-तृप्ती वैभव राणे

युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते, भू-राजनैतिक समीकरणं बदलतात, सत्तांतर घडतं तेव्हा कल्पनाही करता येणार नाही त्या प्रकारे पैसा आणि संसाधनं आपली दिशा बदलताना दिसतात. खूप उन्हाळे-पावसाळे बघितलेला तज्ज्ञसुद्धा योग्य अंदाज बांधू शकत नाही असं काहीसं घडतं. अनिश्चितता भल्याभल्यांना नमवते. तरी यातून कमीत कमी नुकसान होईल यासाठी नक्की कशावर लक्ष ठेवावं लागेल, साजेशी जोखीम आणि वाजवी परतावे मिळवून आपली आर्थिक ध्येये कशी साधता येतील याचे हे दिशादर्शन…

आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात सगळं कसं एकमेकाला जोडलेलं आहे, एकाचा दुसऱ्यावर कसा, काय आणि किती परिणाम होऊ शकतो याचा आपण अंदाजदेखील बांधू शकत नाही. शिवाय सर्वसामान्य गुंतवणूदाराला समजणारसुद्धा नाही की हे सगळं कसं घडलं, पण घडलंय तर खरं! जागतिक किंवा देशांतर्गत पातळीवरील प्रतिकूल घटनांचा या पुढे आणि कशा प्रकारे पोर्टफोलिओतील कंपन्यांना त्रास होऊ शकतो हे सांगता येत नाही. गेल्या वर्षी आपण पाहिलं की, न्यूयॉर्कमधील हिंडेनबर्ग रिसर्च, तिने केलेलं अदानी समूहावरील संशोधन, त्यानुसार केलेले आरोप आणि त्या अनुषंगाने पुढे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांतील पडझड, अदानी एंटरप्राइजचा ‘एफपीओ’ मागे घेतला जाणं, मग कंपनी आणि भारतीय वित्तीय संस्थांकडून दिली गेलेली स्पष्टीकरणे, पुढे ‘सेबी’ने घेतलेला पवित्रा… यामुळे गौतम अदानीसारख्या महाश्रीमंतांची निव्वळ मालमत्ता निम्म्याहून कमी झाली. त्याप्रमाणेच आपल्या पोर्टफोलिओचे झाले तर?

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
hybrid fund, hybrid fund types, share market, stock market, conservative hybrid fund, aggressive hybrid fund, sebi, investment in stock market, new investor in stock market, pros and cons of hybrid fund,
‘हायब्रिड’च्या निमित्ताने …
students choose the US for overseas higher education
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’!

हेही वाचा…करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष

त्यामुळे अनिश्चित काळातील घटनांमुळे आपल्या गुंतवणुकींना कुठून धोका निर्माण होऊन त्यातून किती काळ, किती नुकसान होऊ शकतं याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. तुमचं या ‘VUCA World’मध्ये स्वागत आहे! V – Volatility (अस्थिरता), U – Uncertainty (अनिश्चितता), C – Complex (क्लिष्ट), A – Ambiguous ????(संदिग्द्ध). या सर्व गोष्टींपासून जेव्हा घटना तयार होतात तेव्हा त्यांचे परिणाम काय होतील व त्यातून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे समजण्यासाठी आपल्याला आपलं ज्ञान वाढवावं लागतं आणि आपली प्रगल्भता वरच्या पातळीवर न्यावी लागते.

या लेखाचा रोख हा येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरं जाताना नक्की कशाकडे लक्ष ठेवावं लागेल आणि त्यातून कमीत कमी नुकसान, साजेशी जोखीम आणि वाजवी परतावे मिळवून आपली आर्थिक ध्येये साधता येतील याकडे आहे. जागतिकीकरणाचे जेवढे फायदे आहेत, तितकेच त्याने धोकेसुद्धा उभारून ठेवले आहेत. आज जगाच्या एका कोपऱ्यातील बातमी अगदी काही सेकंदांत दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते, मशीन तुमचे शेअर घ्यायचे आणि विकायचे निर्णय घेते, माणसांबरोबर संवाद न साधता आता आपण चॅट-बॉट्सशी बोलतो, काही क्लिक्समध्ये कोट्यवधींचे व्यवहार होतात ही त्यातलीच काही उदाहरणं. सगळं कसं एका मोठ्या जाळ्यात असल्यासारखं वाटतं. जोवर सगळं सुरळीत चालू आहे तोवर ठीक, परंतु जेव्हा एखादी युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते, किंवा भू-राजनैतिक समीकरणं बदलतात, सत्तांतर घडतं तेव्हा कल्पनाही करता येणार नाही त्याप्रकारे पैसा आणि संसाधनं आपली दिशा बदलताना दिसतात. तेव्हा भल्याभल्यांना ही परिस्थिती नमवते, अगदी एखादा खूप उन्हाळे-पावसाळे बघितलेला तज्ज्ञसुद्धा योग्य अंदाज बांधू शकत नाही असं काहीसं घडतं.

