Short Call Option Marathi : शेअर बाजारात पैसे कमावण्यासाठी नेहमीच बाजार वाढला पाहिजे असे नसते. अनेकांना असे वाटते की, बाजारात तेजी आली तरच नफा मिळतो; परंतु प्रत्यक्षात बाजार घसरत असताना किंवा एका मर्यादित पातळीवर स्थिर राहिल्यावरही अनुभवी गुंतवणूकदार आणि ट्रेडर नफा कमावतात. ऑप्शन्स ट्रेडिंगमधील काही विशिष्ट रणनीती अशा परिस्थितीत प्रभावी ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’ अर्थात कॉल ऑप्शनची विक्री. शेअर बाजार जेव्हा पडतो किंवा एकाच जागी रेंगाळतो, तेव्हाही हुशारीने पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे; ज्याला आपण ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’ (Short Call Option) किंवा कॉल ऑप्शनची विक्री करणे म्हणतो. ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे ‘झिरो-सम गेम’ आहे, म्हणजेच इथे बाजारात एका खिशातून पैसे निघून ते दुसऱ्याच्या खिशात जात असतात. सोप्या भाषेत, एकाचा तोटा हाच दुसऱ्याचा नफा असतो.

आपण यापूर्वी ‘लाँग कॉल ऑप्शन्स’ (कॉल खरेदी करणे) बद्दल सविस्तर माहिती घेतली. त्यामध्ये तेजीची अपेक्षा असते आणि नफा अमर्यादित असतो. पण त्याच्या अगदी विरुद्ध बाजू म्हणजे ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’. जेव्हा बाजारात मंदी येणार असते किंवा बाजार एकाच पातळीवर शांत राहणार असतो, तेव्हा ‘ऑप्शन्स रायटर्स’ (विक्रेते) मैदानात उतरतात. लाँग कॉल करणाऱ्याला होणारा प्रत्येक रुपयाचा तोटा हा शॉर्ट कॉल करणाऱ्याचा थेट नफा असतो.

तसेच कॉल ऑप्शन्स खरेदी करणाऱ्याला (लाँग कॉल ऑप्शन) ज्यावेळी अमर्यादित नफा असतो, त्यावेळी तो कॉल ऑप्शन्स विकणाऱ्याला (शॉर्ट कॉल ऑप्शन) अमर्यादित नुकसान असते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आले असेल की, ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’ हे ‘लाँग कॉल ऑप्शन्स’च्या अगदी विरोधी असते. आपण गेल्या लेखात ‘लाँग कॉल ऑप्शन्समध्ये आपल्याला ११८.३५ रुपये तोटा होतो. तेवढाच तो कॉल ऑप्शन्स विकणाऱ्याला म्हणजेच शॉर्ट कॉल ऑप्शन्सचा फायदा असतो. आता आपण आधीच्याच तक्त्याचा वापर करून ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’ बघणार आहोत.

येथे निफ्टी ८२०० या स्ट्राईक प्राईसला ११८.३५. रुपये अधिमूल्य घेऊन कॉल ऑप्शनची (शॉर्ट कॉल ऑप्शन) विक्री केली आहे.
निफ्टी करार A B C D = A B C

समाप्ती वेळीअधिमूल्यनिफ्टीची खरेदीनिफ्टीची विक्रीनफा नुकसान
8100-118.35-81008100-118.35
8150-118.35-81508150-118.35
8200-118.35-82008200-118.35
8250-118.35-82008250-68.35
8300118.35-82008300-18.35
8350-118.35-8200835031.65
8400-118.35-8200840081.65
8450-118.35-82008450131.65
8500-118.35-82008500181.65
8550-118.35-82008550231.65
8600-118.35-82008600281.65
8650-118.35-82008650331.65
8700-118.35-82008700381.65
short call options payoffs
LS


नफा नुकसान शॉर्ट ऑप्शन

Short Call Option – D
118.35
118.35
118.35
68.35
18.35
-31.65
-81.65
-131.65
-181.35
-231.65
-281.65
-331.65
-381.65
शॉर्ट कॉल ऑप्शन्समध्ये निफ्टी निर्देशांक ८३०० पेक्षा जेवढा कमी होईल, तेवढा नफा वाढत जाईल. मात्र नफा एका मर्यादित पातळीपर्यंत वाढेल. त्यानंतर निफ्टीच्या (पातळी) निर्देशांकात कितीही घसरण झाल्यास आपला नफा मर्यादित राहील. तर निफ्टी निर्देशांकात जसजशी वाढ होत जाईल तसतसे नुकसान मात्र वाढत जाईल. शॉर्ट कॉल ऑप्शन्स विक्री करणाऱ्याच्या दृष्टिकोनातून बांधितला जातो. म्हणजेच लॉग कॉल ऑप्शनमध्ये आपण कॉल ऑप्शनची खरेदी केली होती. तर शॉर्ट कॉल ऑप्शन बघताना त्यात आपण कॉलची विक्री केली होती.


शेअर बाजारात शेअरच्या किंमतीत किंवा निर्देशांकात घसरण होणार असेल किंवा घसरण होण्याची शक्यता वाटत असेल, अशावेळी ‘शॉर्ट कॉल ऑप्शन्स’ म्हणजेच कॉल ऑप्शनची विक्री केली जाते.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.

gaurav,muthe@expressindia.com