नमस्कार प्रिय वाचक! तुमची गुंतवणूक अधिक कार्यक्षम कशी करावी, आणि त्या अनुषंगाने आपणांस नेहमी पडणारे प्रश्न आणि अडचणी सोडविण्याचा आणि गुंतवणूकविषयक महत्त्वाच्या संकल्पना समजावून सांगण्याचा या पाक्षिक स्तंभाचा प्रयत्न असणार आहे. या सदराच्या नियमित वाचनाने आपल्या गुंतवणुकीसंबंधी ज्ञानात वाढ होईल, अशी आशा बाळगतो. ‘अल्फा’ (α) ही गुंतवणुक परिभाषेत वापरली जाणारी एक संज्ञा आहे. जिचा वापर गुंतवणुकीची कार्यक्षमता मोजण्यासाठी केला जातो. एखाद्या पोर्टफोलिओने त्याच्या मानदंडासापेक्ष किती अधिक किंवा कमी परतावा मिळविला हे सूचित करण्यासाठी ‘अल्फा’ ही संज्ञा वापरली जाते. ‘अल्फा’चे संपत्तीनिर्मितीतील महत्त्व:

हेही वाचा >>> फंडभान : म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी?

Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?

• गुंतवणुकीची चक्रवाढ दराने वाढ :

समजा, तुम्ही १० लाख रुपये २० वर्षांसाठी गुंतविले आणि तुम्हाला त्यावर ८ टक्के परतावा मिळाला. तर २० वर्षांनंतर तुम्हाला ४६.६ लाख रुपये मिळतील. पण जर तुम्ही १० टक्के परतावा मिळविला तर त्याचे ६७.३ लाख रुपये होतील आणि परतावा १२ टक्के राहिल्यास त्याचे ९६.५ लाख रुपये होतील! अर्थात पोर्टफोलिओचा ‘अल्फा’ जितका अधिक तितका संपत्तीनिर्मितीचा दरही अधिक!

• महागाईवर मात:

असे समजूया की, महागाईचा दर ५-६ टक्के आणि नफ्यावर द्यावा लागणारा कर १ टक्का असा असल्यास, पोर्टफोलिओवरील परतावा त्यापेक्षा अधिक असणे महत्त्वाचा ठरतो. कारण असे झाले तर ते तुमच्या संपत्तीनिर्मितीला वाढीला मदतकारक ठरेल.

• लक्ष्य लवकर गाठणे:

विशेषत: जर तुम्ही लहान रकमेपासून सुरू करत असाल, तर अधिक ‘अल्फा’ तुमचे लक्ष्य वेगाने गाठायला मदत करतो.

वॉरेन बफे म्हणाले होते, “गुंतवणूक करणे ही साधी सरळ गोष्ट आहे, पण सोपी नाही”. पण रणनीती योग्य असेल तर अधिक गुंतवणूक न करता ‘अल्फा’ निर्मिती सहज साध्य आहे.

हेही वाचा >>> ससा कासवाची गोष्ट, ‘सीआरआर’ कपात लाभदायी?

‘अल्फा’ पोर्टफोलिओचे महत्त्वाचे घटक:

• समभाग गुंतवणूक:

कंपन्यांना टिकून राहण्यासाठी त्यांच्या व्यवसायावर नफा आणि समभागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक चांगला परतावा निर्माण करावा लागतो. त्यामुळे चांगल्या कंपन्यांच्या समभागांची योग्य निवड आणि बाजारात वेळ साधून योग्य भावात त्यांची खरेदी करून होणाऱ्या गुंतवणुकीतून तुम्ही ‘अल्फा’ निर्माण करू शकता. पण यामध्ये मोठी अस्थिरता अनुभवण्यास मिळते. अल्फा निर्मिती करायची असेल तर या अस्थिरतेची सवय करून घ्यायला हवी.

• गुंतवणुकीत वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन):

समभाग गुंतवणूक ही अस्थिरतेमुळे जोखमीची असते. म्हणूनच गुंतवणुकीत वैविध्य आवश्यक आहे. विविध उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही एकाच उद्योगात गुंतवणूक असल्याची जोखीम कमी करू शकता. यामुळे पोर्टफोलिओला स्थैर्य लाभते. आणि वाढीच्या संधी मिळवता येतात.