हेही वाचा…Money Mantra: डिजिटल इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? ती कशी काढावी?

आपल्या शेअर बाजाराकडे जर या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर मार्च २०२० ते मार्च २०२४ पर्यंतचा प्रवास बघू या. मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत बऱ्यापैकी वरच्या दिशेचा प्रवास होता. त्यानंतर एक ब्रेक लागला आणि बाजार खाली आला. पुन्हा पुढे जानेवारी २०२२ मध्ये परत बाजार वर, मग मार्च २०२२ मध्ये खाली, परत अगदी काहीच दिवसांत एप्रिल २०२२ मध्ये वर, जून २०२२ मध्ये खाली, परत ऑगस्ट व सप्टेंबर २०२२ मध्ये वर आणि डिसेंबरमध्ये तर नवीन उच्चांक गाठला गेला. नंतर गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये पुन्हा मार्च २०२४ मध्ये बाजारात अस्थिर वातावरण असूनदेखील निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम आहे. इराण-इस्रायल युद्ध आणि देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे मात्र त्यात मोठे चढ-उतार होत आहेत.

वाढती महागाई, कच्च्या मालाची टंचाई, पुरवठा साखळीत व्यत्यय, तेलाच्या किमती आणि बिघडलेले भू-राजकारण, या सगळ्यांनी मिळून अनेक अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडून काढलंय. काही काळाकरता महागाईने आराम करायचा जरी म्हटला, तरीसुद्धा यापुढे आपण निवांत राहू शकू असं अजिबात वाटत नाही. इराण-इस्रायलमधील वाढता तणाव आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई पुन्हा डोकं वर काढणार अशी शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्यवर्ती बँकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहणार – व्याज दर वाढवायचे की कर्ज स्वस्त करून उत्पादक आणि जनतेला खर्चासाठी प्रोत्साहित करायचं. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे कासवाच्या गतीने पुढे सरकणारी अर्थव्यवस्था म्हणजे गुंतवणूकदाराच्या डोक्याला तापच… कुठे पैसे घालू जेणेकरून मिळकत वाढेल, जोखीम कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ व्यवस्थित राहील? हे सर्व खरंच शक्य होईल का? व्याज दर वर राहिले तरी पण कंपन्यांची मिळकत आणि निव्वळ नफा वाढणार का? जागतिक मंदीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नक्की किती काळ परिणाम राहणार? हे सगळे प्रश्न आपल्या सर्वांसमोर ठाम उभे आहेत.

हेही वाचा…बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

येत्या काही महिन्यांमध्ये कोणतं नक्की चित्र समोर येणार हे माहीत नाही, परंतु एक गुंतवणूकदार म्हणून मला माझा पोर्टफोलिओ माझ्या गरजेसाठी सांभाळणं ही कळीची बाब आहे. तेव्हा या ‘VUCA’ परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी ‘VUCA’चीच मदत घेते. आणि हा दुसरा ‘VUCA’ म्हणजे Vision (दूरदृष्टी ठेवणे), Unique (परिस्थितीनुसार आणि मन:स्थितीनुसार उपाययोजना), Cohesive (संलग्न म्हणजेच कुठल्याही एकाच ठिकाणी लक्ष न ठेवता सर्वसमावेशक उपाययोजना) आणि Agility (चपळता बाळगणे).

आणि हे सर्व करण्यासाठी बरीच तयारी करावी लागते, बरं का.

हेही वाचा…मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?

१. गरजेची माहिती मिळवून त्या अनुषंगाने आपलं आर्थिक नियोजन आखून घ्या.

२. हा काळ अनाठायी जोखीम घेण्याचा नाहीये आणि म्हणून पोर्टफोलिओमधील जोखीम कशी कमी करता येईल यावर सतत लक्ष असू द्या.
३. बाजाराचा कल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदी आणि विक्री ठरवा.
४. मागील परतावे बघताना, त्या गुंतवणुकीची जोखीमसुद्धा समजून घ्या. स्मॉल कॅपमध्ये फटाफट पैसे वाढतात, पण ते केव्हा हे समजून घ्या.

