scorecardresearch

Premium

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी, बाजारातून स्वस्त दरात सोने खरेदी करता येणार

Sovereign Gold Bond 2023-24 Online : सार्वभौम सुवर्ण बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदीसाठी पाच दिवसांचा अवधी दिला जात आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजना ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल.

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 Online Purchase
सोव्हिरियन गोल्ड बॉण्ड की, इटीएफ, सोनेखरेदी (फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : भारतीय रिझर्व्ह बँक लोकांना स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोने तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्त सोने खरेदी करता येते. RBI ने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सार्वभौम गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme)ची दुसरी मालिका जारी केली आहे.

सार्वभौम सुवर्ण बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदीसाठी पाच दिवसांचा अवधी दिला जात आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजना ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सोने खरेदी करता येते. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकदार २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.

ESIC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023: पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी होणार बंपर भरती; ही आहे शेवटची तारीख
HPCL Bharti 2023
‘या’ उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी! पदानुसार ६० हजारांहून अधिक पगार मिळणार
WCL recruitment 2023
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये ८७५ जागांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार १६ सप्टेंबर पर्यंत करू शकतात अर्ज
pcmc aim to make 50 percent auto rickshaw electric
पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य!

सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची किंमत किती?

८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या मालिकेसाठी इश्यू किंमत ५,९२३ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन ९९.९ टक्के शुद्ध सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी केल्यास ५० रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाणार आहे. यामुळे किंमत कमी होऊन ५,८७३ रुपये प्रति ग्रॅम होईल.

हेही वाचाः HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का, कर्जाचे व्याजदर महागले, किती EMI वाढणार?

किती व्याज मिळेल?

या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास लोकांना सहामाही आधारावर निश्चित किमतीवर 2.50 टक्के व्याज दिले जाईल. सार्वभौम गोल्ड बाँडचा परिपक्वता कालावधी ८ वर्षांचा आहे. पाच वर्षांनंतर ग्राहकांना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल.

सार्वभौम गोल्ड बाँड अंतर्गत सोने कुठे खरेदी करावे?

या योजनेच्या दुसऱ्या मालिकेअंतर्गत स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे स्वस्त सोने खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही त्यात डीमॅट खात्याअंतर्गत गुंतवणूक करू शकता.

हेही वाचाः दीपक गुप्ता बनले कोटक महिंद्रा बँकेचे अंतरिम एमडी, आरबीआयने नियुक्तीला दिली मान्यता

किती गुंतवणूक करता येते?

या बाँड अंतर्गत भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था गुंतवणूक करू शकतात. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करण्याची परवानगी आहे. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात २० किलो सोने खरेदी करू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sovereign gold bond scheme 2023 24 series ii golden opportunity to buy cheap gold know price discount and last date vrd

First published on: 11-09-2023 at 10:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×