Personal Loan : तुम्ही कितीही पैसे कमावले तरी एक वेळ अशी येते, जेव्हा आपल्याला कोणाकडून तरी पैसे उधारीवर घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय असू शकतो. याबाबत लोकांच्या मनात एकच भीती आहे की, त्यांना वैयक्तिक कर्जावर भरपूर व्याज द्यावे लागते. यात आम्ही तुम्हाला देशातील अशा ५ बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळू शकते. आमच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ते IDFC फर्स्ट बँकेचा समावेश आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना २० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. बँकेच्या नियमांनुसार तुम्ही पात्र असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. ही बँक वैयक्तिक कर्जावर १० टक्के वार्षिक व्याज आकारते. बँकेची अट अशी आहे की, ग्राहकाने घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची कमाल मुदत ८४ महिने आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना २० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्जदेखील देते. बँक यावर १०.२५% दराने व्याज आकारते. तर वैयक्तिक कर्जाची कमाल मुदत ८४ महिने आहे.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँकेचे ग्राहक ३०,००० ते ५० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. कंपनी आपल्या ग्राहकांना १०.२५ टक्के ते २७ टक्के व्याजदराने ही कर्जे देते आणि या कर्जाचा कालावधी १ वर्ष ते ६ वर्षांपर्यंत असतो.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक १० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. ग्राहकाला दिलेल्या या कर्जावर बँक १०.४ ते १६.९५ टक्के व्याज आकारते. वेळेच्या मर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास कर्जाची कमाल मुदत ६० महिन्यांपर्यंत आहे.

IDFC फर्स्ट बँक

IDFC फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना कमाल 1 कोटी रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. या कर्जावर बँक 10.49 टक्के व्याजदर आकारते. बँकेने दिलेल्या या वैयक्तिक कर्जाची मुदत ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत असते.