुजरात एनर्जी २८.०९.२०२६२३६ २३८२ ०.८
एकूण २९१२८ ३०६७७ १५५० ५.३

आयआरआर: १७.०३%

stocksandwealth@gmail.com