scorecardresearch

Premium

Money Mantra : HDFC, ICICI, SBI, Canara, BoB आणि पोस्ट ऑफिस यातील कोणती बँक FD वर देतेय सर्वाधिक व्याज? जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कॅनरा बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा (BoB), Axis Bank, HDFC बँक आणि पोस्ट ऑफिस तुम्हाला किती व्याज देतात आणि यात कोणती बँक बेस्ट आहे हे समजून घेणार आहोत.

Fixed Deposit interest rates
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सामान्य लोकांसाठी थेट बचतीचा विचार केला, तर मुदत ठेव योजनांचे म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट योजनांचे नाव प्रथम येते. २०२३ मध्ये व्याजदर वाढल्याने मुदत ठेव (FD) योजना बचतीचे एक आकर्षक स्त्रोत बनल्या आहेत. खरं तर देशातील बड्या बँकांच्‍या फिक्स डिपॉझिट स्‍कीमबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला ५ वर्षांसाठी FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कॅनरा बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा (BoB), Axis Bank, HDFC बँक आणि पोस्ट ऑफिस तुम्हाला किती व्याज देतात आणि यात कोणती बँक बेस्ट आहे हे समजून घेणार आहोत. लेखात नमूद केलेला व्‍याजदर २ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्‍या एफडीसाठी आहे.

५ वर्षांसाठी एसबीआय मुदत ठेवीवरील व्याजदर (SBI 5 year Fixed Deposit Interest Rate)

SBI सर्वसामान्य ग्राहकांसाठी ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर (FD) ६.५ टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.५ टक्के आहे. हे FD दर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाला आहे.

Want to see Googles Pune office It has game room, massage chair and video viral Watch
ऑफिस असावं तर असं! गुगलचे पुण्यातील ऑफिस बघून तुम्ही पडाल चाट! खाण्यापासून ते गेमिंगपर्यंत सर्व सुविधा, पाहा VIDEO
Extension of deadline for Paytm Bank
पेटीएम बँकेच्या व्यवहारांना मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा नेमका आदेश काय? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
arrogant swiggy delivery boy viral post
“मी ऑर्डर पोहोचवणार नाही…; काय हवं ते करा” म्हणतो Swiggy कर्मचारी; पाहा ही व्हायरल पोस्ट
amazfit active smartwatch price and features
Amazfit Active स्मार्टवॉच भारतात लाँच! विकत घेण्याआधी किंमत अन् फीचर जाणून घ्या…

५ वर्षांच्या कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर (Canara Bank 5 year Fixed Deposit Interest Rate)

कॅनरा बँक ५ वर्षांसाठी FD वर सर्वसामान्य ग्राहकांना ६.७ टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.२ टक्के दराने व्याज मिळेल. हा दर ८ ऑगस्ट २०२३ पासून लागू झाला आहे.

५ वर्षांच्या ICICI बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर (ICICI Bank 5 year Fixed Deposit Interest Rate)

ICICI बँक सामान्य लोकांना ५ वर्षांच्या ठेवींवर ७ टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळेल. हा व्याजदर २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाला आहे.

हेही वाचाः एतिहाद एअरवेजकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती, कंपनीचा भारतीय बाजारपेठेत पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

५ वर्षांच्या बँक ऑफ बडोदा (BoB)च्या मुदत ठेवीवरील व्याजदर (Bank of Baroda (BoB) 5 year Fixed Deposit Interest Rate)

बँक ऑफ बडोदाही सर्वसामान्यांना ६.५ टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.१५ टक्के आहे. हा व्याजदर १२ मे २०२३ पासून लागू झाला आहे.

हेही वाचाः बायजू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; कर्जदारांना ९९४७ कोटी देण्यास तयार, नेमकी योजना काय?

५ वर्षांच्या अॅक्सिस बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर (Axis Bank 5 year Fixed Deposit Interest Rate)

Axis Bank सर्वसामान्यांना ५ वर्षांसाठी ७ टक्के व्याज आणि FD वर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर ८ ऑगस्ट २०२३ पासून लागू झाला आहे.

५ वर्षांच्या HDFC बँकेच्या मुदत ठेवीवर व्याजदर (HDFC Bank 5 year Fixed Deposit Interest Rate)

एचडीएफसी बँक एफडीवर ५ वर्षांसाठी ७ टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.५ टक्के आहे. हा व्याजदर १४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाला आहे.

५ वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीवरील व्याजदर (Post Office 5 year Fixed Deposit Interest Rate)

पोस्ट ऑफिसमध्येही ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ७.५ टक्के व्याजदर सामान्य जनतेला तसेच ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. हा व्याजदर १ जुलै २०२३ ते ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Which bank among hdfc icici sbi canara bob and post office offers the highest interest on fd find out vrd

First published on: 12-09-2023 at 17:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×