मदन सबनीस

२०२४ हे वर्ष भारतासाठी महत्त्वाचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. एप्रिल-मेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवडणुका होणार असून, त्याच्या परिणामांकडे बारकाईने पाहिले जाणार आहे. २०२४ हे सलग तिसरे वर्ष देखील ठरू शकते, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. या काळात आपण काय काळजी घेणे आवश्यक आहे? हे जाणून घेणार आहोत.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

पहिल्यांदा व्याजदराबद्दल बोलणार आहोत. भारतात हा मुद्दा थोडा अकाली असला तरी चलनविषयक धोरण समितीच्या एका सदस्याने, असे मत मांडले आहे की दर कमी करण्याची वेळ आली आहे. प्रश्न असा उरतो की, कधी आणि किती प्रमाणात? आरबीआयच्या अंदाजानुसार, २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत महागाई ५ टक्क्यांच्या आसपास असेल. त्यामुळे दर कमी करणे कठीण होणार आहे. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर दुसऱ्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार महागाई ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. गेल्या दशकात सरासरी रेपो दर ६-६.५ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. ४ टक्क्यांपर्यंतची कपात ही असामान्य परिस्थितीमुळे झाली होती आणि त्यामुळे आता दर कमी केल्यास ते पुन्हा मागे जाण्यासारखे होईल. पुढे चलनवाढीचा दर सुमारे ५ टक्के असण्याची शक्यता आहे, वास्तविक रेपो दर १ टक्के राखल्यास पॉलिसी रेटमध्ये जास्तीत जास्त ५० बीपीएस कपात होऊ शकते.

हेही वाचाः पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI खाते बंद होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण

दुसरे म्हणजे १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा असेल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आताच घेता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर कोणता मार्ग स्वीकारला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढीचा अंदाज हा पहिल्या क्रमांकावर असल्यानं वित्तीय तुटीनुसार त्याचा मागोवा घेतला जाणार आहे. ३ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५.९ टक्के तूट अजूनही खूप जास्त आहे, जे सर्वोत्तम काळातही धोक्याचे ठरले आहे. ४.५ टक्के लक्ष्य २०२५-२६ साठी सर्वोत्तम तडजोड आहे. खर्चाच्या गुणवत्तेचाही बारकाईने मागोवा घेतला जाणार आहे.

हेही वाचाः मोदी सरकारकडून १६व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगढिया यांची नियुक्ती, ‘या’ जबाबदाऱ्या असणार

तिसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास मान्सूनदेखील गंभीर परिणाम करणार आहे. जेव्हा शहरांमध्ये पुरवठ्याचे प्रमाण वाढते, तेव्हा शहरी मागणी वाढत असते. परंतु ग्रामीण भागातही मागणी वाढते असेच म्हणता येणार नाही. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती कार्यरत असली तरी मूल्यवर्धित क्षेत्राचा वाटा कमी आहे. तसेच मूल्यवर्धित क्षेत्र शेती आणि बिगरशेती क्षेत्र यांच्यातील संबंधांमध्ये विभागला गेलेला आहे. २०२३ च्या तुलनेत खरीप हंगाम चांगला झाल्यास उद्योगासाठी आणि जीडीपी वाढीसाठी ही चांगली बातमी असेल. दुचाकी, एफएमसीजी आणि ट्रॅक्टर उद्योग विशेषतः प्रगतीचा मागोवा घेत राहतील.

चौथे म्हणजे अर्थव्यवस्थेची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता २०२३-२४ चे अंदाज वरच्या दिशेने सुधारित केले गेले आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि युद्धाचे धक्के राष्ट्रांनी शोषले आहेत. त्यामुळे सुरुवातीस वाढीचा अंदाज कमी दर्शवला तरी वाढ कमी होण्याचे कोणतेही कारण नाही. सध्याचा वाढीचा वेग कायम राखणे ही बाब महत्त्वाची आहे. परंतु ७ टक्क्यांची पातळी ओलांडणे ही मानसिक वाढ ठरणार आहे.

पाचवा मुद्दा हा खासगी गुंतवणुकीशी संबंधित आहे. आतापर्यंत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असतानाही विविध कंपन्यांचे सीईओ केवळ गुंतवणूक करण्याविषयी बोलत आहेत. निधी उभारणीच्या पद्धतीनुसार सध्या गुंतवणूक दर स्थिर असल्याचे दिसून येते. अॅव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी या ठराविक अशा सेवाविषयक उद्योगांमध्ये आणि पायाभूत क्षेत्रात स्टील आणि सिमेंट क्षेत्रात गुंतवणूक होताना दिसते आहे. खासगी नियंत्रणामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाबद्दलही अनेक जण वर्षानुवर्षे बोलत आहेत. पण दाखवण्यासारखे फार काही घडले नाही.

सहावे म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड आहे. गेल्या वर्षी मागणी वाढल्यामुळे कंपन्यांची विक्री वाढली. पण इनपूट कॉस्टमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने नफ्यावर दबाव आला. आतापर्यंतचा कल दर्शवितो की, फर्म विक्री कमी झाली असतानाही फक्त इनपूट कॉस्ट थंड झाल्याने नफा वाढला आहे. दोन्ही गोष्टी पुढील वर्षी स्थिर असतील. याचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी झेप घेण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

(लेखक बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट क्विर्क्स: द डार्क साइड ऑफ द सनचे लेखक आहेत)