ऑटोमोबाइल काॅर्पोरेशन ऑफ गोवा लि. (बीएसई कोड ५०५०३६)

संकेतस्थळ : http://www.acglgoa.com
प्रवर्तक: टाटा मोटर्स लिमिटेड
बाजारभाव: रु. १६७०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऑटो ॲन्सिलरी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६.०९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४९.७७
परदेशी गुंतवणूकदार ०.०१

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ००
इतर/ जनता ५०.२२

पुस्तकी मूल्य: रु.४५८
दर्शनी मूल्य: रु.१०/-
लाभांश: २००%
प्रति समभाग उत्पन्न: रु.१०७.४३

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २७.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.३४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ८२९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (ROCE): २०.२

बीटा : १
बाजार भांडवल: रु. १०१२ कोटी (स्मॉल मायक्रो कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २३४९/९३६
गुंतवणूक कालावधी : २४ महिने

वर्ष १९८० मध्ये स्थापन झालेली ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड (एसीजीएल) ही बसचा सांगाडा बांधणी अर्थात ‘बॉडी बिल्डिंग अँड प्रेसिंग’च्या व्यवसायात आहे. ईडीसी लिमिटेड (गोवा सरकारचा एक उपक्रम) आणि टाटा मोटर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेली ‘एसीजीएल’ विविध प्रकारच्या वाहन निर्मिती क्षेत्रासाठी ‘प्रेस्ड पार्ट्स’, घटक आणि ‘सब-असेम्ब्ली’ची निर्मिती करते. ही कंपनी बस सांगाडा आणि संबंधित घटक तयार करण्यातही अग्रेसर आहे.
सुरुवातीपासूनच, टाटांच्या मूल्यांशी सुसंगत गुणवत्ता, सुरक्षा, उत्पादकता आणि विश्वासार्हतेवर भर देत, ‘एसीजीएल’ने ग्राहकांची मने जिंकली आहेत. कंपनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जेजुरी, पुणे-महाराष्ट्र आणि ????????बेळूर??????

इंडस्ट्रियल इस्टेट, धारवाड-कर्नाटक येथील कारखान्यांमध्ये ‘ऑटोमोटिव्ह’ उद्योगासाठी शीट मेटल, ‘असेम्ब्ली’ आणि गोवा येथील होंडा व भुईंपाल गावांमध्ये असलेल्या कारखान्यांमध्ये बस कोचचे उत्पादन करते.
१९८७ मध्ये, कंपनीने विविध प्रकारच्या ‘चेसिस-माउंटेड’ बस बॉडींसाठी सुबारू कार बनवणाऱ्या जपानच्या ‘फुजी हेव्ही इंडस्ट्रीज लिमिटेड’सोबत तांत्रिक सहकार्य करार केला आणि एक पूर्ण विकसित बस सांगाडा बांधणी विभाग स्थापन केला. वर्ष १९९५ मध्ये ‘मोनोकॉक बस’ बनवण्यासाठी कंपनीने ‘एफएचआय लिमिटेड’सोबत आणखी एक करार केला.

व्यवसायाचे विभाग:
अ) प्रेसिंग विभाग:

विविध प्रकारच्या ऑटोमोबाइल्ससाठी प्रेस्ड पार्ट्स, घटक, सब-असेम्ब्ली आणि असेम्ब्लीचे उत्पादन.
ब) बस बॉडी बिल्डिंग विभाग:

बस बॉडी आणि बस बॉडीसाठीच्या भागांचे उत्पादन.
उत्पादन सुविधा:

कंपनीचे होंडा आणि बुइम्पल, गोवा (बुइम्पलमध्ये दोन सुविधा); जेजुरी, महाराष्ट्र आणि धारवाड, कर्नाटक या चार ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. ‘एसीजीएल’ जवळपास ७० टक्के क्षमतेचा वापर करून दरवर्षी १०,००० बस-निर्मितीच्या क्षमतेने कार्यरत आहे.
विभागवार महसूल:

प्रेसिंग ~१० टक्के, बस ~९० टक्के.
महसुलाचे विभाजन
बस बॉडी आणि घटकांच्या भागांची विक्री ~८९ टक्के, प्रेस्ड पार्ट्स/घटक
/सब-असेम्ब्ली ~१० टक्के, स्क्रॅप विक्री ~१ टक्का

कंपनीला तिच्या बहुतेक विक्रीतून मिळणारा महसूल टाटा मोटर्स लिमिटेडकडून मिळतो.

भविष्यातील दृष्टिकोन:

‘एसीजीएल’ १२-मीटर एसी कोच आणि लो-फ्लोर इलेक्ट्रिक बससह प्रगत विद्युत शक्ती (इलेक्ट्रिक) वाहन मंच सक्रियपणे विकसित करत आहे. कंपनी ‘एसटीयू’ आणि संरक्षण वाहनांसाठी क्षमता निर्माण करण्यावर, तसेच इलेक्ट्रिक वाहने, सीएनजी आणि एमसीव्हीसाठी बस असेम्ब्लीवर लक्ष केंद्रित करत आहे. किंमत वसुली सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक बस बॉडी उत्पादनात प्रवेश करणे आणि उच्च टन क्षमतेच्या बसच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
कंपनीने तिसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. डिसेंबर २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत ८१ टक्के वाढ दाखवून ती २०४ कोटी रुपयांवर नेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल १९५ टक्के वाढ होऊन तो ११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने ५० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. आगामी काळात ‘एसीजीएल’ने भांडवली खर्चाचे नियोजन प्रामुख्याने क्षमता विस्तार, दुरुस्ती आणि देखभालीसाठी केले आहे. विस्तारानंतर, कंपनी टाटा मोटर्सच्या ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) मागणीची पूर्तता करण्यास सक्षम होईल. संपूर्ण गुंतवणूक कंपनीच्या अंतर्गत उत्पन्न आणि बँक शिल्लक रकमेतून केली जाईल आणि त्यासाठी कंपनीला कर्जावर अवलंबून राहावे लागणार नाही. ‘टाटा’सारखे उत्तम प्रवर्तक, अनुभवी व्यवस्थापन, अत्यल्प कर्ज आणि उत्तम गुणवत्ता असलेला ‘एसीजीएल’चा शेअर सध्या १६५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.