• पोर्टफोलिओचे पुन:संतुलन (रिबॅलन्सिंग):

अल्फा तयार करण्यासाठी तुम्हाला विवेकी जोखीम घ्यावी लागते, अविचाराने घेतलेली जोखीम पोर्टफोलिओचा परतावा कमी करु शकते. उदाहरणार्थ, चांगले मिड-कॅप जोखीमयोग्य असू शकतात. परंतु ‘पेनी स्टॉक्स’ (कमी किमतीचे शेअर्स) टाळणे हिताचेच असते.

• संशोधन:

संशोधन हा कुठल्याही गुंतवणुकीचा आत्मा आहे. कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास जसे की, बिझनेस मॉडेल, व्यवस्थापनाची गुणवत्ता, नफा, ताळेबंदातील कर्जाचे प्रमाण, स्पर्धा, बाजारातील नेतृत्व, बदलते कायदे आणि नियम आणि बाजारातील कल हे घटक त्या कंपनीचा नफा वाढवू किंवा कमी करू शकतात.

• मालमत्ता विभाजन (असेट अलोकेशन):

समभाग, रोखे (कॉर्पोरेट बाँड्स) मुदत ठेवी यांचे गुंतवणुकीत योग्य प्रमाण अतीव महत्त्वाचे आहे. सोने किंवा चांदीसारखे मौल्यवान जिन्नस महागाई व जागतिक अस्थिरतेमुळे पोर्टफोलिओचा मूल्य ऱ्हास वाचवू शकतात.

• पोर्टफोलिओचे पुनरावलोकन :

पोर्टफोलिओची कामगिरी वेळोवेळी तपासली पाहिजे. आर्थिक परिस्थिती किंवा उद्दिष्टे बदलू शकतात, काही मालमत्ता वर्ग अधिक जोखमीचे होऊ शकतात. उदाहरणर्थ महागाई वाढल्यास रोख्यांच्या किमती घसरतात. काही कंपन्यांचा नफा अपेक्षेपेक्षानुसार होत नाही. बाजारातील बदलत्या स्थितीचा समभागांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.

• व्यावसायिक मार्गदर्शन:

भावनेच्या भरात निर्णय घेऊन (उदाहरणार्थ, घसरणीच्या काळात पोर्टफोलिओ मूल्यात होणारी घसरण पाहून घाबरून विक्री करणे किंवा तेजी असताना अतिआत्मविश्वासाने खरेदी करणे) तुमच्या परताव्यात घट आणू शकतात. दीर्घकालीन विचार आणि चांगल्या घटकांत गुंतवणूक ठेवण्याने बाजाराच्या चढ-उतारातही पोर्टफोलिओची कामगिरी चांगली राहू शकते. जर तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल किंवा ताळेबंद विश्लेषणाचे कौशल्य नसेल तर आर्थिक सल्लागारांकडून मार्गदर्शन घेणे हिताचे ठरते.

• ज्ञान:

मोतीलाल ओसवाल यांचे एक प्रसिद्ध तत्त्व आहे – ‘ज्ञान प्रथम, नॉलेज फर्स्ट.’ बाजार आणि बाजारातील बदलते कल यांचा अभ्यास करा. तुमचे ज्ञान अद्ययावत करा. ज्ञानाला दुसरा पर्याय नाही.

• कळप मानसिकता टाळा:

बाजारातील वावड्या किंवा टिप्सवर अवलंबून गुंतवणूक करणे टाळा. सखोल संशोधनाशिवाय टिप्सवर विसंबून गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे गुंतवणुकीची जोखीम वाढू शकतो, अनावश्यक क्षेत्रांमध्ये (अतिवैविध्यामुळे) गुंतवणूक होऊन परतावा कमी होऊ शकतो, आणि कधी कधी तुम्ही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडू शकता.

तुम्ही हा लेख लक्षपूर्वक वाचत असाल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची द्रष्टेपणाने काळजी घेत असताना आणि संतुलित पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना, गुंतवणुकीबाबतच्या दोन सुभाषितांची आठवण करून देतो.

पीटर लिंच म्हणाले होते, “तुमच्याकडे काय आहे आणि ते का आहे हे नीट लक्षात ठेवा.”

आणि चार्ली मुंगेर म्हणाले होते, “मोठा फायदा हा विक्री किंवा खरेदीत नाही, योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहण्यात आहे.”

(लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असून, लेखांत व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

Story img Loader