राहुल तलवार

अनेक तरुण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात, पहिल्यांदाच आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत असल्याने कोणत्याही प्रकारच्या खबरदारीशिवाय खर्च करत राहतात. मात्र, भविष्यासाठी बचत करणे आणि आपत्कालीन स्थितीसाठी तजवीज या वयापासून करायला शिकले पाहिजे…

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतात आहे. सध्या भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६६ टक्के लोकसंख्या (८० कोटींहून अधिक) ३५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. जीवनात अनुभवास येणाऱ्या अस्थिरतेला मात द्यायची तर, तरुणांनी सुरुवातीच्या टप्प्यातच बचतीची सवय जोपासणे फार महत्त्वाचे ठरते. अनपेक्षित – अकल्पित खर्च, मोठ्या रकमेची खरेदी आणि जीवनातील महत्त्वाचे टप्पे गाठण्यात या सवयीमुळे बराच फायदा होतो. वाढते खर्च आणि अनपेक्षित आपात्कालीन स्थिती यामुळे आपल्या आर्थिक बाजूवर प्रचंड भार येतो. त्यामुळे दीर्घकाळ संरक्षण देण्यासोबतच अतिरिक्त परतावा मिळू शकेल असा समतोल गुंतवणुकीत तयार करणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठीच, तरुण गुंतवणूकदारांना दीर्घोद्देशी आर्थिक नियोजनाचे धडे गिरवणे आवश्यक आणि विम्याचे संरक्षण तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरीच आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ते मदतकारक ठरताना दिसेल. या दिशेने लक्षात घ्यावयाच्या काही प्राथमिक बाबी येथे देत आहोत.

मुदत विम्यातून वाजवी दरात संरक्षण : तरुण वयात नियमित उत्पन्न सुरू होते, तेव्हा त्या वयात कुटुंबातील जबाबदाऱ्याही मर्यादित असतात. त्यामुळे या वयातच मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) घेणे सुयोग्य ठरते. अगदी कमी रकमेच्या हप्त्यांतून अधिक संरक्षक कवच यातून मिळू शकते. मुदत विमा पॉलिसीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वयानुसार या विम्याचा हप्ता वाढत नाही आणि तो विम्याच्या संपूर्ण मुदतीसाठी एकच असतो. शिवाय हा हप्ता वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक स्वरूपात जे सोयीचे आहे, त्यानुसार भरता येतो. त्याचप्रमाणे, प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’, ‘कलम ८० डी’, ‘कलम १० (१०डी)’नुसार विम्यासाठी भरलेल्या हप्त्याच्या रकमेनुरूप कर वजावटही मिळते.

बचतीच्या योजनेसह उत्पन्न निर्मिती: सध्याच्या जमान्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाचा एकमेव स्रोत पुरेसा नसतो. उत्पन्नाचा ‘खात्रीशीर’ अतिरिक्त स्रोत असल्यास आर्थिक उद्दिष्टे गाठणे सोपे होते. खात्रीशीर बचत योजनांमुळे पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि कर लागू असल्यास त्यातील फायदे मिळवण्यासाठी त्यांच्या मासिक उत्पन्नातील छोटा वाटा बचत रूपात नियमितपणे बाजूला काढायला हवा. आयुर्विम्याचे ‘सेव्हिंग्ज प्लॅन’ हे त्यादिशेने उपयुक्त ठरतील. हे मूळ जीवनविम्याचे उत्पादन असल्याने या योजना आकस्मिक प्रसंगात, तुमच्यापश्चात प्रियजनांच्या आर्थिक सुरक्षिततेचीही काळजी घेतात.

‘युलिप’च्या साहाय्याने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता : युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन अर्थात ‘युुलिप’ ही एक अनोखी योजना आहे. यात काही भाग विम्याचा असतो तर काही भाग गुंतवणूक म्हणून असते. भरल्या जाणाऱ्या विमा हप्त्यातील काही भाग जीवन विमा म्हणून वापरला जातो आणि उर्वरित भाग आर्थिक उद्दिष्टे आणि धोका स्वीकारण्याची क्षमता यानुसार वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवला जातो. बचतीमधून मोठी रक्कम जमा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे नियमितपणे बचत करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. ‘युुलिप’मध्ये एकाच योजनेत विविध फंडांच्या माध्यमातून उच्च, मध्यम आणि कमी धोक्याचे गुंतवणूक पर्याय असतात. या उत्पादनांत तुम्हाला तुमच्या गरजांनुसार विम्याची रक्कम किंवा हप्त्याची रक्कम यातून निवड करण्याचाही पर्याय असतो. त्याचप्रमाणे, पॉलिसीधारकांना ते सध्या भरत असलेल्या हप्त्याव्यतिरिक्त ‘युुलिप’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘टॉप-अप’चाही पर्याय असतो.

‘रिटायरमेंट प्लॅन’सह भविष्य सुरक्षित करा : निवृत्तीचे वय तुम्हाला फार दूरवर असल्याचे वाटत असले तरी त्यासाठी आधीपासूनच बचत करणे फार महत्त्वाचे आहे. कारण काय? तुम्ही निवृत्तीसाठी बचत करता तेव्हा फक्त तुम्ही गुंतवलेली रक्कम महत्त्वाची नसते तर त्याचसोबत तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करताय तो कालावधीही महत्त्वाचा असतो. निवृत्तीसंबंधाने योजना आधीच तयार असल्याने तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य लाभते आणि आयुष्याच्या त्या ‘सेकंड इनिंग’मध्येही तुम्ही जीवनशैलीच्या गरजा आणि खर्च भागवू शकाल याची खातरजमा होते. त्यासाठी आयुष्यात खूप आधीच बचतीला सुरुवात केलीत तर काळाच्या ओघात संपत्ती निर्माण होत जाते आणि पुढे अधिक वेगाने बचतीत वृद्धी साधता येते.

तरुण वयातच पैशाच्या स्मार्ट वापराची प्राथमिक तत्वे शिकून घेतल्यास माहितीवर आधारित आणि संरक्षणात्मक आर्थिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होते. अनेक तरुण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात, पहिल्यांदाच आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत असल्याने कोणत्याही प्रकारच्या खबरदारीशिवाय खर्च करत राहतात. मात्र, भविष्यासाठी बचत करणे आणि आपत्कालीन स्थितीसाठी रकमेची तजवीज करण्यास प्राधान्य द्यायला हवे. आर्थिक नियोजनाचा हा प्रवास म्हणून हाती पडणाऱ्या पहिल्या पगारापासून सुरू व्हायला हवा. कारण, तुम्ही फक्त निश्चित वर्तमानासाठी नाही तर तितक्याच प्रमाणात अनिश्चित भविष्यासाठीही तरतूद करत असता !

(लेखक मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी)