आज जवळजवळ प्रत्येक जण नियमितपणे अंतराने वैद्यकीय चाचणी करून घेत असतो. निरोगी जीवनशैलीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंची (वाहन, वातानुकूलित यंत्र, शीतकपाट इ.) वर्षातून किमान एकदा तंत्रज्ञाकडून निगराणी करून घेतात, जेणेकरून ती वस्तू वापरायोग्य स्थितीत राहील. मात्र आपल्यापैकी अनेक जण हे विसरतात की, हेच अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आपल्या आर्थिक नियोजनालाही लागू होते. तुमच्या आर्थिक नियोजनाचे वेळेवर पुनरावलोकन करणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी खूपच आवश्यक आहे.

आर्थिक नियोजन करताना, एखादी व्यक्ती विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे निश्चित करते जी त्याला/तिला दिलेल्या कालावधीत आणि उपलब्ध आर्थिक स्रोतांमधून साध्य करावयाची असतात. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन घर विकत घेण्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बचत करू इच्छिता; परंतु विद्यमान आर्थिक स्थिती जसे की, चलनवाढीचा दर आणि बाजाराची वाटचाल यामुळे सर्व गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करता येतातच असे नाही. काही वेळा असे घडते की, आर्थिक नियोजन तयार केल्यापासून तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टाकडे वाटचाल होत नसल्याचे निदर्शनास येते. तुमच्या गुंतवणुकीने फारच कमी परतावा दिला असल्याचे आढळून येत आहे. याच गतीने गुंतवणूक वाढली तर तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठणे अशक्य होईल अशी भीती वाटते. याचा अर्थ तुमच्या गुंतवणुकीत काही बदल करावे किंवा गुंतवणुकीची साधने बदलणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास, आपले उद्दिष्ट पुढे ढकलणे शहाणपणाचे ठरू शकते.

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल

हेही वाचा – २००० रुपयांची नोट आता घरबसल्या बदलता येणार, पण कशी?

उदाहरणार्थ, जर ५० व्या वर्षी निवृत्त होण्याचे तुमचे नियोजन असेल तर त्याऐवजी ५५ व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करावा लागेल; परंतु तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशात शिक्षणासाठी जाणार असेल, तर ते पुढे ढकलणे शक्य होणार नाही; परंतु समजा, तुम्हाला ७५ लाखांचे घर घ्यायचे असेल तर ६० लाखांचे घर घ्या किंवा उर्वरित रकमेचे कर्ज घेण्याचा पर्याय खुला असू शकतो. तुमच्या आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन तुम्हाला सध्याच्या परिस्थितीनुसार तुमची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करता येईल अथवा नाही. तसेच निर्धारित वेळेत साध्य होणार नसेल तर किती अतिरिक्त कालावधी लागेल याचा अंदाज देऊ शकेल.

श्रुती कुलकर्णी ही माझी सहकारी होती. आम्ही सर्वच वित्तीय सेवा क्षेत्रात असल्याने आपापल्या परीने वित्तीय शिस्तीचे पालन करतो. आर्थिक नियोजन केल्याने एखाद्याला त्याची वित्तीय ध्येये साध्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बचत करण्यास भाग पाडते, अशी श्रुतीला खात्री होती. यामुळे गेल्या ५-६ वर्षांपासून, ती स्वत:ची आणि तिचे पती आणि एका मुलीसह तीन जणांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक नियोजन करून नियोजनानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचे काम करते आहे. मात्र जग खूप वेगाने बदलत असल्याने त्यांच्या जीवनशैलीच्या आकांक्षा विस्तृत होत गेल्याने, तिला तिच्या नियोजनाचे नव्याने पुनरावलोकन करण्याची गरज भासू लागली. मात्र तिच्या पतीला वाटते की, त्यांच्या नियोजनाचे पुन्हा पुनरावलोकन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. श्रुती आणि तिचा नवरा अमोल कालच मला भेटून गेले. व्याजदर वाढण्याआधी त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी जे नियोजन केले होते त्याचे गणित सध्या बिघडले आहे. कारण गृह कर्जाच्या हप्त्यात व्याज दरवाढीमुळे सुमारे १० हजारांची वाढ झाली आहे. त्यांच्या गरजा वाढल्याने, बचतीसाठी उपलब्ध रोकड कमी झाली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल दिसून आले आहेत. आधीच्या नियोजनात एकच वाहन असलेल्या श्रुतीकडे आता दोन वाहने आहेत. करोनाकाळात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याने, त्यांना एका अतिरिक्त खोलीची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी नवीन घर आणि त्यासाठी ५५ लाखांचे गृह कर्ज घेतले. नवीन घराचा ताबा मिळायला आणि व्याज दर वाढायला एकच गाठ पडली. आर्थिक नियोजन विस्कटल्याने श्रुतीला माझा सल्ला घ्यावासा वाटू लागला.