५. कोणत्याही गुंतवणुकीचं परिमाण ठरवताना काळजी घ्या. १० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण ठेवायच्या आधी आपले अंदाज नीट आहेत की नाही हे तपासून घ्या.
६. ‘फॅन्सी’ गुंतवणूक पर्यायांपासून लांब राहा.

हेही वाचा…क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा

७. येणाऱ्या काळातील महागाई कदाचित न भूतो… प्रकारची असावी. तेव्हा पैसा जपून वापरा. खर्च वजा जाता वाचले तर चांगल्या प्रकारे त्यांना गुंतवा.
८. सेवानिवृत्त गुंतवणूकदारांनी स्वतःचा आर्थिक आराखडा मांडताना आरोग्यविषयक खर्चासाठी योग्य तरतूद करावी.

९. पोर्टफोलिओमध्ये समभाग, रोखे, सोने आणि स्थावर मालमत्ता यांचे परिमाण योग्य पद्धतीने जमवून घ्यावं, जेणेकरून जोखीम कमी होऊन, पोर्टफोलिओ फार खाली जाणार नाही.
१०. तरुण गुंतवणूकदारांनी पुढील ४-५ वर्षांमध्ये जमेल तितकी गुंतवणूक चांगल्या म्युच्युअल फंड किंवा समभागांमध्ये करावी. कितीही आव्हानं असली तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या काळात चांगले परतावे देऊ शकते.

११. समजून-उमजून घेतलेले निर्णयसुद्धा कधी तरी चुकू शकतात. त्यावर जास्त वेळ वाया न घालवता, सुधारात्मक क्रिया वेळेत करावी. आपल्या पैशाची ‘टाइम व्हॅल्यू’ समजली की आपण आपोआपच झालेल्या नुकसानातून लवकर बाहेर पडतो.
१२. स्त्री गुंतवणूकदारांनीसुद्धा आपल्या गुंतवणुकीबाबत संपूर्णपणे सजग राहायची वेळ आलेली आहे. आजकाल लग्न न करता राहणाऱ्या किंवा घटस्फोट झालेल्या तरुणींची संख्या वाढत चाललेली आहे. तेव्हा कायद्याचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं झालं आहे.

१३. पोर्टफोलिओला नियमित वेळ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह व्यवस्थापनाचे फायदे हे वाढीव परताव्यातून किंवा कमी झालेल्या नुकसानातून लक्षात येतील.
१४. सल्लागाराकडे केव्हा जावं? आपल्याकडे ज्ञान कमी पडतंय, गुंतवणुकीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, कधी काय करायचं हे उमगत नाहीये, मोठी रक्कम मॅनेज करायची आहे, अनेक प्रकारच्या गुंतवणुकींचा गुंता झालेला तेव्हा सल्लागाराची मदत अत्यावश्यकच.

हेही वाचा…Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

१५. सल्लागार आणि वितरक यांना कधी वापरायचं हे ठरवा – सल्लागार तुमच्याकडून फी घेतो, तर वितरक तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमधून पैसे मिळवत असतात.
१६.कर नियोजन आणि गुंतवणूक व्यवस्थापन यांचा जरी एकमेकांशी संबंध असला तरीसुद्धा गुंतवणूक व्यवस्थापनाचा पसारा कर नियोजनापेक्षा जास्त आहे. भरपूर कर भरल्यानंतर सरकारकडून जरी प्रशस्तिपत्रक मिळालं तरीसुद्धा शेवटी पुरेसे पैसे प्रत्येक वेळी गाठीला असले तरच त्यांचा उपयोग. छोट्या प्रमाणातील गुंतवणुकीतून दोन आकडी परतावा जरी मिळाला तरीसुद्धा ठरवलेल्या ध्येयासाठी पैसे पुरतील का याची खातरजमा नक्की करावी.

१७. पोर्टफोलिओमध्ये विविधीकरण महत्त्वाचं आहे, परंतु ते किती, कधी आणि कोणत्या पर्यायातून करावं हे नीट समजून घ्यावं.
१८. वेळोवेळी नफा बुक करून कर्ज कमी केलं की कर्ज वेळेआधी फेडलं जातं आणि व्याजाचा खर्च कमी होतो.

हेही वाचा…पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

१९.कधी काळी जर एखाद्या गुंतवणुकीत नुकसान झालंच तर त्यामुळे कुठे कर वाचेल का हे समजून घ्या.
२०. गुंतवणूक आणि तिचं व्यवस्थापन करताना सोपे पर्याय निवडा. जास्त क्लिष्ट काम करावं लागलं की कंटाळा येतो.

सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com