scorecardresearch

Premium

Money Mantra: प्राईस बॅंड व लॉट साईज म्हणजे काय?

Money Mantra: गुंतवणूकदार या दोन्ही मधील कोणत्याही किंमतीस शेअर्स साठी अर्ज (बीडिंग) करू शकतो मात्र शेअर्स आपण बीडिंग केलेल्या किंमतीलाच मिळतील असे नाही मिळणाऱ्या शेअर्सची किंमत बुक बिल्डींग पद्धतीने ठरविली जाते व अशा पद्धतीने ठरविलेल्या किंमतीस कट ऑफ प्राईस असे म्हणतात.

price band & lot size
प्राईस बँड आणि लॉट साईड (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील लेखात आपण पब्लिक इश्यूबाबतची प्रारंभिक माहिती घेतली. आज प्राईस बॅंड व लॉट साईज म्हणजे काय हे समजवून घेऊ. आता जेव्हा एखादी कंपनी आयपीओ अथवा एफपीपो मार्फत भांडवल गोळा करणार असते त्यावेळी गुंतवणूकदारांस एका ठराविक भाव पट्टयात शेअर्स देऊ करतात यास प्राईस बॅंड असे म्हणतात व या पद्धतीत विक्रीस काढलेल्या शेअर्सची किंमत न्यूनतम व अधिकतम अशी दिली जाते. यातील न्यूनतम किमतीला फ्लोअर प्राईस असे म्हणतात व अधिकतम किंमतीला कॅप प्राईस असे म्हणतात. या दोन किंमतीतील फरक २०% जास्त असू शकत नाही.

कसे ते आपल्याला सध्या बाजारात चालू असलेल्या आयपीओत दिसून येईल. उदा:साम्ही हॉटेल प्राईस बॅंड रु.११९ ते १२६ असा होता तर झागल प्रीपेड चा प्राईस बॅंड रु.१५६ ते १६४ असा आहे व ईएमएस लिमिटेडचा प्राईस बॅंड तरु,२०० ते २११ असाहे. याचा अर्थ असा कि न्यूनतम व अधिकतम किमतीतील फरक २०% कमी असू शकतो मात्र २०% पेक्षा जास्त असता कामा नये. गुंतवणूकदार या दोन्ही मधील कोणत्याही किंमतीस शेअर्स साठी अर्ज (बीडिंग) करू शकतो मात्र शेअर्स आपण बीडिंग केलेल्या किंमतीलाच मिळतील असे नाही मिळणाऱ्या शेअर्सची किंमत बुक बिल्डींग पद्धतीने ठरविली जाते व अशा पद्धतीने ठरविलेल्या किंमतीस कट ऑफ प्राईस असे म्हणतात.

investment & new tax regime
Money Mantra: गुंतवणूक आणि नवीन करप्रणाली
home loan interest rate income tax
Money Mantra: होमलोनवरील व्याजाने इन्कम टॅक्स कसा वाचवाल?
Break up
किंटसुगी : प्रेमभंगातून सावरण्याठी सुवर्ण नियम!
Type_2_diabetes
रात्री जागणाऱ्यांना होऊ शकतो ‘टाईप २’ मधुमेह; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते …

समजा एखाद्या आयपीओचा प्राईस बॅंड रु.१०० ते १२० असा आहे व इश्यूला ५ पट प्रतिसाद मिळाला व बुक बिल्डींग पद्धतीने रु.११२ असी कट ऑफ प्राईस आली तर रु.११२ ते १२० च्या दरम्यान बीडिंग केले असेल व जर त्यांना शेअर्स मिळाले असतील तर ते रु.११२ या भावाने मिळतील थोडक्यात जरी बीडिंग रु.११२ पेक्षा जास्त असेल तरी अशा वेळी जास्तीची रक्कम परत दिली जाते.मात्र रु.१०० ते १११ या भावाने बीडिंग करणाऱ्या गुंतवणुकदारास शेअर्स दिले जात नाहीत हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. परंतु महत्वाची बाब म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इनव्हेसटर) अशा पद्धतीने बीडिंग करू शकत नाही. त्याला कॅप प्राईसनेच अर्ज शेअर्स मागणी अर्ज करावा लागतो व त्यानुसारच रक्कम भरावी लागते असे असले तरी त्याला मिळणारे शेअर्स कट ऑफ प्राईसनेच दिले जातात त्याचे नुकसान होत नाही, कारण आपल्या गोठविलेल्या बँक खात्यातून कट ऑफ प्राइस नुसारच रक्कम कंपनीस दिली जाते.

आणखी वाचा: Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी?

किरकोळ गुंतवणूकदारांस रु.२ लाखापर्यंतच एका आयपीओ/एफपीओ साठी गुंतवणूक करता येते. एकूण इश्यूच्या ३५% भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतो. उर्वरित ५०% संस्थात्मक गुंतवणूकदार (ईऩ्स्ट्युशनल इनव्हेस्टर) व १५% एचएनआय (हाय नेट वर्थ ईंडीव्ह्यूजअल) यांच्या राखीव असतो व या दोघांनाच प्राईस बॅंड मधील कोणत्याही किंमतीस बीडिंग करता येते. दुसरे म्हणजे आयपीओ/एफपीओ साठी अर्ज करताना लॉट साईजमध्येच अर्ज करावा लागतो व हा साईज लॉट प्राईस बॅंडवर अवलंबून असतो एक लॉट साधारणपणे रु.१५०००च्याजवळ पास असतो. नुकताच येऊन गेलेल्या वर उल्लेखिलेल्या ३आयपीचा लॉट साईज अनुक्रमे ११९, ९० व ७० असा आहे. लॉट साईज ठरविताना १५०००/अधिकतम किंमत या सूत्रानुसार काढली जाते. त्यानुसार साम्ही हॉटेल आयपीओच्या प्राईस बॅंड नुसार अधिकतम किंमत रु.१२६ अशी आहे.१५०००/१२६=११९.०४७ नजीकचा आकडा ११९ आहे त्यामुळे या आयपीओचा लॉट साईज ११९ आला आहे किरकोळ गुंतवणूकदारास किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागतो या उदाहरणात एका लॉटची किंमत ११९*१२६=रु,१४९९४ होईल.(लॉटची किंमत लॉटसाईज * अधिकतम किंमत)

किरकोळ गुंतवणूकदारांनी अर्ज करताना किमान एक लॉट किंवा त्या पटीत परंतु रु.२ लाखाच्या आत असणाऱ्या लॉटसाठी अर्ज करावयाचा असतो. या उदाहरणात २०००००/ १४९९४= १३.३३ म्हणजे जास्तीतजास्त १३ लॉट साठी अर्ज करता येईल. थोडक्यात किरकोळ गुंतवणूकदार १३*११९=१५४७ इतक्या शेअर्स साठी अर्ज करू शकेल. म्हणजेच त्याला किमान एक लॉट व कमाल १३ लॉटसाठी अर्ज करता येईल. पुढील लेखात आपण असबा म्हणजे काय व पब्लिक इश्यू साठी अर्ज करताना असबा कसा वापरावा तसेच कट ऑफ प्राईस म्हणजे काय व ती कशी ठरवली जाते हे पाहू.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is price band lot size mmdc psp

First published on: 14-09-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×