हेही वाचा – एकेकाळी हॉटेल रिसेप्शनिस्ट होते अन् बुटांच्या कारखान्यातही केले काम, आज १२७०० कोटींचा हॉटेल व्यवसाय, कोण आहेत मोहन सिंग?

आर्थिक नियोजनाचे नियमित अंतराने पुनरावलोकन करणे आवश्यक आहे – किमान वार्षिक पुनरावलोकन ही गरज आहे. या वर्षी श्रुती आणि अमोलच्या पगारात घसघशीत वाढ झाली. गेल्या ५-६ वर्षांत श्रुती आणि अमोलच्या पगारात वाढ झाली असली तरी जीवनशैलीतील बदल चलनवाढ आणि अतिरिक्त खर्चामुळे गुंतवणुकीत वाढ झाली नाही. श्रुती आणि अमोलने हे लक्षात घेतले पाहिजे की, जीवनशैली बदलण्यास काहीही हरकत नसली तरी जमाखर्चाच्या बदललेल्या गुणोत्तरांसह, त्यांना त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत अधिक वाढ करणे आवश्यक होते. साधारण वार्षिक दोन ते अडीच लाख रुपये श्रुती आणि अमोल पर्यटनावर खर्च करतात. दुसरे वाहन घेतल्यावर वाढीव खर्चाचा मेळ घालण्यासाठी पुढील तीन-चार वर्षे पर्यटनाला जाणे टाळायला हवे असे माझे मत आहे. अनियोजित गृहकर्जामुळे त्यांचे आर्थिक नियोजन अनिश्चित झाले आहे. नववीत असलेल्या मुलीच्या उच्च शिक्षणाला पुढील तीन वर्षांत सुरुवात होईल. आधीच दीर्घ कालावधीसाठी रोकड आटल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. कर्ज वाढल्याने त्यांच्या आयुर्विमा संरक्षणाचे पुनरावलोकनदेखील अनिवार्य आहे. शिवाय, वय आणि कर्ज वाढल्याने तसेच बचत कमी झाल्याने आरोग्य विमा संरक्षणात वाढ करणे गरजेचे वाटते. त्यांच्या आर्थिक योजनेचे पुनरावलोकन करणे आणि हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजारांसाठी पैसे देणारे पुरेसे विमा कवच खरेदी करणे उचित ठरू शकते. कारण यामुळे एखाद्या गंभीर आजारात त्यांची बचत संपू शकते. जरी पुनर्संतुलन पूर्णपणे ऐच्छिक आहे, तरीही याची शिफारस केली जाते. पुनर्संतुलन तुम्हाला तुमच्या नियोजनातील धोके समजून घेण्यास मदत करते. मात्र तुमच्या आर्थिक नियोजनाची परिणामकारकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले योग्यरीत्या व्हावे यासाठी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

bhalchandra@cybrilla.com

(लेखक सायब्रिला टेक्नोलॉजी लिमिटेडमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आणि सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर (सीएफपी) आहेत.)