Share Market Portfolio Tips Marathi : युद्ध-काळात पोर्टफोलियोचा आढावा घेणे आव्हानात्मक आहेच. गेले काही महिने मंदीच्या छायेत असलेला शेअर बाजार गेल्या महिन्याभरात सावरला आहे. २८ फेब्रुवारीला म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून आज म्हणजे १ जुलैपर्यंत सेन्सेक्समध्ये सुमारे ६.१ टक्क्यांनी घसरण झाली असून यंदाच्या पाहिल्याच सहमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे २.७ लाख कोटी बाजारातून काढून घेतले आहेत.‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेल्या शेअरची कामगिरी मात्र आता बऱ्यापैकी सुधारली आहे. गुंतवलेल्या १६,६६० रुपयांचे २२१० रुपये फायदा होऊन १८८७० रुपये झाले आहेत. या पहिल्या सहामाहीत गुंतवलेल्या शेअरमध्ये १३.३ टक्के नफा होऊन आयआरआर तब्बल ६७.४८ टक्के मिळाला आहे. पोर्टफोलिओची ही कामगिरी निर्देशांकच्या तुलनेत अर्थातच सरस आहे.

घसरणीत गुंतवणूकदाराने काय करावे?

युद्ध समाप्तीची घोषणा होऊन होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच पूर्णपणे कार्यान्वयित होईल अशी अपेक्षा आहे. या युद्धात आखाती देशांचे भरपूर नुकसान झाले असून परिस्थिती पूर्व पदावर यायला अजून काही महीने लागतील. खनिज तेलाच्या अस्थिर किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, अमेरिकेचे भारतावरील वाढते दडपण आणि निर्बंध, परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेकडे पाठ आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिर परिस्थिती यामुळे अजूनही भारतीय शेअरबाजारची तसेच इक्विटी म्युच्युअल फंडांची कामगिरी सुमार राहिल अशी चिन्हे आहेत. अशा अनिश्चित काळात साहजिकच सोने-चांदी तसेच फिक्स्ड डिपॉझिट्स आणि बॉन्ड याकडे गुंतवणूकदारांचा ओढा राहील. परंतु शेअरबाजारातील गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने इक्विटीमधील गुंतवणूक संपत्ती निर्माण करते असा अनुभव आहे. त्यामुळेच प्रत्येक पडझडीत टप्प्याटप्प्याने उत्तम शेअरची खरेदी करत राहणे फायद्यचे ठरेल.

सुचवलेल्या समभागांचा वारंवार आढावा घेऊन ज्या समभागांचे मूलभूत घटक मजबूत आहेत, ते राखून ठेवा आणि जे कमकुवत आहेत त्यांचा स्टॉपलॉस करावा. संयम ठेवा. शेअरमधील गुंतवणूक ही एका वर्षाची चाचणी नसून, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे टिकून राहा, कारण दीर्घकाळातच समभागांचे आणि पोर्टफोलियोचे मूल्य ओळखले जाईल.

कंपनीचे नावप्रसिद्धीची तारीखखरेदी किंमत३०.०६.२०२६ चा बंद भावनफा/तोटा (रुपये)नफा /(तोटा)%
सियाराम सिल्क मिल्स१२.०१.२०२६५८५६४०५५९.३
ग्लेनमार्क फार्मा१९.०१.२०२६२००१२२०५२०४१०.२
ऑटो कार्पोरेशन ऑफ गोवा</td>२६.०१.२०२६१६७०२२८५६१५३९.९
इंडियन हॉटेल्स०९.०२.२०२६६८३७१३२८४.१
राजू इंजीनियर्स१६.०२.२०२६६४५३(११)(१७.८)
एनबीसीसी२३.०२.२०२६९५१०५१०१०.३
जीएचसीएल लिमिटेड०२.०३.२०२६४८१४३६(४५)(९.३)
प्रीमियर एनर्जीज लिमिटेड०९.०३.२०२६७२४१०५३३२९४५.४
टाइम टेक्नोप्लास्ट लिमिटेड१६.०३.२०२६१६११८०१९११.५
झेगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेड२३.०३.२०२६२०८२०८००००
कम्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (कॅम्स)३०.०३.२०२६६३६७९७१६१२५.२
ग्राइंडवेल नॉर्टन१३.०४.२०२६१५४०२१४५६०५३९.३
आयटीसी लिमिटेड२०.०४.२०२६३०७२८७(२०)(६.४)
टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनीअरिंग०४.०५.२०२६१२८९१०५४(२८५)(१८.२)
सुंदरम फास्टनर्स११.०५.२०२६८४७९३१८४९.९
फाइव्ह-स्टार बिझनेस फायनान्स१८.०५.२०२६४६६५०१३५७.५
जीएनएफसी२५.०५.२०२६५०७५४२३५
एचबीएल इंजीनीरिंग०१.०६.२०२६८२६८१८(५)(०.६)
फोसेको क्रुसिबल८.०६.२०२६१२००१४२५२२५१८.८
एएसके ऑटोमोटिव्ह१५.०६.२०२६४२९४५१२२५.१
पॉवरिका२२.०६.२०२६५९१६२४३३५.६
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस२९.०६.२०२६७४४७५००.९
एकूण१६६६०१८८७०२२१०१३.३
आयआरआर ६७.४८%


लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.